गँगरेपच्या आरोपाखाली अटक झालेला मी नाही,करणने चुकीची बातमी देणाऱ्यांना दिल्या कान पिचक्या

गँगरेपच्या आरोपाखाली अटक झालेला मी नाही,करणने चुकीची बातमी देणाऱ्यांना दिल्या कान पिचक्या

बातमी पहिली ब्रेक करण्याची घाई अनेकांना असते.हीच घाई काही मीडिया हाऊसेसना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण गँगरेपच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या करण वाही या माणसाचा फोटो लावताना काही प्रसारमाध्यमांनी अभिनेता करण वाहीचा फोटो लावून फारच गोंधळ घातला आहे. या प्रकरणी संतापलेल्या करण वाहीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरी शेअर करत चुकीची बातमी देणाऱ्यांना कान पिचक्या दिल्या आहे.


प्रियांका चोप्रा झाली पुन्हा एकदा ट्रोल


का चिडला करण वाही?


काही दिवसांपूर्वी गँगरेपची घटना घडली. त्यामध्ये करण वाही देखील असल्याचे कळले. पण हा करण वाही अभिनेता करण वाही नाही तर तो म्युझिक कंपोझर करण वाही आहे. पण काही ठिकाणी बातमी देताना थेट करण वाही याचा फोटो लावण्यात आला. त्यावर चिडलेल्या करण वाहीने  एक इन्स्टा स्टोरी शेअर करत त्यात झालेला सगळा प्रकार सांगितला. त्याने गँगरेपमध्ये असलेला करण वाही हा मी नाही तर म्युझिक कंपोझर करण वाही असल्याचे त्याने सांगितले. या एका चुकीमुळे तुम्ही एखाद्याचे आयुष्य खराब करुन टाकाल, असे लिहिले आहे. या सगळ्या प्रकारामुळेच करण चिडला. लोकांना नेमकं काय झालं हे कळावं यासाठीच त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही स्टोरी शेअर करत त्याच्या फॅन्सना दिलासा दिला आहे. 


IMG 20190607 104007.732


नेमकी घटना काय?


उत्तराखंडमध्ये राहणारी एक तरुणी मुंबईत अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन आली होती. तिची भेट करण वाही या फिल्ममेकरशी झाली. त्याने तिला कामाचे आमिष देऊन त्याच्या चारकोप येथील घरी बोलावले. ती त्याच्या घरी पोहोचली त्यावेळी त्या ठिकाणी नगर नावाचा आणखी एक व्यक्तीसोबत होता. त्यांनी तिला सॉफ्ट ड्रींक ऑफर केले. ते प्यायल्यानंतर तिला कसेतरी वाटू लागले. त्याचाच फायदा घेत या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. ती जेव्हा शुद्धीवर आली त्यावेळी तिला तिच्यासोबत नेमकं काय झालं ते कळालं. तिने तातडीने पोलीस स्टेशन गाठून या दोघांविरोधात तक्रार केली. पोलीस तपासात ही मुलगी करण वाही आणि नगरसोबत सीसीटीव्हीत दिसली. आरोग्य तपासणी केल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचेही सिद्ध झाले. त्यामुळे या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.


दिशा पटानीच्या हॉट फोटोबाबत काय वाटत तिच्या बाबांना


 नावामुळे झाला गोंधळ


karan fi


करण वाही म्हटल्यावर सध्या अनेकांना आठवतो तो अभिनेता करण वाही. फिल्ममेकर करण वाही हा  B आणि C ग्रेड चित्रपटांची निर्मिती करणारा आहे. या दोघांच्या नाव साधर्म्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. पण यामध्ये नाहक करण वाही याचे नाव आले. त्यामुळे अनेकांना अभिनेता करण वाहीने बलात्कार केला अशी चुकीची बातमी सगळीकडे पोहोचली.


साऊथ स्टार धनुष करणार 'अंधाधुन'चा रिमेक


करण वाही सगळ्यांच्याच आवडीचा


आतापर्यंत करणने मालिका आणि चित्रपटांमधून काम केले आहे. त्याने अनेक मालिकांमधून काम केलेली आहेत.  रिमिक्स, दिल मिल गये, मेरी घर आयी एक..,कुछ तो लोग कहेंगे, तेरी मेरी लव्ह स्टोरी अशा काही मालिकांमधून त्याने काम केले. नुकताच तो  हेट स्टोरी 4 या चित्रपटातही दिसला होता.


(फोटो सौजन्य- Instagram)