Four more shots Please3 मध्ये दिसेल का करीना कपूरची गँग

Four more shots Please3 मध्ये दिसेल का करीना कपूरची गँग

चार अचानक झालेल्या मैत्रिणी आणि त्यांच्या आयुष्यात आलेले वेगवेगळे प्रसंग, त्यांची वेगवेगळी लाईफस्टाईल पण तरीही एकमेकांसोबतचे त्यांचे घट्ट असलेले नाते दाखवणारी अमेझॉन प्राईमची Four More Shots चा पहिला भाग चांगलाच गाजला. प्रत्येक मुलीला त्यांच्या मैत्रिणींच्या ग्रुपशी तो कनेक्ट करणारा वाटला. आता लवकरच याचा दुसरा भाग येणार आहे. पण याच्या पुढे येणाऱ्या तिसऱ्या भागाचीही तयारी सुरु झाल्याची कळत आहे. खुद्द करीना कपूर यामध्ये काम करण्यासाठी इच्छुक असल्याचे कळत आहे. करीना कपूरची रिअल लाईफ गर्ल गँग यामध्ये दिसण्याची शक्यता असल्याची चर्चा सगळीकडे होऊ लागली असताना ही चर्चा नेमकी का सुरु झाली आणि या तिसऱ्या सीझनबद्दल नेमके काय खरे आहे ते जाणून घेऊया

अर्चना पूरनसिंहने खराट्याने केलं लॉन स्वच्छ ते पाहून मेड झाली थक्क

शेअर केला फोटो आणि सुरु झाली चर्चा

तर या सगळ्या गोष्टीची चर्चा सुरु झाली ती करीना कपूरच्या इन्स्टाग्राम फोटोमुळे.करीना कपूरची गर्ल गँग म्हणजे करीना, करिश्मा, मलायका आणि अम्रिता. या चौघी एकमेकांपासून कधीच दूर राहत नाही. पण आताच्या या काळात या चौघींना एकमेकांपासून दूर राहावे लागत आहे. त्यामुळेच करीनाने त्यांच्या आठवणीत हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये या चौघी कुठेतरी बाहेर असल्याचे दिसत आहे. हा #throwback फोटो शेअर करत तिने त्यांना किती मिस करत आहे ते सांगितले आहे. पण या फोटोमुळेच सगळ्या गोष्टी सुरु झाल्या आहेत.

तिसऱ्या सीझनमध्ये काम करण्याची दिली ऑफर

Instagram

या फोटोवर करीनाच्या फॅन्सच्या कमेंटस येत असताना त्यावर अमेझॉन व्हिडिओने एक कमेंट दिली आणि मग नवाच विषय सुरु झाला. अमेझॉनने कमेंटमध्ये असे म्हटले की, तुमच्यासाठी एक वेगळाच शो बनवणे चांगले राहील. त्यावर करीनाने अमेझॉनला कमेंट देत Four More Shots 3 करण्याचे संकेत तुम्ही मला देत आहात ना? आता करीनानेच ही कमेंट दिल्यानंतर याचा आणखी एक भाग येईल आणि यामध्ये करीनाची गर्लगँग दिसेल अशी चर्चा होऊ लागली. 

रामायणमधील ‘लवकुश’ सध्या काय करतात, कुश आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता

आणखी काही सीरिज करण्याचा दिला सल्ला

आता करीनाच्या फॅन्सनी तिला एवढ्या सीरिजवर थांबू दिले नाही. तर वेगवेगळ्या सीरिज करण्याचा सल्ला ही दिला. त्यामुळे सध्या सगळीकडे ही एकच चर्चा रंगली आहे. त्यामुळे करीना कपूरचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. 

लालसिंह चड्ढामध्ये दिसणार करीना

लॉकडाऊन होण्याआधी सगळ्यात शेवटी करीनाचा अंग्रेजी मीडियम हा चित्रपट रिलीज झाला. त्यानंतर सगळे चित्रपट गृह बंद करण्यात आले. आता लवकरच लॉकडाऊन संपण्याची शक्यता आहे. त्यानंतर कदाचित करीनाच्या लालसिंह चड्ढाचा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. सध्या करीना आपला सगळा वेळ कुटुंबासोबत घालवत आहे. तैमुरसोबत अनेक सैफ आणि करीना आपला हा वेळ सत्कारणी लावत आहे. 


आता तुम्ही Four More Shots अजून पाहिले नसेल तर आजच बघा. कारण ती तुम्हाला तुमचीच कथा व वाटेल. 

काटा लगा फेम शेफाली जरीवाला लागले मातृत्वाचे वेध