पार्थ समथानने घेतला ‘कसौटी जिंदगी की’ सोडण्याचा निर्णय

पार्थ समथानने घेतला ‘कसौटी जिंदगी की’ सोडण्याचा निर्णय

एकता कपूरची पहिली ‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका खूपच गाजली होती. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी आता पुन्हा ही मालिका सुरू करण्यात आली. पण या मालिकेला एक प्रकारचे ग्रहणच लागलेले दिसून येत आहे. टीआरपीच्या रेसमध्ये जरी ही मालिका टिकून असली तरीही पहिल्यांदा बजाजची भूमिका करण सिंह ग्रोव्हरने केली आणि काही काळातच त्याने ही मालिका सोडली. कमोलिकाची भूमिका साकारणारी हिना खानने काही वेळ ही भूमिका साकारली आणि नंतर ही भूमिका अमना शरीफच्या वाट्याला आली. तर आता अनुरागची मुख्य भूमिका साकारत असलेला पार्थ समथाननेही ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळत आहे. त्याने आपला राजीनामा बालाजी प्रॉडक्शन हाऊसला दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर मालिकेतील अजून एक कलाकार साहिल आनंद जो अनुपम सेनगुप्ताची भूमिका साकारत आहे त्यानेही ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.

Good News: अभिनेत्री पूजा बॅनर्जी होणार आई, लॉकडाऊनमध्येच केलं लग्न

राजीनाम्याचा स्वीकार नाही

अजूनही पार्थ आणि साहिल दोघांच्याही राजीनाम्याचा स्वीकार करण्यात आलेला नाही. तर एकता कपूर पार्थ समथानने या मालिकेत टिकून राहावं यासाठी त्याची समजूत काढण्याचा सध्या प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे. दोघांमध्येही सध्या बोलणी चालू असून दोन्हीकडून कोणत्याही प्रकारचे  स्टेटमेंट मात्र देण्यात आलेले नाही. काही दिवसांपूर्वीच पार्थला कोरोना झाला होता. त्यावेळीदेखील पार्थ लवकरात लवकर बरा होऊ दे यासाठी संपूर्ण युनिट प्रार्थना करत होते. पार्थ परत आल्यावर सर्वांनीच खेळीमेळीने त्याचे स्वागत केले. मात्र आपल्या तब्बेतीच्या कारणासाठी सध्या पार्थ अधिक आराम करू इच्छित असल्याचे कळत आहे. त्यामुळेच पार्थने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचेही कळत आहे.  

रेकॉर्ड ब्रेक ठरला तानाजी, यंदा 'या' बॉलीवूड चित्रपटांना छोट्या पडद्यावर सर्वाधिक पसंती

पार्थची तब्बेत ठीक असून दुसऱ्या कामाच्या शोधात

View this post on Instagram

Thankyou 😇

A post shared by Parth Samthaan (@the_parthsamthaan) on

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पार्थ कोरोनामधून बरा झाला असून आपल्या तब्बेतीची व्यवस्थित काळजी घेत आहे. पण कोणतेही दुसरे काम मिळाल्यामुळे पार्थ ही मालिका सोडत नसून तो सध्या दुसऱ्या कामाच्या शोधात आहे. पण या मालिकेतून बाहेर पडण्याचा मात्र त्याचा निर्णय पक्का झाल्याचे सांगण्यात आले आहे. इतकेच नाही तर प्रॉडक्शन हाऊसने पार्थच्या जागी नव्या कलाकाराचा शोधही सुरू केला आहे. मात्र तरीही एकता कपूर पार्थला टिकून राहण्यासाठी समजावत असल्याचेही सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. ही मालिका सध्या चांगली चालू असून याचा टीआरपीदेखील चांगला आहे. त्यामुळे सध्या मालिकेत असणाऱ्या कलाकारांनी  टिकून राहणे गरजेचे  आहे. नुकतंच करण पटेलला बजाजची भूमिका मिळाली असून करण सिंह ग्रोव्हरच्या जागी आता करण पटेल ही भूमिका साकारत आहे. कितीही नाही म्हटलं तरी एखाद्या  भूमिकेत एखाद्या कलाकाराला बघण्याची सवय झालेली असते आणि कलाकार बदलला की त्याचा परिणाम मालिकेच्या टीआरपीवरदेखील होत असतो. पार्थचा खूपच चांगला फॅन फॉलोईंग आहे. त्यामुळे आता पार्थने ही मालिका सोडल्यानंतर त्याची जागा कोण घेणार असाही प्रश्न चाहत्यांना पडला असणार. मात्र अजूनही याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.  

गुंजन सक्सेना' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, वायूसेनेला बदनाम करण्याचा आरोप

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा