अभिनेता कार्तिक आयर्नने केला एक मोठा खुलासा, लवकरच करणार लग्न

अभिनेता कार्तिक आयर्नने केला एक मोठा खुलासा, लवकरच करणार लग्न

लॉकडाऊनमध्ये अनेक ट्रेंड सोशल मीडियावर पाहायला मिळाले. गेल्या काही महिन्यांपासून आणखी एक नवा ट्रेंड सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये #Ask च्या माध्यमातून चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांना काही प्रश्न विचारतात. ज्या प्रश्नांवर कलाकारही उस्फुर्तपणे आणि बेधडक उत्तरे देतात. अभिनेता कार्तिक आर्यननेही असंच आपल्या एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला बिनधास्त उत्तर दिलं आहे. या उत्तरातून कार्तिक लवकरच लग्न करणार असं वाटत आहे.

कार्तिक आर्यनला लवकरच करायचं आहे लग्न

सोशल मीडियावर #AskKartik म्हणत कार्तिकच्या एका फॅनने त्याला प्रश्न विचारला होता की, तू लग्न कधी करणार आहेस? वास्तविक असा प्रश्न नेहमीच चाहते त्यांच्या आवडत्या सेलिब्रेटीजना करत असतात. कार्तिकनेही त्याच्या खास शैलीत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. कार्तिकने शेअर केलं आहे की, “आताची वेळ ही लग्नासाठी खरंतर अगदी बेस्ट आहे. कारण या काळात लग्न केलं तर खर्च कमी होऊ शकतो.” त्यानंतर आणखी एका चाहत्याने त्याला जरा जास्तच खोचक प्रश्न विचारला होता. त्याला विचारण्यात आलं होतं की तू लॉकडाऊनमध्ये लग्न केलं आहेस अशी चर्चा आहे, हे खरं आहे का ? त्यावर कार्तिकने मजेदार उत्तर दिलं आहे. कार्तिकने शेअर केलं आहे की, “ज्या गतीने सर्व काही सध्या सुरू आहे. यावरून मला बाळ देखील लॉकडाऊनमध्ये होऊ शकतं.” या दोन प्रश्नांना दिलेल्या उत्तरावरून सोशल मीडियावर कार्तिकच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आलं आहे. या व्यतिरिक्त आणखी अनेक प्रश्न चाहत्यांनी कार्तिकला विचारले आहेत. त्याची त्याने जबरदस्त उत्तरे सोशल मीडियावर दिली आहेत.

कार्तिकला फॅन्स का विचारत आहेत हा प्रश्न

लॉकडाऊन संपून सगळीकडे अनलॉकचा टप्पा हळूहळू सुरू होत आहे. मात्रं असं असुनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. अनलॉकमध्येही लॉकडाऊनप्रमाणेच स्थिती पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत मालिका आणि चित्रपटांचे शूटिंग सुरू झालं असलं तरी अनेक कलाकार सुरक्षेसाठी घरातच राहणं पसंत करत आहेत. कारण बॉलीवूडच्या अगदी महानायकापासून अनेक कलाकारांना कोरोनाचा प्रादूर्भाव झालेला आहे. त्यामुळे घरात राहूनच फॅन्सच्या संपर्कात राहणं सुरक्षेचं ठरणार आहे. अनेक महिने घरातूनच सर्व सेलिब्रेटी सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. कार्तिक आर्यनचेदेखील  सोशल मीडियावर अनेक फॉलोव्हर्स आहेत. या चाहत्यांच्या सतत संपर्कात राहण्यासाठी कार्तिक सतत त्यांचे अनेक फोटो आणि अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असतो. लॉकडाऊन पूर्वी तो ‘लव आज कल’ या चित्रपटामध्ये सारा अली खान सोबत दिसला होता. शिवाय सारा आणि कार्तिक नेहमी एकत्र दिसत असतात. ज्यामुळे काही दिवसांपासून कार्तिक आणि साराच्या अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. कार्तिक आणि साराची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन अशी दोन्ही केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच पाहायला आवडते. चित्रपटाप्रमाणे खऱ्या आयुष्यातही या दोघांना भविष्यात एकत्र पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. आता सोशल मीडियावर लग्नाचा मुद्दा छेडला गेल्यावर कार्तिकने जे मजेशीर उत्तर दिलं आहे. यावरून तो सारासोबतच लवकर लग्न करण्याचा विचार करत आहे असंच चाहत्यांना वाटू लागलं आहे.