सैफच्या मिशांसोबत खेळताना करिना झाली ट्रोल

सैफच्या मिशांसोबत खेळताना करिना झाली ट्रोल

अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान बॉडीवूडचं एक सेलिब्रेटी कपल आहे. सेैफ, करिना आणि तैमूर यांच्या बातम्या सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच करिना आणि सैफचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामुळे करिनाने ट्रोल झाली आहे. करिना सैफ अली खानच्या मिशांसोबत खेळतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये करिना कपूर काळ्या रंगाच्या टॉप आणि जीन्समध्ये दिसत आहे. सैफ अली खान पिंक कलरच्या टी-शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये दिसत आहे. दोघंही रिलॅक्स मुडमध्ये आहेत आणि करिना सैफच्या मिशांसोबत खेळत आहे. वास्तविक ते दोघंही या फोटोत फार क्यूट दिसत  आहेत. मात्र सोशल मीडियावर काही लोकांनी करिनाला ट्रोल करण्यास सुरूवात केली. काहीजणांनी या फोटोवरून करिनाला हातांसाठी वर्कआऊट करण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी सैफ आणि करिनाच्या वयावरून तिला ट्रोल केले आहे. 


Kareena and saif


करिना आणि सैफचे आगामी चित्रपट


करिना सध्या तिच्या आगामी गुडन्यूज आणि हिंदी मीडियम 2 या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. हिंदी मीडियममध्ये ती अभिनेता इरफान खानसोबत काम करत आहे. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी मीडियम या चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या गुडन्यूजमध्ये करिना अक्षयकुमार, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणीसोबत दिसेल. शिवाय दबंग 3 मध्ये पुन्हा करिनाच्या 'आयटम सॉंग' चा जलवा असेल.  यासोबतच सैफ अली खानच्या लाल कप्तानचा फर्स्ट लुक नुकतंच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तो एका नागा साधूच्या भूमिकेत झळकणार आहे.  तानाजी आणि भूतपुलिस या आगामी चित्रपटांमध्येदेखील सैफ दिसणार आहे. सहाजिकच सैफ आणि करिना त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये सध्या व्यस्त  आहेत.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#kareenakapoorkhan #saifalikhan at #rutujadiwekar


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
असे पडले बेबो आणि सैफ प्रेमात


सैफिना'च्या लग्नाला आता जवळ जवळ सात वर्षे पूर्ण झाली आहेत. आज करिना कपूर आणि सैफ अली खान फिल्म इंडस्ट्रीमधील एक हॉट कपल आहे. या दोघांच्या अफेअर, लग्नाच्या चर्चा फारच रंगल्या होत्या. कारण करिनाने तिच्या करिअरच्या टॉपवर असताना दोन मुलं असलेल्या सैफशी लग्न करण्याचा निर्णय घेतला  होता. करिना आणि सैफ अली खानमधलं वयातलं अंतरही फार होतं. सहाजिकच त्यामुळे या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र करिनाच्या मते जीवनात वाईट काळ असताना तिला अनेक चांगल्या लोकांची साथ मिळाली आहे. करिअरमध्ये कठीण काळ सुरू असताना तिच्या जीवनात सैफ अली खानची एन्ट्री झाली. टशन चित्रपटाच्या दरम्यान सैफ आणि करिना एकमेकांच्या जवळ आले. त्यावेळी सैफ अली खान तिच्यापेक्षा दहा वर्षाने मोठा होता शिवाय त्याला दोन मुलंही होती. मात्र करिना आणि सैफ एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले होते की त्यांनी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. डेट करता करता एक दिवस असा आला की सैफने करिनाला सांगितलं की “मी पंचवीस वर्षांचा तरूण नाही की तुला ड्रॉप करण्यासाठी रोज रात्री तुझ्या घरी येईन.” त्यानंतर सैफने बबीताला म्हणजेच करिनाच्या आईला याबाबत सांगितलं आणि त्या दोघांनी लग्न केलं. शिवाय आता तैमूरच्या येण्याने त्या दोघांचं जीवन आनंदीच झालं आहे. याबाबत खुद्द करिना कपूरनेच तिच्या एका इन्स्टा अकाऊंटवरून खुलासा केला आहे.


Kareena and saif 1


 


करिना कपूर आणि सैफ अली खानची 'लव्हस्टोरी'


 


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम