‘कसौटी जिंदगी की’ फेम प्रेरणा आणि कोमोलिकाचं झालं सेटवर भांडण

‘कसौटी जिंदगी की’ फेम प्रेरणा आणि कोमोलिकाचं झालं सेटवर भांडण

टीव्ही सीरियल ‘कसौटी जिंदगी की’ (Kasautii Zindagii Kay) च्या कलाकारांनी खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं. या सीरियलमध्ये प्रेरणा आणि कोमोलिकामध्ये वैर असल्याचं दाखवण्यात आलंय. जिथे प्रेरणा पॉजिटीव्ह रोलमध्ये आहे तिथे कोमोलिका चलाख आणि निगेटीव्ह रोलमध्ये आहे. यामुळे प्रेक्षक प्रेरणाची भूमिका करणाऱ्या एरिकाबाबत सॉफ्ट कॉर्नर ठेवून आहेत तर कोमोलिकाच्या भूमिकेत असलेल्या हिना खानचा रागराग करत आहेत. या ऑनस्क्रीन वैर भावनेचा एवढा परिणाम आता ऑफस्क्रीनही दिसत आहे.


रील आणि रियल


अनेक तास एकत्र काम करणाऱ्या कलीग्जमध्ये कधी कधी चांगली मैत्री होते तर कधी कधी ते एकमेकांचे शत्रू होतात. मनोरंजन जगतात ही असंच काहीसं चित्र आहे. जिथे काही स्टार्स एकमेकांच्या प्रेमात पडतात तर काहीजणांना एखादी व्यक्ती डोळ्यासमोर आलेलीही आवडत नाही. टीव्ही सीरियल ‘कसौटी जिंदगी की’ च्या सेटवरही असंच काहीसं दिसतंय.


kasautii-zindagii-kay-anurag-to-marry-komolika-6


सीरियलमध्ये एकमेकांची सवत असणाऱ्या एरिका आणि हिना यांनी आपापल्या भूमिका फारच गंभीरतेने घेतल्या आहेत. त्या दोघीही रील आणि रियल लाईफमध्येही एकमेंकाच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत. एरिका फर्नांडिसला सोडून हिना खान सेटवर सगळ्यांची मैत्रीण झाली आहे.  


kasautii-zindagii-kay-gossip-of-cold-war-between-hina-khan-and-erica-fernandes


सेटवर सुरू आहे कोल्ड वॉर
सीरियल ‘कसौटी जिंदगी की’ च्या ट्रॅकबाबत बोलायचं झाल्यास प्रेरणा आपल्या हक्काच्या लढाईसाठी बासू हाऊसमध्ये आली आहे. अनुराग (पार्थ समथान- Parth Samthaan) चं कुटुंब म्हणजेच बासू कुटुंबियातील कोणीही प्रेरणाला सदस्य म्हणून स्वीकारण्यास तयार नाहीये. तर कोमोलिका आपली सवत प्रेरणाला धमकावण्याची कोणतीही संधी सोडत नाहीये.


kasautii-zindagii-kay-gossip-of-cold-war-between-hina-khan-and-erica-fernandes-1


अनुरागला ही गोष्ट कळून चुकली आहे की, जर प्रेरणाला त्याच्या आयुष्यातून दूर केलं नाहीतर कोमोलिका तिला सुखाने जगू देणार नाही. पण सध्या वेगळाच पेच सुरू आहे, ऑनस्क्रीन युद्धाचा परिणाम हिना आणि एरिकाच्या खऱ्या आयुष्यावर पडू लागला आहे. सेटवरील काही सूत्रानुसार दोघीही शूटींगशिवाय एकमेंकीशी अजिबात बोलत नाहीत.


कोमोलिकाच्या अवतारात आता 'ही' अभिनेत्री देणार अनुराग- प्रेरणाला त्रास


हिना खान आणि तिचे को-स्टार्स


टीव्ही अभिनेत्री हिना खान ‘कसौटी जिंदगी की’ (Kasautii Zindagii Kay) आधी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या सीरियलमध्ये दिसली होती. या सीरियलमध्ये ती आदर्श सून अक्षरा सिंघानियाच्या भूमिकेत दिसली होती. तर अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत म्हणजेच नैतिक सिंघानियाच्या भूमिकेत होता. त्यावेळीही शूटींगशिवाय हे दोघं एकमेंकाशी बोलत नसत.


kasautii-zindagii-kay-gossip-of-cold-war-between-hina-khan-and-erica-fernandes-2


शूटींग संपताच हे दोघं वेगवेगळ्या रस्त्याने निघून जातं. सीरियलमध्ये काही वर्षांचं लीप आल्यावर या दोघांनीही सीरियल सोडली आणि आपल्या आयुष्याला नव्याने सुरूवात केली. ‘बिग बॉस’च्या घरातही हिना खानचं फटाका रूप पाहायला मिळालं होतं. हिना लवकरच चित्रपटातही झळकणार आहे. 


kasautii-zindagii-kay-gossip-of-cold-war-between-hina-khan-and-erica-fernandes-3


आता पाहूया हिना खान आणि एरिका फर्नांडिसमध्ये मैत्री होते का?


हेही वाचा - 


ईशा आणि विक्रांतच्या नात्यात लवकरच येणार ट्वीस्ट


विक्रांत आणि ईशा #vikisha च्या लग्नसोहळ्यातील 3 लक्षवेधी क्षण