दबंग 3 मध्ये पुन्हा करिनाच्या 'आयटम सॉंग' चा जलवा

दबंग 3  मध्ये पुन्हा करिनाच्या 'आयटम सॉंग' चा जलवा

‘चुलबूल पांडे’ म्हणजेच सलमान खान ‘दबंग 3’ च्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ मधील चुलबूल पांडेंने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजवलं होतं. दबंगच्या दोन्ही भागात चुलबूल पांडे (सलमान खान) आणि रज्जोचे (सोनाली सिन्हा) दमदार संवाद, चुलबूड पांडेचा अनोखा अॅक्शन अंदाज  आणि  थिरकायला लावणारे आयटम सॉंग या सर्वच गोष्टी जबरदस्त होत्या. दबंगच्या दोन्ही भागांनी चाहत्यांच्या मनावर मोहिनी घातली. ‘दबंग 2’ नंतर तब्बल सात वर्षांनी आता पुन्हा या चित्रपटाचा सिक्वल येत आहे. महत्त्वाचं म्हणजे सलमान आणि सोनाक्षीप्रमाणे पुन्हा एकदा करिना कपूरच्या आयटम  सॉंगचा जलवा असणार आहे. दबंग चित्रपटतील हे आयटम सॉंग कोरिओग्राफर प्रभू देवा दिग्दर्शित करणार आहे. 'दबंग 3' चं शूटिंग मार्चमध्ये सुरू होणार असल्याची चर्चा आहे. दबंग चित्रपटात सलमान सोबत पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेच शिवाय या सिक्वलमधून महेश मांजरेकर यांची कन्या अश्नमी मांजरेकर प्रथमच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सहाजिकच या सर्व गोष्टींंमुळे भाईजानच्या या सिक्वलबाबत प्रचंड उत्सुकता चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. 


salman


प्रेक्षकांच्या मनावर करिनाची जादू पुन्हा एकदा


‘दबंग 2’ मधील ‘फॅव्हिकॉलसे हे’ आयटम सॉंग खूपच गाजलं होतं. आता पुन्हा एकदा या चित्रपटातील आयटम सॉंगसाठी करीनाची वर्णी लागली आहे. खरंतर ‘दबंग’ मधील मलायका अरोराच्या ‘मुन्नी बदनाम हुई’ या आयटम सॉंगनेही प्रेक्षकांना अक्षरशः थिरकायला भाग पाडलं होतं. शिवाय अनेक चित्रपटांमधील मलायकाच्या आयटम सॉंग्स्ज आजही गाजत आहेत. मलायका अरोरा आणि आयटम सॉंग्ज असं समीकरणच चाहत्यांच्या मनात निर्माण झालं होती. मलायका आणि अरबाज खान यांच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे कदाचित दबंगच्या पुढील भागांमधून मलायका गायब झाल्याची चर्चा आहे. आता दबंग 3 साठी पुन्हा करिना कपूरची निवड करण्यात आल्याने याबाबत चर्चेला उधाण आलं आहे.  दबंग 3 चा निर्माता अरबाज खान असल्याने मलायकाला या सिक्वलपासून दूर ठेवण्यात आलं असण्याचीही शक्यता आहे. शिवाय यामुळे आता सलमान खान निर्मित पुढील कोणत्याही चित्रपटात मलायका अरोरा नसणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. खरंतर मलायका आणि अरबाज खान यांच्यातील नातं संपलं असून दोघंही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. सध्या मलायका अर्जून कपूरला डेट करत आहे तर अरबाज खानचे सूत गर्लफ्रेंड जार्जियासोबत जुळले आहेत. मात्र असं असूनही अरबाज आणि मलायका पुन्हा एकत्र काम करणार नाहीत हे आता सिद्ध झालं आहे.


kareena and malayka


सलमान सध्या भारतच्या शूटिंगमध्ये व्यस्त


सलमान खानच्या ‘भारत’चीही चर्चा सर्वत्र सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारत चित्रपटाचं टिझर रिलीज झालं. या टिझरमधील सलमानची दमदार एंट्री आणि जबरदस्त डायलॉगमुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रंचड उत्सुकता निर्माण झाली आहे. भारत जूनमध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. सलमान खानच्या यामध्ये वीस वर्षापासून साठ वर्षांपर्यंतच्या पाच विविध भूमिका असणार आहेत. भारतमध्येअभिनेता जॅकी श्रॉफ, तब्बू, कतरीना कैफ आणि दिशा पटनी अशी स्टारकास्ट असणार आहे.


bharat salman pic


अधिक वाचाः


सोनाली बेंद्रे इज ‘बॅक’, शुटींगला केली सुरुवात


‘भाईः व्यक्ती की वल्ली’ चित्रपटातील लुक साकारण्यासाठी तिरूपतीहून मागवण्यात आले केस


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम