आजही चालते करिश्माच्या डान्सची जादू

आजही चालते  करिश्माच्या डान्सची जादू

बॉलीवूडची लोलो अर्थात करिश्मा कपूरच्या अभिनय आणि डान्सचे आजही अनेक चाहते आहेत. खरंतर कपूर घराण्याला अभिनयाचा समृद्ध वारसा लाभला आहे. मात्र असं असूनही अभिनय क्षेत्रात प्रवेश करणारी करिश्मा ही कपूर घराण्यातील पहिली महिला आहे. करिश्माने केवळ बॉलीवूडमध्ये पदार्पणच केलं नाही तर तिच्या सक्षम अभिनय, सौंदर्य आणि नृत्यकलेने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. अनेक हिट चित्रपटांमधून काम केल्यानंतर करिश्मा काही वर्षांपासून या क्षेत्रापासून दूरावली होती. मात्रा आता पुन्हा एकदा करिश्माच्या सौंदर्य  आणि नृत्याची जादू चाहत्यांना पाहता येणार आहे. लवकरच करिश्मा ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

वास्तविक या शोमध्ये करिश्माची बहीण आणि बॉलीवूडची बेबो करिना कपूर परिक्षकाची भूमिका साकारत आहे. तिच्यासोबत कोरिओग्राफर बॉस्को आणि रॅपर रफ्तारदेखील आहेत. मात्र करिना काही दिवसांपासून तिच्या शूटिंगच्या शेड्यूलमध्ये व्यस्त झाली आहे. ज्यामुळे करिश्माला या शोमध्ये जजची भूमिका साकारावी लागणार आहे. कारण काहीही असलं तरी करिश्माला पाहण्यासाठी तिचे चाहते नक्कीच उत्सूक आहेत. 

लोलोचं झालं असं स्वागत

करिश्माचं ‘डान्स इंडिया डान्स’ शोचं मध्ये जंगी स्वागत झालं आहे. या कार्यक्रमाच्या पुढील एपिसोडचं शूटिंग झालं असून त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या शोमध्ये जेव्हा  करिश्माचं आगमन झालं तेव्हा प्रेक्षक आणि स्पर्धकांनी तिचं अगदी जंगी स्वागत केलं. करिश्मा सेटवर येताच चाहते तिला डान्स सादर करण्याची विनंती करू लागले. चाहत्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत करिश्मा आणि कोरिओग्राफर बॉस्कोने एक नृत्याविष्कार सादर केला. ज्याला प्रेक्षकांनी फारच उत्फुर्त प्रतिसाद दिला. या डान्सच्या वेळी वयाच्या पंचेचाळीशीतही करिश्माची तिच अदा प्रेक्षकांना पाहता आली. करिश्माचा हा डान्स पाहून स्पर्धकांनाही तिच्यासोबत डान्स करण्याचा मोह आवरता नाही आला. मग करिश्माने या शो दरम्यान हार्दिक रावतसोबत ‘इश्क वाला लव्ह’ या गाण्यावर ताल धरला. 

करिश्माचा ग्लॅमरस लुक

डान्स इंडिया डान्सच्या या एपिसोडमध्ये करिश्माने पिंक कलरचा शिमर लुक गाऊन परिधान केला होता. ज्यामध्ये ती फारच हॉट आणि सेक्सी दिसत होती. या गाऊनवर तिने हाय पोनीटेल बांधला होता आणि अगदी सौम्य मेकअप केला होता.ज्यामुळे तिच्या रूपात अधिकच भर पडली होती. करिश्माच्या डान्स आणि लुक दोन्ही गोष्टींमुळे हा एपिसोड हिट झाला. लवकरच हा एपिसोड टेलीव्हिजनवर प्रदर्शित केला जाईल. मात्र तोपर्यंत सोशल मीडियावर या लुक आणि डान्स चांगलाच व्हायरल होत आहे. 

करिश्माचे करिअर

करिश्मा कपूर लवकरच अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत आहे. करिश्मा मेंटलहूड या वेबसिरिजमधून कमबॅक करत आहे. एकता कपूर मेंटलहूड या वेबसिरिजची निर्मिती करत आहे. 2012 मध्ये करिश्मा ‘डेंजरस इश्क’ या चित्रपटातून झळकली होती. मात्र त्यानंतर तिने चित्रपटात काम करणं कमी केलं होतं. लग्न, मुलांचे संगोपन, घटस्फोट या सर्व गोष्टींमुळे ती बॉलीवूडपासून दूरावली होती. मात्र आता करिश्माची मुलं मोठी झाली आहेत. त्यामुळे ती पुन्हा आपल्या करिअरला सुरूवात करण्यास सज्ज झाली आहे. काहीही असलं तरी पुन्हा करिश्माला पाहण्यासाठी तिचे चाहते नक्कीच उत्सुक आहेत.
अधिक वाचा

करिना कपूर आणि सैफ अली खानची 'लव्हस्टोरी'

अमृता पवार साकारणार 'स्वराज्य जननी जिजामाता

'हे' चित्रपट केले असते तर आज वेगळ्याच उंचीवर असतं हृतिकचं करिअर

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम