रणबीरसोबतच्या ब्रेकअपबाबत पहिल्यांदा बोलली कतरिना

रणबीरसोबतच्या ब्रेकअपबाबत पहिल्यांदा बोलली कतरिना

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ ही नेहमी तिच्या रिलेशनशिपपेक्षा ब्रेकअपमुळे जास्त चर्चेत असते. मग तो सलमान खानसोबतचा ब्रेकअप असो वा रणबीर कपूरसोबतचा असो.


कॅटची ब्रेकअप सीरीज   


काही वर्षांपूर्वी जेव्हा कतरिनाचा सलमानशी ब्रेकअप झाला तेव्हा मीडियामध्ये यावर खूपच चर्चा झाली होती. त्यानंतर रणबीरशी तिचं सूत जुळलं आणि पुन्हा ब्रेकअप झालं. रणबीर तर मूव्ह ऑन करून आलियासोबत पुढेही गेला पण आजही रणबीर-कतरिनाच्या ब्रेकअपची चर्चा रंगते.  


23824171 382843742144216 4077363611171815424 n


खरंतर कतरिनाला बॉलीवूडमध्ये बस्तान बसवण्यासाठी खरी मदत केली ती दबंग सलमान खानने. मग तिच्या आणि सलमानच्या अफेयरच्या चर्चा रंगू लागल्या. या जोडीकडून दोघांच्याही फॅन्सना खूप अपेक्षा होत्या. पण अजब प्रेम की गजब की कहानी च्या नियमानुसार तिचं रणबीर कपूरशी अफेअर सुरू झालं आणि सलमाननेही तिला थांबवलं नाही. त्या काळात रणबीर आणि कतरिना या जोडीचा राजनीती हा चित्रपटही आला. पण जग्गा जासूस या चित्रपटाच्या रिलीज आधीच त्यांचं प्रेम प्रकरण संपलं. पण अचानक या दोघांमध्ये दुरावा कसा आला, याचं कारण मात्र कधीच कळू शकलं नाही.


अखेर कतरिनाने सांगितलं कारण


नुकतंच एका मुलाखतीदरम्यान कतरिनाने या सर्व प्रकरणाबाबत मौन सोडत मीडियाला या ब्रेकअपमागचं कारण सांगितलं. मागे घडलेल्या गोष्टी विसरून मी आता खूप पुढे आले आहे. आमच्या दोघांमध्येही जे झालं त्यातील माझ्या वाटची जवाबदारी मी घेऊ शकते. मी काय करू शकत होते आणि माझ्याकडून काय करायचं राहिलं. पण दुसऱ्या व्यक्तीबाबतची जवाबदारी मी नाही घेऊ शकत.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Happy Mother’s Day.... the best example of positivity, selflessness, and generosity❤️


A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on
जेव्हा माझा तो वाईट काळ सुरू होता तेव्हा मला माझी आई म्हणाली होती की, जे तुझ्यासोबत झालं ते जगातील अनेक मुलींसोबतही झालं आहे. याबाबतीत तू एकटी नाहीस. हे ऐकून मला थोडं बरं वाटलं आणि मी आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.


ब्रेकअपनंतर झाले कतरिनाच्या आयुष्यात अनेक बदल


प्रत्येकजण आयुष्यातील ब्रेकअपसारख्या घटनेनंतर बदलतो. कतरिनाही याला अपवाद नाही. ब्रेकअप झाल्यावर कतरिनाच्या खाजगी आयुष्यातही अनेक बदल झाले, याबाबतही कतरिनाने सांगितलं. माझा स्वभाव फारच हळवा आहे. जो कधीच बदलणार नाही. पण मी एक धडा घेतला आहे की, एक महिला म्हणून मलाच माझ्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Aasmaan 🌸 📷 @atulreellife


A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on
कतरिनाने तिच्या दोन ब्रेकअपनंतर स्वःतला चांगलंच सावरल्याचं दिसतंय. अर्थात असंही म्हटलं जातं की, दबंग सलमानसोबत ब्रेकअप होऊनही पुन्हा एकदा त्यानेच कतरिनाला मदतीचा हात दिला. आताही कतरिनाच्या आगामी भारत या चित्रपटात ती सलमानसोबतच झळकणार आहे. हा सिनेमा ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे.