विकी कौशल आणि कतरिनामध्ये वाढतेय का जवळीक

विकी कौशल आणि कतरिनामध्ये वाढतेय का जवळीक

विकी कौशल आणि कैतरिना कफमध्ये जवळीक वाढत असल्याचं दिसत आहे. नुकतेच हे दोघं एका डिनरडेट साठी एकत्र आले होते. दोघांच्या या डिनर डेटबाबत बी टाऊनमध्ये फारच चर्चा आहे. हरलीन सेठीसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर विकीची कतरिनाशी जवळीक वाढल्याबाबत बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या एका कॉमन फ्रेंडसोबत ते एका पार्टीत एकत्र दिसले होते. हे दोघं एकामेकांसोबत सिरियस रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. त्या दोघांच्या या फोटोजमुळे या बातमीला चांगलीच हवा मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच विकी आणि कतरिना ओबेरॉय रेस्टॉरंटमध्ये पोहचले होते. या दोघांचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोजमध्ये कतरिना विकीसोबत या रेस्टॉरंटचा शेफदेखील दिसत आहे. विकीने या फोटोंमध्ये शर्ट आणि जीन्स घातलेली आहे. कतरिनाने या फोटोजमध्ये लाल रंगाचा फ्लोरल ड्रेस घातला आहे. दोघांची या फोटोमध्ये दिसणारी जवळीक पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चेला उधाण आलं आहे.

या आधीही दोघं दिसले होतं एकत्र

दिवाळी पार्टीतही कतरिना आणि विकी एकत्र दिसले होते. कारण या पार्टीतून बाहेर जाताना कैतरिनानंतर लगेचच विकी पार्टीतून बाहेर पडत असल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर दोघंही या पार्टीनंतर आपापल्या कारमधून निघून गेले होते. मात्र या पार्टीनंतर विकी आणि कतरिना दोघंही मीडियाला पोझ देण्यासाठी आले नव्हते.टेलिव्हिजनवरील एका टॉक शोमध्ये कैरिनाला विचारलं होतं की, तुला कोणत्या नव्या अभिनेत्यांसोबत काम करायला आवडेल? आश्चर्य म्हणजे त्यावेळी कैतरिनाने विकीचं नाव घेतलं होतं. वास्तविक कैतरिनाप्रमाणेच मालिविका मोहनसोबतही जोडलं जात आहे. त्यामुळे ही डिनर डेट लव्ह ड्रामाचा एक भाग असावा असा अंदाज आहे. 

रॉनी स्क्रूवाला बनवत आहे लव्ह ड्रामा

विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच एका लव्ह ड्रामामध्ये दिसणार आहेत. विकी आणि कतरिनासाठी एक इंटेन्स लव्ह स्टोरी बनवण्यात येत असल्याची चर्चा आहे. ही कथा वास्तविक जीवनावर आधारित असून केदारनाथ या चित्रपटाप्रमाणेच लव्ह ड्रामा असेल असं सांगण्यात येत आहे. कतरिना आणि विकीमध्ये कमालीची केमिस्ट्री आहे. काही दिवसांपूर्वीच विकी आणि कॅट एका टेलिव्हिजन शो मध्ये आले होते. तेव्हा या दोघांमध्ये चांगलीच केमिस्ट्री दिसली होती. दरम्यान या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी नातं निर्माण होत असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे ऑनस्क्रिन या दोघांची केमिस्ट्री कशी दिसेल याची सर्वांना उत्सुकता आहे.

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

पानिपत चित्रटात सकिना बेगमच्या भूमिकेत झीनत अमान,पोस्टर रिलीज

बालदिनानिमित्त कलाकारांनी शेअर केल्या लहानपणीच्या आठवणी

दीपिका सहभागी होणार जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत

आमिर खानचा नवा अवतार पाहिला का, 'Laal Singh Chaddha'मधील लुक व्हायरल