कसौटी जिंदगी की 2 मालिकेतून हिना खान बाहेर पडल्याची चर्चा आहे. ही मालिका सोडल्यानंतर हिना खान सध्या तिच्या कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. हिना खान तिच्या कुटुंबासोबत मालदीवमध्ये वेकशनवर गेली आहे. या वेकेशन ट्रीपचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या वेकेशनवर हिना खान फारच आनंदी दिसत आहे. घरातील सर्वांसोबत या वेकेशनचा ती आनंद लुटत आहे. उन्हाळा एन्जॉंय करण्यासाठी अनेक सेलेब्रेटी मालदीवमध्ये जातात.शिवाय कामाच्या दगदगी आणि ताणाला दूर ठेवण्यासाठी मिनी ब्रेकची गरज सर्वांनाच असते. हिना खानदेखील यासाठीच तिच्या आई-वडीलांसोबत मालदीवमध्ये गेली आहे. या मिनी ब्रेकनंतर पुन्हा ती एका वेगळ्या भूमिकेसह चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
या फोटोमध्ये हिना खान तिच्या ट्रॉली बॅगसोबत मालदीवमध्ये पोहचल्याचे दिसत आहे
View this post on Instagram
या फोटोंमध्ये हिना खान सुट्टींचा मनसोक्त आनंद घेताना आणि रिलॅक्स मूडमध्ये
View this post on InstagramBreathe it all in, Love it all out #Maldives @tajmaldives @madamefashions @instagladucame
हिना खान तिच्या आई-वडीलांसोबत समुद्रात पोहण्याच्या तयारीत असतानाचा फोटो
कोमलिकाच्या भूमिकेला हिनाचा रामराम
टीव्ही अभिनेत्री हिना खान ‘कसौटी जिंदगी की 2’ (Kasautii Zindagii Kay) या मालिकेपूर्वी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या हिंदी मालिकेत दिसली होती. या मालिकेमध्ये तिने आदर्श सून अक्षरा सिंघानियाची भूमिका साकारली होती. शिवाय रिएलिटी शो ‘बिग बॉस’ मध्ये रनर अप म्हणून जिंकल्यावर तिला तिची प्रतिमा बदलण्याची गरज वाटू लागली होती. म्हणूनच हिना खानने एकता कपूरची प्रसिद्ध हिंदी मालिका कसौटी च्या रीबूटमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. हिना खानला या मालिकेमध्ये कोमोलिकाची भूमिका करण्याची संधी मिळाली आणि तिनेही ऑफर झटपट स्वीकारली. हिना खान साकारत असलेली कोमलिकाची भूमिका लोकांना आवडू लागली होती. मात्र काही जुन्या कमिटमेंटसमुळे आणि मालिकेत निर्माण झालेल्या वादांमुळे हिना खानने या मालिकेतून ब्रेक घेतला असल्याची चर्चा आहे.
Good News : अनुष्का - विराटच्या घरी येणार नवा पाहुणा
अक्षय कुमारची मुलगी 'नितारा'चे जिमनॅस्टिक ट्रेनिंग सुरू
कसौटी जिंदगी की : प्रेरणा आणि अनुराग एकमेकांना करत आहेत का डेट
फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम