करणवीर बोहराने शेअर केला टीजे सिद्धूचा प्रेगनन्सी व्हिडिओ

करणवीर बोहरा आणि टीजे सिद्धू पुन्हा एकदा आईबाबा होणार आहेत. दुसऱ्यांदा बाबा होताना करणवीर इतका आनंद होत आहे की तो दाखवण्यासाठी त्याने त्याच्या बायकोचा प्रेगनन्सी व्हिडिओच चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

करणवीर बोहरा आणि टीजे सिद्धूला दोन गोंडस मुली आहेत. आता ते दोघं पुन्हा एकदा आई-बाबा होण्यासाठी सज्ज झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच टीजे सिद्धू पुन्हा प्रेगनंट असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. करणवीरने टीजे सिद्धूचा बेबी बम्प दाखवणारा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये गरोदर टीजे सिद्धूच्या पोटातील बाळाची हालचाल स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ शूट करताना करणवीर आणि त्याच्या मुली बाळासोबत गप्पा मारताता आणि त्याच्या हालचालीचा आनंद घेताना दिसत आहेत. खरंतर बाळ होण्याआधी असे फोटो अथवा व्हिडिओ इतरांना दाखवले जात नाहीत. मात्र सेलिब्रेटीजची बातच निराळी... त्यांना त्यांच्या आयु्ष्यातील प्रत्येक गोष्ट चाहत्यांसोबत शेअर कराविशी वाटत असते. म्हणूनच करणवीरने हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करत या गोष्टींचा आनंद घेतला आहे. या व्हिडिओसोबत करणवीरने शेअर केलं आहे की, " हा एक चमत्कार आहे. हेच जीवन आहे आणि ते सतत सुरु आहे " त्याने त्याच्या या पोस्टसोबत ओ मनमः शिवाय  असंही टॅग केलं आहे. त्याने हे त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाचं बेस्ट गिफ्ट आहे असंही म्हटलं आहे. 

करणवीर आणि टीजे लवकरच होणार आईबाबा

करणवीर आणि टीजे सिद्धूने जेव्हा त्यांची गूडन्यूज शेअर केली होती तेव्हा बाळाच्या आगमनापुढे 2020 असं लिहीलं होतं. म्हणजेच टीजे येत्या डिसेंबरच्या आतच बाळाला जन्म देणार आहे. म्हणजे यावर्षीच करणवीर आणि टीजेच्या घरी त्यांच्या तिसऱ्या बाळाचं आगमन होईल. करणवीरने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ही  गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्याने शेअर केलं होतं की, “देवच खरं तर निर्माता आहे, आपल्या हाताने तो प्रत्येक लहानसहान गोष्ट घडवत असतो. आपण फक्त त्याच्या हातचे खेळणं आहोत, तो जे काही देईल त्याची आपण वाट पाहत असतो. आम्हाला दिलेल्या या उत्तम आशिर्वादासाठी आम्ही अत्यंत आभारी आहोत. आम्हाला पुन्हा आईवडील बनविण्यासाठी त्याने आमची निवड केली असून आम्ही त्याचे शतशः आभारी आहोत. येणाऱ्या बाळाला खूप खूप प्रेम. आतापर्यंत सर्वात सुंदर वाढदिवसाचे गिफ्ट मला मिळाले आहे”  करणवीर आणि टीजे सिद्धूने 2006 मध्ये लग्न केलं होतं. आता त्यांच्या लग्नाला 3 नोव्हेंबरला चौदा वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्यामुळे त्यांनी त्यांच्या एकत्र सहवासाच्या पंधराव्या वर्षात पदार्पण केलं आहे. लग्नाच्या दहाव्या वर्षी म्हणजेच 2016 मध्ये त्यांना वियना आणि बेला या जुळ्या मुली झाल्या होत्या आता चौदा वर्षे पुर्ण झाल्यावर ते पुन्हा आईबाबा होणार आहेत. ज्यामुळे त्यांना हे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे गिफ्ट परमेश्वराने दिलं आहे असं वाटत आहे.

बाळाच्या आगमनाची लागली आहे आतुरता...

करणवीरने संपूर्ण लॉकडाऊनमध्ये त्याच्या जुळ्या मुलींसोबत घालवलेले अविस्मरणीय क्षण चाहत्यांसोबत शेअर केले होते. त्यामुळे त्याच्या दोन्ही मुली लहानपणापासूनच सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या आहेत. करणवीर आणि टीजेच्या वागण्यातून आणि पोस्टमधून त्यांना लहान मुलांची खूपच आवड आहे हे दिसतं. आता त्याच्या घरी आणखी एक नवा पाहुणा लवकरच येणार आहे. त्यामुळे ते आता त्यांच्या तिसऱ्या बाळाच्या आगमनाच्या तयारीला लागला आहे. त्याच्या घरातील वातावरण पाहुन त्याला, त्याच्या बायकोला आणि मुलींना नवा पाहुणा कधी घरी येणार याची उत्सुकता लागलेली दिसत आहे. त्यामुळे लवकरच त्यांचे बाळ या जगात येवो आणि त्यांचे घर आनंदाने फुलुन राहो असंच चाहत्यांना वाटत आहे