तैमूरच्या 'नॅनी'चा किती आहे पगार, करीना कपूरने केला खुलासा

तैमूरच्या 'नॅनी'चा किती आहे पगार, करीना कपूरने केला खुलासा

बॉलीवूड सेलिब्रेटी सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा छोटा नवाब तैमूर अली खान पतौडी (Taimur Ali Khan Pataudi) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर अनेक स्टार किड्स लोकप्रिय आहेत मात्र तैमूरची तर बातच न्यारी. क्यूट तैमूरचा एखादा फोटो असो अथवा त्याने मिडीयाला मारलेली हाक असो सर्वच गोष्टी पटकन व्हायरल होतात. बऱ्याचदा तैमूर त्याची 'नॅनी' अर्थात त्याला सांभाळणाऱ्या मावशींसोबत दिसतो. त्यामुळे तैमूरसोबत त्याची नॅनीदेखील लोकप्रिय झाली आहे. काही दिवसांपासून या नॅनीच्या पगाराविषयी अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. करीना कपूर तैमूरला सांभाळण्यासाठी या नॅनीला 'दीड लाख' पगार देते अशी सध्या चर्चा आहे.आजपर्यंत करिना कपूर अथवा सैफ अली खानने याबाबत कोणताच खुलासाा केला नव्हता. मात्र आता नॅनीच्या पगाराविषयीचे सत्य उघड झाले आहे. कारण आता खुद्द करिनानेच तैमूरच्या नॅनीच्या पगाराविषयी हा खुलासा केला आहे.


taimur 1


तैमूरच्या नॅनीचा पगार एखाद्या 'आय. ई. एस.' ऑफिसरपेक्षाही जास्त आहे अशी चर्चा सर्वत्र सूरू असल्यामुळे करिनाने याबाबतचे सत्य उघड केले आहे. करीनाने "माझ्या बाळाची सुरक्षा मला जास्त महत्वाची आहे. तो जर त्याच्या नॅनीसोबत कन्फर्टेबल असेल तर त्यात काहीच वावगं नाही. त्यामुळे आम्ही नॅनीला किती पगार देतो याविषयी चर्चा करण्याची मुळीच गरज नाही." असं करिनाने तिच्या चाहत्यांना ठणकावलं आहे. खरंतर यामुळे नॅनीचा पगार नेमका किती हे जरी उघड झालं नसलं तरी तो इतर नॅनीपेक्षा जास्त आहे हे पक्कं झालं आहे.


taimur


तैमूरची नॅनी किती घेते पगार


तैमूरला सांभाळणाऱ्या नॅनीचे नाव 'सावित्री' असून तिचा पगार दीड लाखाच्या घरात असण्याची शक्यता आहे. बऱ्याचदा या सावित्री नॅनीला तैमूरसोबत बाहेरगावी प्रवासही करावा लागतो. त्यामुळे त्याचा खर्चही तिला नक्कीच मिळत असणार. त्यामुळे या नॅनीचा पगार दीड ते दोन लाखाच्या घरात असण्याची शक्यता आहे. तैमूर त्याच्या आई-वडीलांसोबत अनेकदा मुळगावी 'पतौडी'मध्ये फिरण्यास जातो. काही दिवसांपूर्वीच सैफ, करिना आणि तैमूर यांचे पतौडी गावात फिरतानाचे आणि त्यांच्या वडिलोपार्जित घरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तैमूरला लहानपणी एवढी प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे आई-वडिलांप्रमाणे तैमूरदेखील सिनेसृष्टी गाजवणार हे यामुळे नक्की झालं आहे.

 सैफ अली खान सोबत तैमूर
 

 

 


View this post on Instagram


 

 

Daddy's day out with this cutie!! #taimuralikhan #saifalikhan #Kareenakapoorkhan


A post shared by Bebo-licious 💕 #dotheishqbaby (@kareena.kkworld) on
अनुष्का- विराटने केली स्पीडबोटची सफर, पाहा व्हिडिओ


अडखळणाऱ्या इंग्रजीमध्ये मागितली मदत, सुषमा स्वराजच्या उत्तरांने जिकलं मन


‘शिमगा’ चित्रपटातून घडणार कोकणातील शिमगोत्सवाचं दर्शन


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम