ऐकलंत का, बॉलीवूडच्या या नवीन हॉट जोडीबद्दल

ऐकलंत का, बॉलीवूडच्या या नवीन हॉट जोडीबद्दल

आपल्यामध्ये जसं सिंगल असणाऱ्या प्रत्येक मुलामुलीला लग्न कधी करणार किंवा तुझं काही अफेअर आहे का, असा प्रश्न येताजाता विचारला जातो. तसंच काहीसं झालं आहे कतरिना कैफचं. काही दिवसांच्या ब्रेकनंतर हमखास तिच्या अफेअरबाबत किंवा ब्रेकअपबाबत चर्चा होतच असते. अशातच गेल्या काही दिवसांपासून विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) च्या लिंकअपबद्दल बी-टाऊनमध्ये चर्चा रंगत आहे.  


अशी सुरू झाली कतरिना आणि विकीची चर्चा


vickyrina-1


जेव्हा कतरिना कैफने करण जोहरच्या चॅट शोवर विकी कौशलचं कौतुक केलं होतं. तेव्हापासूनच या दोघांच्या लिंक-अपच्या बातम्या मीडियामध्ये येऊ लागल्या आहेत. एवढंच नाहीतर नुकत्याच झालेल्या एका अवॉर्ड शोमध्येही या दोघांच्या जोडीवर खास स्कीटही सादर करण्यात आलं होतं आणि स्कीट्सना खूप पसंतीही मिळाली. तसंही सध्या कतरिनाही सिंगल आहे आणि विकीचं ही नुकतंच त्याची सो कोल्ड गर्लफ्रेंड हरलीन सेठीसोबत ब्रेकअप झालं आहे. त्यामुळे साहजिक आहे दोघांच्या लिंकअपची चर्चा तर होणारच. या जोडीचा लवकरच एकत्र चित्रपट येणार असल्याचीही बातमी आहे. हा सिनेमा एक लव्हस्टोरी असेल. पण याबाबत कोणतीही ऑफिशिअल घोषणा अजून झालेली नाही.


कतरिनाचं काय म्हणणं आहे


katrina


एका इंटरटेनमेंट मासिकाला दिलेल्या मुलाखतीत कतरिनाने विकी कौशलबाबतच्या लिंकअपबद्दल खुलासा केला की, ती सध्या सिंगल आहे आणि तिचं कोणाशीही रोमँंटीक नात नाहीये. तसंच ती कोणाला डेटही करत नाहीयं. तर काही दिवसांपूर्वी अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या एका मुलाखतीत कतरिनाने सांगितलं होत की, इडस्ट्रीमध्ये खूप चांगले हँडसम बॉईज आहेत. ज्यांना डेट करायला तिला आवडेल. काहीजण मला मेसेज करतात. हाय कतरिना कशी आहेस, काय चाललंय आणि डीनर डेटसाठी विचारतात. मलाही हेही मान्य आहे की, इंडस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्टींग लोक आहेत आणि मला माझा मिस्टर राईट लवकरच मिळेल.


नेहमीच चर्चेत असते कतरिना


all of salman's ex girlfriends FI


कतरिना सतत चर्चेत असतेच मग ते सलमान खानमुळे असो वा रणबीर कपूरमुळे असो. करिअरच्या सुरूवातीच्या दिवसात कतरिना सलमानसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत राहिली.


ranbir-katrina


त्यानंतर तिचं नाव रणबीरसोबत जोडलं गेलं. पण त्यांचं नातही काही टिकलं नाही. त्यानंतर प्रत्येकवेळी जेव्हा सलमान-कतरिनाच्या जोडी मोठ्या पडद्यावर आली तेव्हा तेव्हा त्यांच्या अफेअरची पुन्हा चर्चा रंगली. आता या चर्चेत बॉलीवूडच्या मोस्ट डिजायरेबल हँडसम विकी कौशलचं नाव येतंय.


कतरिनाचे आगामी प्रोजेक्ट्स
 

 

 


View this post on Instagram


 

 

Interview, interviews and some more interviews. #Bharat @bharat_thefilm @katrinakaif


A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on
कतरिनाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल म्हणायचं झाल्यास यंदाच्या ईदच्या दिवशी तिचा सलमानसोबतचा भारत हा चित्रपट रिलीज होईल. ज्याच सध्या सलमान-कतरिना जोडी जोरदार प्रमोशन करत आहे. त्यानंतर


Akshay 'Suryavanshi' release on Eid


ती अक्षयकुमारसोबतच्या सूर्यवंशी चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात करेल. ज्याचं दिग्दर्शन रोहित शेट्टी करत आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

🌊


A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on
आता बघूया विकी आणि कतरिनाच्या नात्यावर येत्या काळात मोहोर लागते की ही फक्त चर्चाच ठरते.