'मेंटलहुड'मधून करिश्मा कपूर करत आहे कमबॅक

'मेंटलहुड'मधून करिश्मा कपूर करत आहे कमबॅक

लग्नानंतर चित्रपटातून गायब झालेल्या अभिनेत्री आई झाल्यानंतर मदरहूड करुनच मग कमबॅकचा विचार करतात. अशी अनेक उदाहरण आहेत. दूर कशाला पतौडी घराण्याची सून बेबो अर्थात करिना कपूर खान याचे उत्तम उदाहरण आहे. आता करिनाचीच बहीण आणि 90 च्या दशकातील सूपरस्टार करिश्मा कपूर कमबॅक करत आहे. आता तुम्ही म्हणाल कमबॅक करायला ती तर अनेक रिअॅलिटी शो आणि जाहिरातीत दिसते. पण थोडं थांबा कारण करिश्मा कपूर मदरहूड सांभाळल्यानंतर मेंटलहुड सांभाळताना दिसणार आहे. काही कळलं का? अहो करिश्मा चक्क वेबसिरिजमध्ये पाऊल टाकत आहे. आहे की नाही करिश्माच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी.

सलमानसोबत डेब्यू केलेल्या 'या' बॉलीवूड अभिनेत्री हरवल्या कुठे

नुकताच आला ट्रेलर

करिश्माच्या या वेबसिरिजचा नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. यामध्ये करिश्माच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली आहे. प्रत्येक स्त्रीला आई व्हायचे असते. ती आई झाल्यानंतर तिला तिच्या सगळ्या अपेक्षा आपल्या मुलांकडून पूर्ण करुन घ्यायच्या असतात. पण ते करत असताना काही चूका त्यांच्याकडूनही होतात. नाते घट्ट करताना येणाऱ्या अडचणी, मुलांना समजून घेताना होणारे वाद, मुलांसोबत घडणाऱ्या घटना या सगळ्यांचा परिणाम आई आणि कुटुंबावर होत असतो. त्याचा इतका मानसिक ताण असतो की, त्याला मदरहुडपेक्षा मेंटलहुड म्हणणे अधिक योग्य वाटेल असेच या ठिकाणी दाखवण्यात आले आहे. करिश्मा कपूरने या मालिकेत एका सर्वसामान्य आईचा रोल केला असून तिला येणाऱ्या समस्या या सर्वार्थाने सगळ्या महिलांना येत असतील हेच जाणवत आहे.

करिश्मा देऊ शकली नाही नकार

Instagram

अल्ट बालाजीची ही वेबसिरिज असून या मालिकेत करिश्मा कानपूरच्या मीरा नावाच्या एका महिलेचा रोल प्ले करत आहे. तिला जेव्हा या वेबसिरिजबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी स्क्रिप्ट ऐकल्याक्षणी तिने होकार देऊन टाकला. ट्रेलर लाँच झाल्यानंतर झालेल्या एका मुलाखतीत तिने याबद्दल सांगितले आहे ती म्हणाली, की स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी याला नकारच देऊ शकले नाही. इतकी ती मला आवडली. हा विषय प्रत्येकाचा असल्यामुळे मला फारच जवळचा वाटला. प्रत्येक आईने पाहावी अशी ही ‘मेंटलहुड’ मालिका आहे.

फुकरे'फेम जोडी लवकरच अडकणार लग्नबंधनात, समुद्रकिनाऱ्यावर करणार लग्न

मार्च महिन्यात घेता येईल आनंद

Instagram

करिश्माची ही वेबसिरिज मार्च महिन्यात रिलीज होणार आहे. अल्ट बालाजी आणि zee5वर तुम्हाला ती मालिका पाहता येईल. करिश्मासोबत या मालिकेमध्ये डीनो मोरिया, संजय सुरी, श्रुती सेठ सारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक आईने मिस करु नये अशी ही वेबसिरिज आहे.

वेबसिरिज अनेकांच्या आवडीच्या

हल्ली अनेक कलाकारांसाठी वेबसिरिज हे आवडते माध्यम झाले आहे. अनेक मोठे कलाकार हल्ली या माध्यमातून अभिनयाची छाप पाडायला बघत आहेत. शिवाय या माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी ही चांगली आहे. म्हणूनच अनेक जण यामध्ये काम करण्यास उत्सुक आहेत.


त्यामुळे आता प्रत्येक पालकांनी ही वेबसिरिज अगदी आवर्जून पाहावी.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.