‘कसौटी’ची प्रेरणाही अडकणार लवकरच विवाहबंधनात, एरिका फर्नांडिसचे शेअर केली पोस्ट

‘कसौटी’ची प्रेरणाही अडकणार लवकरच विवाहबंधनात, एरिका फर्नांडिसचे शेअर केली पोस्ट

एकता कपूरची मालिका 'कसौटी ज़िंदगी की' अगदी सुरुवातीपासूनच कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत प्रकाशझोपात राहिली आहे. कधी कमोलिकाची एंटी म्हणून हिना खानचा प्रवेश तर कधी हिनाने प्रोजेक्टमधून घेतलेली माघार, करण सिंग ग्रोव्हरची बजाज म्हणून झालेली एंट्री तर लगेच एक महिन्यात त्याचं मालिका सोडून जाणं. पुन्हा नव्या कमोलिकाची एंट्री, एरिका आणि पार्थची भांडणं, हिना आणि एरिकाची भांडणं अशा अनेक गोष्टींवरून सतत ही मालिका प्रकाशझोतात आहे. इतकं सगळं असूनही या मालिकेच्या टीआरपीवर मात्र काहीच परिणाम होऊ शकलेला नाही. पण आता पुन्हा एखदा नवी बातमी आली आहे आणि ती आहे या मालिकेची जोडी पार्थ आणि एरिकाच्या बाबतीत. सध्या 'प्रेरणा' अर्थात एरिका फर्नांडिसने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे आणि तो फोटो पाहूनच त्यांचे चाहते विविध अंदाज काढत पार्थ आणि एरिकाने साखरपुडा केल्याचं सांगत आहेत. 

पार्थ आणि एरिकाच्या डेटिंगची सुरुवातीपासूनच होती चर्चा

मालिका 'कसौटी ज़िंदगी की' च्या सुरूवातीपासूनच पार्थ आणि एरिका या दोघांची नावं एकमेकांबरोबर जोडली गेली होती. हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सतत चालू होती. इतकंच नाही तर मध्यंतरी या दोघांमध्ये भांडणं चालू असून दोघांचंही ब्रेकअप झालं असल्याचीही चर्चा होती. पण पार्थ समथानने एरिकाच्या घरी दिवाळी पार्टीला जाऊन या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. पण आता एरिकाच्या शेअर केलेल्या पोस्टमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे आणि त्यावरून या दोघांनी लपून साखरपुडा केला असल्याचा कयास बांधला जात आहे. 

‘कसौटी जिंदगी की’ फेम प्रेरणा आणि कोमोलिकाचं झालं सेटवर भांडण

एंगेजमेंट रिंगचा फोटो केला शेअर

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एरिकाने एंगेजमेंट रिंग दाखवून एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये तिच्या जोडीदाराचा हातही दिसून येत आहे. पण या व्यक्तीचा चेहरा या फोटोमध्ये नाही. इतकंच नाही तर एरिकाने  ही पोस्ट शेअर करताना भावनिक पोस्टदेखील लिहिली आहे. ‘जेव्हा मी तुझ्याबरोबर असते तेव्ही मी खूपच वेगळी असते, अर्थात नक्कीच हे चांगल्या अर्थाने आहे. मी जास्त हसत असते, जास्त आनंदी असते. तुझ्याबरोबर असताना मी खोटं नाही तर अगदी मनापासून हसते. तुझ्याबरोबर असताना मला जास्त सुरक्षित वाटतं आणि प्रेमाची भावना मला जास्त कळून येते...अशावेळी मला अजिबात दुःख आणि एकटेपणा जाणवत नाही. तुझ्याशी बोलणं अतिशय सोपं आहे कारण माझी प्रत्येक गोष्ट तू ऐकून घेतोस. तू खरंच माझी काळजी घेतोस, केवळ काळजी घेण्याचं नाटक करत नाहीस. तू जसा आहेस, तसाच मला आवडतोस’ इतकंच नाही तिने याबरोबर हेदेखील स्पष्ट केलं आहे की, ती केवळ कमिटेड आहे. या पोस्टसह तिने लिहिलं, ‘तुम्ही जर हा विचार करत असाल की, मी साखरपुडा केला आहे तर असं काहीच नाही.’

पार्थ समथान आणि हिना खान बनले 2019 चे टॉप टेलीव्हिजन स्टार्स

अनेकांनी दिल्या शुभेच्छा

एरिकाच्या या पोस्टवर एकता कपूरसह इंडस्ट्रीमधील अनेक तिच्या मित्रमैत्रिणींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यावर पार्थची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. इतकंच नाही तर एरिकाच्या या पोस्टवर पार्थने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया वा कमेंट दिलेली दिसून आलेली नाही. त्यामुळे ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून पार्थच असावी असा कयास बांधला जात आहे. अजूनही एरिकाने नक्की कोणत्या व्यक्तीविषयी आपल्या या भावना व्यक्त करून सांगितल्या आहेत हे गुलदस्त्याच आहे. पण तरीही तिच्या चाहत्यांना मात्र तिच्याबरोबर पार्थची जोडी जास्त भावते त्यामुळे त्यांनी पार्थच तिचा जोडीदार असावा असा अंदाज बांधण्यास सुरुवात केली असून तिला शुभेच्छा देत आहेत. 

‘कसौटी जिंदगी’च्या सेटवर जेव्हा प्रेरणाने लावला कोमोलिकाला रंग

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.