'लव्हस्कूल' कपल अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा यांच्या ब्रेकअपच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. मागच्या आठवड्यात अनुषाने लग्नाच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तराने या चर्चांना सुरूवात झाली होती. मात्र हे साफ खोटं असल्याचं आता करण सांगत आहे. नक्की खरं काय जाणून घेण्यासाठी वाचा.
आम्ही अजूनही एकत्र आहोत असं सांगत आता करण कुंद्राने ब्रेकअपच्या चर्चेवर मौन सोडलं आहे. खरंतर या आधी अनुषानेही इन्स्टावर याबाबत पोस्ट शेअर करत या सर्व अफवा असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता करणने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतही हेच सांगितल्याने या कपलच्या फॅन्सच्या जीवात जीव आला आहे. करणने ब्रेकअपच्या चर्चांबाबत सांगितलं की, सर्वात आधी आम्ही दोघंही लिव्ह इनमध्ये राहत नाही आणि आमचा ब्रेकअपही झालेला नाही. आम्ही काही दिवस एकत्र आपापल्या शेड्यूलप्रमाणे एकत्र राहतो. मी हरियाणात शूटींग करत होतो आणि मुंबईमध्ये लॉकडाऊन होण्याच्या काही तास आधीच पोचलो. त्यामुळे मला माझं आणि कोणाचंही आयुष्यही धोक्यात घालायचं नव्हतं. म्हणून मी माझ्याच घरी राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघं एकत्र नाही म्हणून लोकांनी अर्थ लावला की आमचा ब्रेकअप झाला आहे. पण आम्ही अजूनही एकत्र आहोत. आमच्या ब्रेकअपच्या अफवा यासाठी रंगल्या आहेत, कारण मी सोशल मीडियावर एक्टिव्ह नाहीय आणि काही पोस्टसुद्धा करत नाहीये. याच कारण आहे की, मी सध्या सोशल मीडिया डिटॉक्सवर आहे आणि काही काळ त्यापासून दूर राहू इच्छितो.
करणने अफवांबाबत बोलताना सांगितलं की, अशा अफवांमुळे मला फरक पडत नाही. पण अनुषाला पडतो. ती खूपच इमोशनल आहे. तिनेच मला ब्रेकअपच्या अफवा पसरत आहेत, याबाबत सांगितलं. अरे, आधी आम्हाला तर कळून द्या की, आमचा ब्रेकअप झाला की नाही ते.
करण आणि अनुषा एकमेकांना तब्बल सहा वर्षांपासून डेट करत आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या दोघंही त्यांच्या त्यांच्या घरी क्वारंटाईन्ड आहेत. हे दोघंही एकत्र मिळून रिएलिटी शो लव्ह स्कूलसुद्धा होस्ट करतात.