बाहेर मस्त पाऊस पडतोय..आणि या पावसात मस्त पावसाची गाणी आठवणार नाही असं होणार नाही. या पावसाच्या गाण्यामध्ये हॉट, सिझलींग असं एक गाणं होतं ते म्हणजे रवीना टंडन हीच. हम्म… टीप टीप बरसा पानी.. पानी ने आग लगाई.. असे या गाण्याचे बोल होते. या गाण्याने रवीनाने खरचं आग लावली होती. तिच्या या गाण्यामुळे तिचा चाहतावर्ग वाढला होता. एकदम बिनधास्त असं हे गाण आजही पाऊस आठवला की,ओठांवर येतं. पण आता अचानक या गाण्याची आठवण कशाला? पाऊस आलाय म्हणून का?.. त्यासाठी नाही हो या गाण्याची आठवण आम्ही करुन देत आहोत कारण या गाण्याचा रिमेक येणार आहे आणि यात रवीना नाही तर चक्क चिकनी चमेली गर्ल कतरिना कैफ दिसणार आहे.
1994 साली आलेल्या ‘मोहरा’ या चित्रपटातील हे गाणं असून हे गाणं अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. यामध्ये रवीनाने नेसलेली शिफॉनची पिवळ्या रंगाची साडी आणि तिचा तो सेक्सी ब्लाऊज आजही अनेकांच्या लक्षात आहे. त्यामुळेच या गाण्याचे रिमेक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाण्यासाठी कतरिनाची निवड झाली असून या गाण्याचे चित्रीकरणही सुरु झाल्याचे कळत आहे.
आता तब्बल 25 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्यामध्ये अक्षय आणि रवीना होते. आता हे गाणं कतरिना करणार म्हटल्यावर यामध्ये अक्षयच्या जागी कोण असणार अशी उत्सुकता असेल तर या गाण्यात अक्षय कुमारच दिसणार आहे… बसला ना धक्का… पण हे खरं आहे खिलाडी अक्षय कुमारच 25 वर्षानंतर हे गाणं करणार आहे. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ज्यावेळी या गाण्याबद्दल रवीना टंडन हिला विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, मला रिमिक्स गाणी ऐकायला आवडतात. हे गाणं कसं केलं आहे ते देखील पाहायला नक्की आवडेल. रवीना टंडन सध्या अभिनयक्षेत्रापासून दूर आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण रवीना टंडन चित्रपटातून नाही तर हल्ली जाहिरातीमधून काम करणाऱ्याला अधिक पसंती देते.
आता आणखी एक प्रश्न आपल्याला पडतो . तो म्हणजे कोणत्या चित्रपटात हे गाणं आहे.तर रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात हे गाणं आहे. कतरिनानेच हा फोटो तिच्या इन्स्टा अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हे गाणं फराह खान कोरिओग्राफ करत असून तिने कतरिना आणि रोहित शेट्टी या दोघांसोबत तिचे भिजलेले फोटो शेअर केले आहेत.
कतरिनाने आतापर्यंत एकापेक्षा एक असे आयटम नंबर दिलेले आहेत. त्यापैकी तिने अक्षय कुमार सोबत केलेलं एक गाण अगदी टीप टीप च्या जवळ जाणारचं होतं ते म्हणजे ‘दे दना दन’ या चित्रपटातील बदला है मौसम हे गाणं. या गाण्यातही कतरिना कैफ पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसली होती. आता या चित्रपटातील या प्रसिद्ध गाण्यात कतरिना नेमका कसा जलवा दाखवणार ते पाहावे लागेल.