फिट राहण्यासाठी करिना करते 'ही' कठीण योगासने

फिट राहण्यासाठी करिना करते 'ही' कठीण योगासने

बॉलीवूड सेलिब्रेटीजचे सौंदर्य पाहून अनेकजण घायाळ होतात. मात्र या सौंदर्य आणि फिटनेस मागे प्रंचड मेहनत दडलेली असते. अभिनेत्री करिना कपूर हे फिटनेस आणि सौंदर्याचं याचं एक चांगलं उदाहरण आहे. तरूणपणी वजनदार असलेल्या करिनाने टशन चित्रपटासाठी मात्र प्रंचड मेहनत आणि डाएट करून झिरो फिगर मिळवली होती. त्यानंतर लग्नानंतर प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही तिने गरोदरपण आणि बाळंतपणासाठी आपलं वजन वाढवलं होतं. बाळाच्या जन्मानंतर आता व्यायाम आणि योगासनांनी करिनाने सुडौल बांधा पुन्हा मिळवला आहे. एका मुलाची आई असूनही करिनाचं फिटनेस एखाद्या किशोरवयीन मुलीलादेखील लाजवेल असं आहे. या गोष्टींचा विचार केल्यावर करिना तिच्या फिटनेसबाबत कशी जागरूक आहे हे नक्कीच दिसून येतं.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#yogaitsamust🌺️❣️❣️


A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on
करिनाने शेअर केला तिचा फिटनेस फंडा


करिना कपूरने सोशल मीडियावर तिचा फिटनेस फंडा शेअर केला आहे. नुकतंच तिने तिचे व्यायाम करताना काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अगदी कठीण योगासने करताना दिसत आहे. करिना करत असलेली ही योगासने पाहून भल्या भल्यांना घाम फुटू शकतो. कारण ही योगासने करण्यासाठी तुमच्या जवळ जबर इच्छाशक्ती आणि प्रंचड मेहनत घेण्याची तयारी असणं गरजेचं आहे. करिनाने या फोटोंमध्ये विविध आसनं करून दाखविली आहेत. ज्या आसनांंमध्ये तिचे शरीर फिट आणि सुडौल असण्यामागचं रहस्य दडलेलं आहे. करिना तिच्या फिटनेस बाबत फारच जागृत आहे. कारण ती सतत कधी जीममध्ये जाताना आणि एक्सरसाईज करताना दिसते तर कधी तिच्या हेल्दी डाएट बाबत माहिती लोकांना शेअर करताना दिसते. ती स्वतः प्रमाणे तिचा नवरा आणि अभिनेता सैफ अली खान आणि मुलगा तैमूर यांच्या डाएटची देखील काळजी घेते. आता तर तिने तिची योगासने  आणि फिटनेसचा नवा फंडा फॅन्ससोबत शेअर केला आहे.


योगासने करिनाचा आवडता  व्यायाम


योगासने हा करिनाचा आवडता व्यायामप्रकार आहे. करिना दिवसभरात कमीत कमी 500 कपालभाती आणि  50 सुर्य नमस्कार घालते. करिनाच्या मते योगासनांमुळे तुमचे शरीर स्वस्थ, बुद्धी तल्लख आणि मन निवांत होतं. म्हणूनच ती तिच्या बिझी शेड्यूलमधून नेहमीच्या कार्डिओ एक्सरसाईजसोबतच कमीत कमी दोन तास योगासनांचा सराव करते. करिनाच्या या योगा ट्रेनिंगचं श्रेय ती लोकप्रिय सेलिब्रेटी योग ट्रेनर पायल गिडवानी तिवारी हिला देते.


करिनाने नेटकऱ्यांना दिलं हे उत्तर


kareena kapoor khan difficult yoga pictures viral 1


करिना काही दिवसांपूर्वी तिच्या कुटुंबासोबत फॅमिली वेकेशनसाठी गेली होती. वेकेशनवर असताना तिने तिचा बिना मेकअपचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्या फोटोसाठी नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं होतं. करिना या फोटोंमध्ये बिना मेकअप असल्यामुळे आणि उन्हामुळे लालसर दिसत होती. नेटकऱ्यांनी या फोटोवर “करिनाला एखादा स्किन प्रॉब्लेम झाला आहे का?” “करिना आता म्हातारी दिसू लागली आहे” अशा कंमेट दिल्या होत्या. मात्र करिनाने आता हा फिटनेस फंडा शेअर करून या नेटकऱ्यांची तोंडं बंद केली आहेत. तिच्या फिटनेसचा फंडा काहिही असला तरी करिना आजही तितकीच फिट असून दिवसेंदिवस तिच्या सौैंदर्यात अधिकच भर पडत आहे हे नक्की.


आणखी वाचा


श्रिया पिळगांवकर दिसणार ब्रिटीश सीरिज ‘बीचम हाऊस’मध्ये


दीपिकाने रणवीर सिंगची का केली बॅटने 'धुलाई'


करिनाने मला लग्नाचे आमंत्रण... वाचा इतक्या वर्षानंतर काय म्हणाला शाहीद


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम