Good News: करिना कपूर पुन्हा होणार आई, घरात येणार पाहुणा

Good News: करिना कपूर पुन्हा होणार आई, घरात येणार पाहुणा

करिना आणि सैफच्या घरी पुन्हा एकदा नवा पाहुणा येणार असून तैमूर अली खान लवकरच मोठा भाऊ होणार आहे. सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांनी स्टेटमेंट देऊन या बातमीला पुष्टी दिली आहे. करिना जेव्हा पहिल्यांदा गरोदर होती तेव्हाही तिच्या अवतीभोवती नेहमीच मीडियाचा घेरा होता. इतकंच नाही तर तैमूरच्या जन्मानंतर तैमूरही कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. आता पुन्हा एकदा करिना आणि सैफकडे लहान पाहुण्याचं आगमन होणार असून सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांचा दोघांनीही स्वीकार केला आहे. 

अभिनेत्री महिमा चौधरीने केले सुभाष घईंवर गंभीर आरोप, केला खुलासा

स्टेटमेंटमध्ये दोघांनीही केला खुलासा

सैफ आणि करिनाने ही आनंदाची बातमी एका स्टेटमेंटद्वारे आपल्या चाहत्यांना दिली आहे. ‘आमच्या कुटुंबात आणखी एका सदस्याचे आगमन होणार असून हे सांगताना आम्हाला अत्यानंद होत आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि भरभरून दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद’ असं दोघांनीही सांगत चाहत्यांकडून मिळालेल्या शुभेच्छांना उत्तर दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासूनच करिना पुन्हा गरोदर असल्याच्या बातम्या पसरत होत्या. पण तेव्हा दोघांनीही कोणतंही उत्तर दिलं नव्हतं. तर करिनाचे वडील रणधीर कपूर यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी नकार आणि होकार दोन्ही दर्शवला नव्हता. मात्र त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये, ‘ही बातमी खरी असावी अशी मला आशा आहे. मला या बातमीने अत्यानंद होईल. दोन मुलं ही असायलाच हवीत. एकमेकांना चांगली कंपनी मिळते’ असं म्हटलं होतं. त्यावरूनच पुन्हा एकदा करिना नक्की गरोदर असणार असाही कयास लावला जात होता. आता स्वतः करिना आणि सैफने स्टेटमेंट जारी करून याची पुष्टी दिली आहे. खान आणि कपूर खानदान आनंदी असून आता नव्या बाळाचं आगमन 2021 मध्ये होणार आहे. करिनाची तब्बेतही उत्तम असून तिने नुकतंच एका मॅगझिनसाठी फोटोशूटही पूर्ण केल्याचं दिसून येत आहे. यामध्ये करिना नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत असून तिने यात सैफचे कपडे घातले आहेत. शिवाय यासाठी तिने सैफला धन्यवादही दिले आहेत.

फोर्ब्सच्या लिस्टनुसार अक्षय यंदाचा एकमेव श्रीमंत बॉलीवूड कलाकार

तैमूर तीन वर्षांचा

करिना आणि सैफचा मुलगा तैमूर अली खान हा आता तीन वर्षांचा आहे. त्यालाही जन्मापासूनच प्रसिद्धी मिळाली आहे. तैमूर जिथे जाईल तिथे मीडिया हजर असते. त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटोजही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आता करिनाला होणाऱ्या दुसऱ्या बाळालाही तशीच प्रसिद्धी नक्की मिळेल अशा चर्चेलाही सुरूवात झाली आहे. दोन वर्षांपूर्वीच करिनाने आम्ही तैमूरमुळे अत्यंत आनंदी असून दुसऱ्या बाळाचा विचार करत नसल्याचे सांगितले होते. मात्र आता करिनाने सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. कपूर आणि खानदान सगळेच आनंदी असून सैफची मोठी मुलगी साराच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही आनंदाची बातमी देण्यात आली आहे. सैफला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुलं पहिली बायको अमृता सिंगकडून असून आता तैमूर आणि अजून एक नवीन बाळ दुसरी पत्नी करिनापासून होणार आहे. 

करिना आमिर खानबरोबर लालसिंग चढ्ढा चित्रपटात दिसणार असून सैफ अली खान वेबसिरीज दिल्ली आणि चित्रपट बंटी और बबली 2 आणि भूत पोलीसमध्ये दिसणार आहे. 

पतीच्या आत्महत्येनंतर मयुरी देशमुखने केली भावनिक पोस्ट

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा