अभिषेकमुळे करणने रंगपंचमी खेळणे केले बंद, रिअॅलिटी शो दरम्यान कबुली

अभिषेकमुळे करणने रंगपंचमी खेळणे केले बंद, रिअॅलिटी शो दरम्यान कबुली

सेलिब्रिटींची होळी म्हणजे फुलऑन मस्ती आणि पार्टी असते. पण चित्रपट निर्माता करण जोहरने मात्र होळीचा धसकाच घेतला आहे. कारण होळीनंतर येणाऱ्या रंगपंचमीची त्याला खूप भीती वाटते. या भितीचे कारण आहे ज्युनिअर बच्चन. अभिषेकमुळे करणने रंगपंचमी खेळणे बंद केले असल्याचा मोठा खुलासा त्याने एका रिअॅलिटी शोवर केला आहे. त्यामुळे अभिषेकने नेमके केले काय? असा प्रश्न पडतो. अभिषेकने करणसोबत जे केले ते फारच वाईट होते असे करणने खुलासा केल्यानंतर आपल्यालाही वाटते.


होळीच्या संध्याकाळी करुन पाहा या फ्युजन रेसिपी


का करण खेळत नाही रंगपंचमी


खुलासा करताना करण जोहरने एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की, मी दहा वर्षांचा असताना अमिताभ बच्चन यांच्याकडे होळी पार्टीसाठी गेलो होतो. अमिताभ यांच्या घरी पोहोचल्यानंतर रंगाच्या खेळासाठीची सगळी तयारी तेथे केलेली होती. खूप जण त्यांच्या घरी येणार होते. रंगाने खेळताना मला अभिषेकने रंगाच्या पूलमध्ये ढकलून दिले. माझ्या नाकातोंडात पाणी गेले. मी इतका घाबरलो की, त्या दिवसापासून मी ठरवून टाकले की, मी कधीच रंगपंचमी खेळणार नाही. मी होळी पार्टीला जातो. पण रंगाने मी कधीच खेळत नाही.

Subscribe to POPxoTV

लहानपणी रंगपंचमी खेळताना भांडण


अभिषेकने करणला पूलमध्ये ढकलून दिले म्हणून करणने रंगपंचमी खेळणे सोडले हे एक कारण तर होतेच. याशिवाय त्यांच्या लहानपणीच्याही काही आठवणी आहेत. हा दुसरा किस्सा सांगताना करण म्हणाला की,, लहान असताना मी ज्या कॉलनीत राहायचो. तेथे रंगपंचमी खूप खेळली जायची. त्यावेळी सिल्व्हर कलरचा पेंट लावला जायचा. माझ्या मागे हा सिल्व्हर कलरचा पेंट लावण्यासाठी कॉलनीतली मुले लागायची. त्यांच्यामुळे मी पडायचो आणि मग आमच्यात खूप भांडणे व्हायची . त्यामुळेही मला रंगपंचमी खेळायला आवडत नाही असे त्याने सांगितले. त्यामुळे आता तुम्हाला करण रंगानी का खेळत नाही याचे कारण कळालेच असेल. पण इतक्या वर्षांनंतर करणने त्याचा खुलासा केल्यामुळे अभिषेक बच्चन किती खोडकर असेल याचा अंदाज येतो.


जया बच्चन यांना कोणी फोटो काढल्यावर राग का येतो?


ज्युनिअर बच्चन खोडकर


आता अभिषेक बद्दल सांगायचे झाले तर तो जसा दिसतो तसा अजिबात नाही. कारण या आधी अनेकांनी अभिषेक सेटवर काय धमाल करतो ते सांगितले आहे. सेटवर प्रँक करायला त्याला खूप आवडतात. फराह खाननेदेखील कॉफी विथ करणमध्ये याबाबत खुलासा केला होता. त्यामुळे एक नक्की आहे की, बच्चन कुटुंबिय कितीही कडक शिस्तीचे वाटत असले तरी ज्युनिअर बच्चन चांगलाच खोडकर आहे. अभिषेकने या आधी चित्रपटात साकारलेल्या विनोदी भुमिकाही अनेकांना आवडल्या आहेत.२०१९ करणसाठी खास


दिग्दर्शक ते निर्माता असा प्रवास केलेल्या करणने अनेक चांगल्या आणि बीग बजेट चित्रपटांची निर्मिती केली आहे. तामिळ,तेलगु भाषांमध्ये आलेल्या ‘बाहुबली’ या चित्रपटाची हिदींत निर्मिती करण्याचे काम करणच्या धर्मा प्रोडक्शनने केले. सध्या करणचा ‘केसरी’ चित्रपट रिलीज होणार आहे. सारागढीच्या युद्धावर आधारीत हा चित्रपट आहे. याशिवैाय त्याचा ‘कलंक’, ‘तख्त’, ‘गुंजन सक्सेना बायोपिक’ असे काही चित्रपट आहे. त्यामुळे २०१९ हे वर्ष करणसाठी खास असणार आहे असे म्हणायला हवे.


केसरीचा अनुभव अक्षयने केला शेअर


(सौजन्य-Youtube,Instagram)