कार्तिकनं सारासोबतचा 'हा' व्हिडीओ केला शेअर, कॅप्शन पाहून चढला पारा

कार्तिकनं सारासोबतचा 'हा' व्हिडीओ केला शेअर, कॅप्शन पाहून चढला पारा

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सारा अली खान आणि कार्तिक आर्यन मुंबईच्या रस्त्यांवर बाईकस्वारी करताना दिसत आहेत. कार्तिकनं आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. "चालान कटेगा और मेरा भी", असं मजेशीर कॅप्शन कार्तिकनं या व्हिडीओला दिलेलं आहे. कार्तिक आर्यनच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. पण व्हिडीओवर सारानं व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कार्तिकनं शेअर केलेल्या व्हिडीओवर सारानं इमोजीच्या माध्यमातून कमेंट केलं आहे.

(वाचा : 'बस्ता'तील अजयनं गायलेलं 'फुल झुलत्या येलीचं' गाणं रिलीज)

View this post on Instagram

Challan Katega Aur mera bhi ....

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

'लव आज कल' व्हॅलेंटाईन डेला होणार रिलीज

सध्या सारा आणि कार्तिक त्यांचा आगामी सिनेमा 'लव आज कल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्तत आहे. हा सिनेमा 14 फेब्रुवारी म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे'ला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. साराच्या आगामी सिनेमांसंदर्भात सांगायचं झालं तर 'लव आज कल (Love Aaj Kal)' नंतर 'कुली नंबर वन' सिनेमा रिलीज होणार आहे. त्यानंतर सारा अक्षय कुमार आणि धनुषसोबत 'अतरंगी रे' सिनेमामध्येही दिसणार आहे. कार्तिक देखील 'भुलभुलैया 2' आणि टी-सीरीजच्या आगामी अॅक्शन सिनेमामध्ये दिसणार आहे. एकूणच सारा आणि कार्तिकच्या चाहत्यांना आगामी काळात दोघांचेही धमाकेदार सिनेमे लवकरच पाहायला मिळणार आहेत.

(वाचा : डान्स दिवाचा संघर्ष! कधीकाळी लॉटरी विकायची नोरा फतेही)

 

सारा 'या' व्यक्तीशिवाय जगू शकत नाही

साराच्या चित्रपटांबरोबरच तिचं कार्तिकबरोबर असलेलं अफेअर आणि लग्नाच्या चर्चांनाही उधाण आलंय. या सर्व चर्चांना साराने एका मुलाखतीमध्ये मनमोकळेपणाने उत्तरं दिली आहेत. साराने करण जोहरच्या शोमध्ये कार्तिक आर्यनला डेट करायला आवडेल, असं सांगितलं होतं. तेव्हापासून चर्चा अधिक रंगू लागल्या आहेत. पण आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे तिच्याशिवाय सारा जगू शकत नाही आणि ती म्हणजे तिची आई अमृता सिंग. सारा आपल्या आईसोबतच राहते. ‘मला संपूर्ण आयुष्य माझ्या आईबरोबरच राहायचं आहे. मला तिच्याबरोबर फिरायला खूप आवडतं. ती एक दिवस जरी माझ्यापासून दूर असेल तरी मला तिची खूप आठवण येते. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही’, असं सारानं मुलाखतीत सांगितलं. सारा नेहमीच आपल्या आईबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

(वाचा : सुभाष घईंचा मराठी सिनेमा 'विजेता' या दिवशी झळकणार बॉक्सऑफिसवर)

साराबाबत काही खास गोष्टी …

साराने न्यु-यॉर्कच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीतून पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. साराला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. साराने 'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटातून चाहत्यांच्या मनात घर केलेल्या सारा अली खानला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. साराला लहान वयातच चांगली प्रसिद्धी मिळत आहे. केदारनाथ चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला असला तरी खरी प्रसिद्धी तिला सिम्बामधील अभिनय कौशल्यामुळे मिळाली.

हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.