सैफला केलं ट्रोल, बॉलीवूडची बेबो भडकली

सैफला केलं ट्रोल, बॉलीवूडची बेबो भडकली

करिना कपूर, सैफ अली खान, तैमूर आणि सारा अली खान सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. तैमूरच्या नॅनीच्या पगाराच्या चर्चेला सोशल मीडियावर उधान आलं असताना आता आणखी एका बातमीने पतौडी कुटुंब सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक करिना कपूर तिच्या फिटनेस, ड्रेस सेंस आणि झिरो फिगरसाठी लोकप्रिय आहे. त्यामुळे तिच्या लुकची चर्चा नेहमीच रंगते. शिवाय बेबोचा बिनधास्त अंदाज बॉलीवूडमध्ये सर्वाच्याच परिचयाचा आहे. करिना कपूर तिच्या बेधडक बोलण्यासाठी देखील तितकीच प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी करिनाचे वॅकेशन फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वी तैमूरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सैफ, करिना, सोहा अली खान आणि कुणाल खेमू मालदीवमध्ये गेले होते. या फोटोंमध्ये करिना कपूर तिच्या हॉट बिकनी अवतारात दिसली होती. बेबोने या दरम्यान गुलाबी रंगाची बिकनी घातली होती. तिचा हा हॉट अवतार अनेकांना फारच आवडला होता.


तैमूरच्या 'नॅनी'चा किती आहे पगार, करीना कपूरने केला खुलासा


Kareena Kapoor reply to troller2


सैफ अली खान सोशल मीडियावर झाला ट्रोल


मात्र काही नेटकऱ्यांना बेबोचा हा हॉट  अंदाज काहीसा पसंत नाही आला. त्यामुळे नेटकऱ्यांनी बेबोवरून सैफला ट्रोल करण्यास सुरूवात केली. सोशल मिडीयावर कोणता सेलिब्रेटी कधी ट्रोल होईल हे कधीच सांगता येत नाही. काही चाहत्यांना बेबोचा हा हॉट अवतार मुळीच पसंत नसल्याने त्यांनी सैफ आणि बेबोला ट्रोल केलं. काही ट्रोलर्सनी “सैफ तुला लाज वाटत नाही का? तुझी बायको बिकनी घालते” अशा कंमेट दिल्या होत्या. या कंमेट्सवर बॉलीवूडची बिनधास्त बबो मात्र प्रचंड संतापली आहे. एवढंच नाहीतर तिने यावर त्या ट्रोलर्सना बेधडक उत्तर देखील दिलं आहे. करिना कपूरने ट्रोलर्सना उत्तर देत “सैफ कोण आहे जो मला बिकनी घालू नकोस असं म्हणेल” असं उत्तर देत नेटकऱ्यांचं तोंड बंद केलं आहे. शिवाय तिने “आमचं नातं असं मुळीच नाही ज्यामध्ये सैफ मला बिकनी घाल अथवा नको असं सांगेल. कारण त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे”.  असंदेखील तिने सांगितलं आहे. अरबाज खानच्या क्विक हिल पिंच या नव्या टॉक शोमध्ये ट्रोलर्सनां हे बिनधास्त प्रतिउत्तर दिलं आहे. या शोमध्ये बेबोने तिच्या बाबतच्या अनेक गोष्टी्ंना अशी बेधडक उत्तरे दिली आहेत.


Kareena Kapoor reply to troller


सोशल मीडियावर बेबोचं नाही कोणतंच अकाऊंट


सोशल मीडियावर करिना कपूरचं कोणतही अधिकृत अकाऊंट नाही आहे. फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा कोणत्याच माध्यमावर करिनाचं सोशल मिडिया अकाऊंट नाही. त्यामुळे ती एका फेक अकाऊंटवर अॅक्टिव्ह असते अशी चर्चा आहे. तिच्या फेक अकाऊंटबाबतही तिने खुलासा केला आहे. करिनाने याबाबत खुलासा देत "मी फेक अकाऊंट वापरत नाही मात्र मी एका अज्ञात अकाऊंटवरून सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे".  असं या शोमध्ये सांगितलं आहे. करिना कपूर लवकरच 'गूड न्युज' या तिच्या आगामी चित्रपटातून अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. शिवाय बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या 'दबंग 3' मध्ये करिना कपूरचं एक आयटम सॉंगदेखील असणार आहे. याआधी दबंग 2 मध्येही करिनाचं आयटम सॉंग होतं. या चित्रपटातील 'फेव्हिकॉल से' या गाण्याला चांगलीच पसंती मिळाली होती. त्यामुळे दबंग 3 मधील तिचा आयटम नंबर देखील चाहत्यांना नक्कीच आवडेल. हे ही वाचा समीराने केलं ट्रोलर्सचं तोंड बंद, म्हणाली मी करिना नाही


Kareena Kapoor reply to troller4


अधिक वाचा


लागीरं फेम शिवानी बावकरचा वाढदिवस साजरा, सहकलाकारांनी दिलं ‘शितली’ला सरप्राईज


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम