विकी कौशल करणार कतरिनाच्या बहिणीसोबत रोमान्स

विकी कौशल करणार कतरिनाच्या बहिणीसोबत रोमान्स

सध्या संपूर्ण बॉलीवूडमध्ये चर्चा आहे ती विकी कौशलची… विकी कौशलच्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू पाहिल्यानंतर आता विकी कौशल कोणत्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. तो कुठे जातो? काय करतो? त्याचे कोणते प्रोजेक्ट सध्या सुरु आहेत? या सगळ्या गोष्टींसाठी विकीवर बारीक नजर ठेवली जाते. त्याच्यासोबत काम करण्याची अनेकांना इच्छा आहे. पण विकी आता दिसणार आहे एका फ्रेश अभिनेत्रीसोबत.. ही अभिनेत्री आणखी कोणी नाही तर कतरिना कैफची बहीण इझाबेल कैफ आहे. विकी कौशलने या संदर्भात कोणतीही माहिती दिली नसली तर ही नवी जोडी चित्रपटात एक दिसणार याची जोरदार चर्चा आहे.


प्रेमाचा वेगळा अर्थ सांगणार 'जिवलगा'


इझाबेल करतेय डेब्यू


कतरीना कैफसोबत अनेकदा पार्टीमध्ये इझाबेल दिसते. इझाबेलची सुंदरता पाहून ती देखील एक दिवस चित्रपटात दिसेल, असे सगळ्यांनाच वाटत होते. पण कधी? आणि कोणत्या प्रोजेक्टमध्ये याची माहिती कोणाला नव्हती. पण आता इझाबेल डेब्यूसाठी तयार झाली आहे.सोशल मीडियाच्या एका शोवर कतरिना आणि विकी एकत्र आले होते. त्यावेळी तिने इझाबेलच्या डेब्यूबद्दल सांगितले. ती म्हणाली की, इझाबेलच्या चित्रपटाचे शुटींग नुकतेच संपले असून मी तिला काही टीप्स दिल्या नाहीत असे सांगितले. हा चित्रपट ती सूरज पांचोलीसोबत करत आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांनी फोटो शेअर करत याची औपचारिक घोषणा केली. ‘टाईम टू डान्स’ असे या चित्रपटाचे नाव आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Day 1 #timetodance 💃🎬🎥


A post shared by Isabelle Kaif (@isakaif) on
सायना नेहवाल बायोपिकमधून श्रद्धा कपूर आऊट, नाही जमला रोल


सूरजसोबतचे फोटो केले शेअर 


जर तुम्ही इझाबेलचे इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिले तर तुम्हाला तिचे बरेच फोटो दिसतील. सूरज पांचोलीसोबतचे दोन ते तीन फोटो तिने या अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.  इझाबेलबद्दल आणखी सांगायचे झाले तर ती स्वत: फिटनेस फ्रिक आहे. तिने तिचे जीम आणि वर्कआऊटचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे या रोलसाठी इझाबेलने प्रचंड मेहनत घेतली असणार हे साहजिक आहे. शिवाय हा चित्रपट डान्सशी निगडीत असल्यामुळे तिने डान्सची ही प्रॅक्टिस केली असेल हे नक्की आता हा चित्रपट रेमो डिसुजाच्या 'स्ट्रीट डान्सर'ला टक्कर देणारा असेल की नाही हे पाहावे लागेल.


suraj isabelle


पाहा स्ट्रीट डान्सरचा पहिला लूक


विकीसोबतही करणार काम


आता प्रश्न हा उद्धवतो की, विकी कोणत्या चित्रपटात इझाबेलसोबत काम करणार? कारण कतरिनाने दिलेल्या मुलाखतीनुसार ती विकीसोबतही चित्रपटात काम करत आहे. आता विकीसोबत ती दुसरा चित्रपट करणार आहे की, याच चित्रपटात ती विकीचा रोल आहे हे अजून कळत नाही. पण पुन्हा एकदा विकी वेगळ्या रुपात दिसेल अशी अपेक्षा आहे.


vickey 1


विकी बायोपिकमध्ये व्यग्र


इझाबेलचा प्रोजेक्ट वगळता विकी बायोपिकमध्येही व्यग्र आहे. उधम सिंह यांच्यावर येणाऱ्या बायोपिकमध्ये विकीची महत्वाची भूमिका आहे. याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. तर कतरिनाने नुकतेच सलमानसोबत ‘भारत’चे शुटींग संपवले आहे. सलमानचा हा बीग बजेट चित्रपट असून २०१९मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. नुकतेच कतरिनाला शाहरुखच्या ‘झीरो’या चित्रपटासाठी बेस्ट सर्पोटिंग अॅक्टरचा झी सिने अॅवार्ड मिळाला. तर विकीला संजूमधील त्याच्या कमली या रोलसाठी पुरस्कार मिळाला.