'या' कारणामुळे करणवीर बोहरा अडकला होता मॉस्कोत

'या' कारणामुळे करणवीर बोहरा अडकला होता मॉस्कोत

बिग बॉस सीझन १२ चा स्पर्धक करणवीर बोहरा मॉस्कोत अडकला होता. पण आता काहीच तासांपूर्वी त्याची सुटका देखील झाली आहे. आता करणवीर मॉस्कोत का अडकला असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचे कारण होते करणवीरचा पासपोर्ट.  त्यामुळेच करणवीरला तब्बल ९ तास मॉस्को एअरपोर्टवर थांबून राहिले. त्याने या संदर्भात एक ट्विट करुन माहिती दिली होती. त्यानंतर तो मॉस्कोमध्ये अडकल्याचे कळले होते.मॉस्कोत का अडकला करणवीर?


करणवीर मॉस्कोमध्ये मॅककॉफी बॉलीवूड फेस्टिव्हलसाठी मॉस्कोमध्ये गेला. मॉस्कोत पोहोचल्यानंतर त्याला विमानतळावरच अडवण्यात आले. त्याच्याकडे मॉस्कोचा व्हिसा असतानाही का अडवण्यात आल्याची विचारणा केल्यावर त्याचा पासपोर्ट खराब झाल्याचे सांगण्यात आले त्यामुळे मॉस्को शहरात त्यांना प्रवेश करता येणार नाही, असे सांगण्यात आले. त्याने लगेचच झालेला सगळा प्रकार ट्विट करुन सांगितला. शिवाय व्हिसा देताना अशी कोणतीही सबब सांगण्यात आली नव्हती. त्यामुळे या सगळ्या प्रकारावर करणवीरने नाराजीदेखील व्यक्त केली. शिवाय त्याच्या या पासपोर्टमुळे त्याला ९ तास विमानतळावर थांबण्यात आले शिवाय त्याला पुन्हा भारतात पाठवण्याची तयारी देखील मॉस्को विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आली. पण सुदैवाने ही वेळ करणवीरवर आली नाही. कारण भारतीय दुतावासाने लगेचच करणवीरची मदत केली. 


हम पांच लवकर पुन्हा येतयसुषमा स्वराजचे मानले आभार


तब्बल ९ तासानंतर ज्यावेळी करणवीरला तात्पुरता पासपोर्ट मिळाला. ९ तास त्याला तात्पुरत्या पासपोर्टसाठी थांबावे लागले. पण ९ तासानंतर घरी येण्याचे त्याचे मार्ग मोकळे झाले. त्याने लगेगच त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ करत सुषमा स्वराज आणि मॉस्कोतील भारतीय दुतावासाचे आभार मानले आहेत. त्यामुळे अवघ्या ९ तासात करणवीरची सुटका झाली असेच म्हणायला हवे. या सोबतच त्याने सेलिब्रिटीच नाही तर सामान्यांच्या मदतीला कायम धावून येणाऱ्या भारतीय दुतावासाचा अनुभव आला. त्यांच्या या मदतीचे आभार!अशा आशयाचे ट्वीट त्याने केले आहे. शिवाय ९ तासांच्या कालावधीत मदत केलेल्या प्रत्येकाचे त्याने आभार मानले आहेत. 


अजय देवगण साकारणार फुटबॉल कोचची भूमिका

सईच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज 

करणवीर बिग बॉसमध्ये फायनलिस्ट


करणवीर सध्या बिग बॉसच्या १२व्या सीझनमध्ये दिसला होता. तो अखेरच्या या लढतीपर्यंत यात होता. बिग बॉसच्या घरातही तो कोणत्याही कॉन्ट्राव्हर्सिजमध्ये  फारसा अडकला नाही. त्याच्या बायकोने सलमानवर काही आरोप लावल्यानंतर त्याने सलमानची माफी मागितली. पण तो खेळातून बाहेर पडला नाही. उलट त्याने अनेक चॅलेंजमध्ये चांगली कामगिरी करत तो फायनल पर्यंत पोहोचला.या लढतीत दीपिका कक्करने बाजी मारत विजय मिळवला. पण त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे करणवीरच्या चाहत्यांमध्ये नक्कीच वाढ झाली.


karanvir bohra


करणवीर दिसणार का मालिकेत ?


बिग बॉस १२ नंतर करणवीर सध्या ब्रेकवर आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तो सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. त्याच्या दोन जुळ्या मुलींसोबत तो जास्त वेळ घालवताना दिसत आहे. करणवीर त्याच्या अनेक मालिकांमधून घराघरात पोहोचला आहे. बिग बॉसच्या आधी तो नागिन १ आणि नागिन२ मध्ये दिसला होता. या शिवाय त्याने अनेक मालिकांमधून काम केली आहेत. त्याने साकारलेला व्हिलन आणि हिरो या दोघांवरही प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.