अभिनेता कार्तिक आर्यनने केलं '8' किलो वजन कमी

अभिनेता कार्तिक आर्यनने केलं '8' किलो वजन कमी

अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘लव्ह आज कल 2’ लवकरच प्रदर्शित होत आहे. यामध्ये कार्तिक आणि सारा अली खानची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आतापर्यंत कार्तिकने त्यांच्या चार्मिंग लुक आणि निरनिराळ्या भूमिकांमधील सक्षम अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. इम्तियाज अलीच्या  ‘लव आज कल 2’ चं ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं ज्यामध्ये कार्तिक दोन वेगवेगळ्या लुकमध्ये दिसत आहे. यातील एका लुकसाठी कार्तिकने त्याचं जवळजवळ '8' किलो वजन कमी केलं आहे. याबाबत कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून खुलासा केला आहे. त्याने एका पोस्टमध्ये त्याच्या लव्ह आज कल मधील फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. 

कार्तिकने का केलं वजन कमी

‘लव्ह आज कल 2’ च्या ट्रेलरमध्ये निरनिराळे दोन काळ दाखवण्यात आले आहेत. ज्या दोन काळातील लुकमध्ये दोन वेगवेगळ्या भूमिकेत कार्तिक आणि सारा दिसत आहेत. या चित्रपटात कार्तिक रघू आणि वीर अशा दोन भूमिका साकारणार आहे. रघू नव्वदीच्या काळातील एक शाळेत जाणारा किशोरवयीन मुलगा आणि वीर आजच्या काळातील तरूण आहे. कार्तिकने नव्वदच्या काळातील रघू नावाचा शालेय विद्यार्थी दिसण्यासाठी फारच मेहनत घेतलेली दिसत आहे. कलाकारांना चित्रपटातील त्यांच्या  भूमिकांसाठी निरनिराळे प्रयोग नेहमीच करावे लागतात. कधी कधी एखादी भूमिका साकारण्यासाठी कलाकारांना त्यांच्या लुकवर नेहमीपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. कार्तिकनेही रघूची भूमिका साकारण्यासाठी तब्बल '8' किलो वजन कमी केलं आहे. कारण नव्वदच्या काळातील किशोरवयीन दिसण्यासाठी कार्तिकला थोडं बारीक दिसणं गरजेचं होतं. वजनासोबतच कार्तिकने या भूमिकेसाठी हटके हेअरस्टाईलही केली आहे. शाळेच्या युनिफॉर्ममधील त्याचा हा लुक चाहत्यांना नक्कीच आवडला आहे. 

कार्तिक आणि साराची जोडी लोकप्रिय


कार्तिक आर्यन सध्या प्रेक्षकांमध्ये आणि विशेष म्हणजे फिमेल फॅन्समध्ये प्रंचड लोकप्रिय  आहे. जो प्रेक्षकांचा फेव्हरेट आहे तोच बॉलीवूडमधल्या अभिनेत्रींच्या फेव्हरेट लिस्टमध्ये असणं साहजिक आहे. त्यामुळे कार्तिक सध्या नव्या जनरेशनच्या अभिनेत्रींच्या हॉट फेव्हरेटमध्ये आहे.  सारा अली खान, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, आलाया फर्निचरवाला अशा अनेक अभिनेत्रींनी जाहिरपणे हे कबुलही केलं आहे. मात्र या सर्वांमध्ये कार्तिक आणि सारा हिच जोडी प्रेक्षकांना जास्त आवडत असल्याचं दिसत आहे. ज्यामुळे काही दिवसांपासून कार्तिक आणि साराच्या अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. कार्तिक आणि साराची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन अशी दोन्ही केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच पाहायला आवडते. ज्यामुळे चित्रपटाप्रमाणे खऱ्या आयुष्यातही या  दोघांना भविष्यात एकत्र पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

नेहा कक्कड आणि आदित्यचं लग्न खरंच ठरतंय...

मिसेस मुख्यमंत्रीमधील सुमीचा ऑफस्क्रीन लुक

शेवंताला मिळणार का नाईकांच्या वाड्यात प्रवेशFB Kartik Aaryan reduced his 8 kg weight for Love Aaj Kal role