कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूरचा ‘दोस्ताना’

कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूरचा ‘दोस्ताना’

दोस्ताना हा चित्रपट म्हटल्यावर आठवतं ते शिल्पा शेट्टीचं सिझलिंग शटअप अँड बाऊन्स हे गाणं, प्रियांकाचा बिकिनी अवतार आणि 'मुंडा साडा' गाण्यातली विनोदी जोडी अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम. हा चित्रपट तेव्हा चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील देसी गर्ल गाण्यामुळे तर प्रियांका निक जोनासला देसी गर्ल असं विशेषणही मिळालं. त्यामुळे धर्मा प्रोडक्शन्सने 'दोस्ताना 2' ची घोषणा केल्यानंतर पुन्हा एकदा दोस्तानाच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

दोस्ताना 2 मध्ये आर्यन आणि जान्हवीची वर्णी

या चित्रपटात नक्की कोण कास्ट होणार याबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. कधी राजकुमार रावचं नाव येत होतं तर कधी सिद्धार्थ मल्होत्राचं. पण अखेर या चित्रपटातील लीड पेअर समोर आलीयं कार्तिक आणि जान्हवी. कार्तिक आर्यनची गणती सध्या बॉलीवूडच्या टॉप अॅक्टर्समध्ये होते तर जान्हवीला धडक या पहिल्या चित्रपटातून काही साध्य करता आलेलं नाही. त्यामुळे दोस्ताना 2 मध्ये तिला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोड्क्शन्सची असून दिग्दर्शन करणार आहे कॉलिन डी कुन्हा ( Collin D’Cunha) ज्याचाही दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. 

ना राजकुमार ना सिद्धार्थ

पण अजून एक सस्पेन्स कायम आहे तो म्हणजे तिसरा अभिनेता कोण असणार. या चित्रपटाचा पहिला भाग लव्ह ट्राएंगल रोमँटीक कॉमेडी असल्यामुळे आता तिसऱ्या चेहऱ्याबाबत उत्सुकता आहे. याबाबत करण जोहरने सांगितलं की, धर्मा प्रोडक्शन्सचा कार्तिकसोबत हा पहिलाच सिनेमा आहे तर तिसऱ्या भूमिकेसाठी एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकते. दोस्तानाच्या सीक्वलसाठी आधी राजकुमार राव आणि सिद्धार्थ मल्होत्राची चर्चा होती. पण करणने याबाबत ट्वीट करून सांगितलं की, दोस्ताना 2 बाबत ज्या चर्चा सुरू आहेत त्या चुकीच्या आहेत.

दोस्ताना 2 ची जादू चालणार का?

'दोस्ताना 2'ची लीड पेअर घोषित होताच आमच्यासारख्या ‘दोस्ताना’च्या फॅन्सच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कारण सिक्वलची घोषणा झाल्यावर त्याची तुलना नेहमीच पहिल्या चित्रपटाशी केली जाते. त्या निमित्ताने पडलेले काही प्रश्न -

  • दोस्तानाची कथा त्या काळाच्या मानाने फ्रेश आणि युनिक होती. त्यामुळे यावेळीही दोस्तानामध्ये काही युनिक असेल का? 
  • या चित्रपटात (बदलत्या काळाप्रमाणे) गे पेअरिंग असणार की पुन्हा एका हिरोईनमागे दोन हिरोंची चढाओढ दिसणार.
  • 'दोस्ताना' मध्ये दिसलेली जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चनची अल्टिमेट केमिस्ट्री पुन्हा दिसू शकेल का?
  • प्रियांका चोप्राने या चित्रपटासाठी खास बिकिनी घालून सीन दिला होता. आता सिक्वलमध्ये बिकिनीच्या अवतारात जान्हवी दिसणार का?
  • शट अप अँड बाऊन्स म्हणत सगळ्यांना आपल्या हॉटनेस आणि ब्युटीने शिल्पा शेट्टीने भुरळ घातली होती. आता शिल्पासारख्या हॉट अंदाजात कोण झळकणार?

असो बेस्ट ऑफ लक टू टीम दोस्ताना 2.