कार्तिक आर्यनच्या हाती मोठा चित्रपट, ‘तान्हाजी’ फेम ओम राऊतबरोबर करणार काम

कार्तिक आर्यनच्या हाती मोठा चित्रपट,  ‘तान्हाजी’ फेम ओम राऊतबरोबर करणार काम

बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त चर्चा असणारा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. कार्तिकसाठी गेली दोन वर्ष अप्रतिम ठरली आहेत. कार्तिक आणि साराचा ‘लव आज कल 2’ या व्हॅलेंटाईन डे ला प्रदर्शित होत आहे. कार्तिक आणि साराची जोडी प्रेक्षकांना  खूपच आवडत आहे. त्याप्रमाणेच कार्तिकचा ‘भुलभुलैया 2’ हा चित्रपटही येत आहे. पण कार्तिकसाठी आता सर्वात मोठी संधी मिळाली असून आता कार्तिक ‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ चा दिग्दर्शक ओम राऊतबरोबर काम करणार आहे. आतापर्यंत कार्तिकने रोमँटिक, ड्रामा, कॉमेडी असे चित्रपट केले आहेत. पण आता पहिल्यांदाच कार्तिक अॅक्शन हिरो म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ओम राऊतचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. आता कार्तिक आणि ओम यांची जोडी काय कमाल पडद्यावर करणार यासाठी कार्तिकचे चाहते उत्सुक आहेत. 

मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच झळकणार ही बापलेकाची जोडी

भूषण कुमार करणार निर्मिती

कार्तिकने स्वतःदेखील एका मुलाखतीमध्ये आपण ओम राऊतच्या चित्रपटात काम करत असल्याचं म्हटलं आहे. त्याशिवाय समीक्षक तरण आदर्शनेदेखील ट्विट करून ही माहिती दिली आहे. इतकंच नाही तर टी सिरीजचे भूषण कुमारच या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचं म्हटलं आहे. कार्तिकने याआधी भूषण कुमारसह अनेक चित्रपट केले आहेत. त्यामुळे कार्तिक आणि भूषण कुमार ही जोडी हिट असल्याचं म्हटलं जात आहे. कार्तिकचा हा चित्रपट थ्री डी अॅक्शन - थ्रिलर असून या चित्रपटाचं चित्रीकरण हे देशात आणि परदेशात दोन्ही ठिकाणी करण्यात येणार आहे. ओम राऊतबरोबर काम करण्याच्या बाबतीत कार्तिक आर्यनने सांगितलं की, तान्हाजी चित्रपट पाहिला तेव्हा त्यामध्ये  केवळ अप्रतिम सीन आणि कथा बघूनच आपण प्रभावित झालो होतो. पण आपल्याला चित्रपटासाठी जेव्हा नरेशन देण्यात आलं तेव्हा आपण अधिक प्रभावित झाल्याचंही कार्तिकने सांगितलं आहे. आपल्या अॅक्शन चित्रपटामध्ये ओम राऊत 3डी चा वापर करतात आणि त्याचा इफेक्ट अत्यंत कमालीचा असतो असंही कार्तिकचं म्हणणं आहे. त्यामुळे ओम राऊतबरोबर काम करण्यास आपण अत्यंत एक्साईट असल्याचंही त्याने सांगितलं.

डान्स दिवाचा संघर्ष! कधीकाळी लॉटरी विकायची नोरा फतेही

नव्या चित्रपटासाठी कार्तिक परफेक्ट

View this post on Instagram

Pose like 🤫

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

ओम राऊतचा तान्हाजी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवत आहे. गेले एक महिना हा चित्रपट तुफान कमाई करत आहे. अजय देवगणनंतर कार्तिक आर्यनबरोबर काम करण्याच्या बाबतीत ओम राऊतने म्हटलं आहे की, नव्या चित्रपटातील भूमिकेप्रमाणे कार्तिक योग्य आहे. कार्तिकने या चित्रपटाला होकार दिल्यामुळे आपण आनंदी असल्याचंही ओम राऊतने म्हटलं आहे. ओम राऊत खूपच डिटेलिंगमध्ये चित्रपट तयार करतो. त्यामुळे आता पुढचा चित्रपट नक्की कसा असेल याचीही प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.  त्यातही हा कार्तिक आर्यनचा पहिला अॅक्शन चित्रपट असल्यामुळे कार्तिक कसा वेगळा यामध्ये दिसणार आहे याबद्दलही प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला याच वर्षी सुरूवात होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या चित्रपटात कार्तिकची अभिनेत्री कोण असणार हे मात्र अजून कळले नाही. त्याशिवाय कार्तिक आता लवकरच ‘दोस्ताना 2’ मधून जान्हवी कपूरबरोबर दिसणार आहे. त्याशिवाय कार्तिककडे अनेक चित्रपट आहेत. सध्या कार्तिक अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असून ‘प्रत्येक दुसरा चित्रपट आपण करत आहोत’ असंही कार्तिकने म्हटलं आहे. त्याशिवाय इतके वर्ष केलेले स्ट्रगल आता कामी येत आहे असंही कार्तिकने म्हटलं आहे. कार्तिकच्या ‘सोनू के टिटू की स्वीटी’ या चित्रपटाने त्याच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी दिली असून आता कार्तिक एका ए स्टारच्या यादीमध्ये समाविष्ट झाला आहे. 

हृतिक रोशनच्या ‘काबिल’ सिनेमातील अभिनेत्रीला मराठी सिनेमाचे वेध

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.