या कारणासाठी करिना कपूरचा राग झाला अनावर, व्हिडिओ झाला व्हायरल

या कारणासाठी करिना कपूरचा राग झाला अनावर, व्हिडिओ झाला व्हायरल

सेलिब्रिटींचे आयुष्य हे कधीच खासगी नसते. प्रत्येक पावलावर पापाराझी आणि फॅन्सचा कायम त्यांच्याभोवती गराडा असतो. पण कधी कधी या सगळ्याचा त्यांनासुद्धा कंटाळा येऊ शकतो नाही का? करिना कपूरच्या बाबतीतही असेच काही झाले. मंगळवारी होळीसाठी करिना कपूर घराबाहेर पडली त्यावेळी तिला पापाराझींनी फोटोसाठी थांबवले. तर एका फॅनने फोटोसाठी असा काही हट्ट केला की, करिनाला आपला राग अनावर झाला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद देखील झाला. मग काय करिनाच्या या रागाची चर्चा आता सगळीकडे होऊ लागली आहे. पण करिनाचे चुकले काय? असा प्रश्न सध्या आम्हाला पडला आहे.

प्रसिद्धीसाठीच केले आरोप - सना खानची ऑडिओ क्लीप झाली लीक

नेमके काय झाले?

करिना कपूर आपल्या कुटुंबासोबत होळीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी आधीच तिला पापाराझींनी घेरले होते. तैमुर नॅनीसोबत होता. तर ती त्यांच्या मागून चालत होती. त्या दरम्यान तिच्या मागे मागे एक फॅनसुद्धा चालत होती. करिना जिथे जात होती. ती तिथे तिच्या मागे मागे जात होती. करिनाशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण करिना तिच्याकडे लक्ष देत नव्हती. करिनाने बऱ्याचवेळी तिच्याशी बोलणे कृतीतून टाळले. पण अखेर पापाराझींचे कॅमेरे समोर दिसल्यानंतर त्या फॅनने  करिनाला फोटो काढण्यासाठी जबरदस्ती केली. त्यावर करिना चिडली. ती फोटोसाठी थांबली पण त्यानंतर ती एक क्षणही या ठिकाणी थांबली नाही. 

प्रसिद्धीसाठीच केले आरोप - सना खानची ऑडिओ क्लीप झाली लीक

करिनाचे वागणे फारच चुकीचे

Instagram
Instagram

आता हा व्हिडिओ आल्यानंतर करिनाबद्दल अनेकांनी बोलायला सुरुवात केली. अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. करिनाचे असे वागणे एका स्टारला शोभणारे नाही वगैरे लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. तर काहींनी करिनाला चक्क गुर्मी असल्याचे म्हटले आहे. करिनाने असे वागायला नको होते असे म्हणणारा एक गट तयार झाला आहे. तर दुसरीकडे करिनाच्या समर्थनार्थ तिचे फॅन्स एकवटले आहेत. 

कधीतरी एकटं सोडा

करिनाच्या फॅन्सनी तिची बाजू घेत म्हटले आहे की, ही फॅन करिनाच्या मागे मागे जात आहे. जर एखादी व्यक्ती फोटो देण्याच्या किंवा बोलण्याच्या मूडमध्ये नसेल तर समोरच्याला कळायला हवे. प्रत्येकाला कधी तरी असे वाटते. आपण ही अनेकदा चांगले बोलत नाही. याचा अर्थ आपण वाईट होत नाही. सेलिब्सच्या घराबाहेर फॅन्सचा गराडा नेहमी असतो अशावेळी जर त्यांना त्यांच्यासाठी वेळ काढता येत नसेल आणि त्यांचे फॅन्स त्यांना समजून घेत नसतील तर मग चूक कोणाची? 

आमीरसोबत दिसणार करिना

करिना कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटामध्ये व्यग्र आहे. Good Newws च्या यशानंतर ती आता आणखी एक मोठ्या बॅनरच्या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट आहे ‘लालसिंगचड्ढा’ .या चित्रपटातील आमीरचा लुक आधीच व्हायरल झाला आहे. पण तरीही या चित्रपटाविषयी अधिक माहिती अजून समोर यायची आहे. 


आता सध्या तरी करिनासंदर्भात तिच्या रागाचीच चर्चा होताना दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं ? करिनाचे रागावणे कितपत योग्य होते?

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.