सविता भाभीला टक्कर द्यायला येत आहे 'कविता भाभी'

सविता भाभीला टक्कर द्यायला येत आहे 'कविता भाभी'

सविता भाभी …. अरे थांबा लगेच तुम्ही काहीतरी वाईट अर्थ काढू नका. अॅडल्ट चित्रपट जर तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला सविता भाभी हे नाव परिचयाचे असेल. पण आता या सविता भाभीला टक्कर द्यायला कविता भाभी येणार आहे. पुन्हा तुमचे विचारचक्र सुरु झाले असतील तर ते आताच थांबवा… कारण कविता भाभी टक्कर देणार आहे म्हणजे एक नवी वेबसिरिज ‘कविता भाभी’ लवकरच येणार आहे. या वेबसिरीत कविता भाभीच्या अवतारात कविता राधेश्याम दिसणार आहे. तिने या संदर्भातील घोषणा केली असून ही वेबसिरीज या अभिनेत्रीनेच लिहिलेली आहे.


Avengers Endgameमुळे बसला हिंदी चित्रपटांना फटका


काय असणार कविता भाभी या वेबसिरीत?


kavita bhabhi 1


आता वेबसिरीजच्या नावामुळे हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत कविताला ज्यावेळी सविता भाभी या पात्राशी याचा काही संबंध आहे का असे विचारण्यात आल्यावर ती म्हणाली की, सविता भाभी हे असे काही पात्र आहे हे मी पहिल्यांदा ऐकले आहे. माझी वेबसिरीज ही ओरिजनल आहे. त्यातील कविता भाभी हे पात्रसुद्धा ओरिजनल आहे त्यामुळे त्याचा इतर कोणाशी तुलना करता येणार नाही. हे सांगताना तिने या वेबसिरीजची कोणतीही कॉन्सेप्ट सांगितलेली नाही.


नियंमाचे पालन करणारी असेल ही वेबसिरीज


kavita radheshyam


नावामुळे ADULT पटात मोडणारी ही वेबसिरीज वाटत असली तरी सर्व नियमांचे पालन करुन यातील पात्र आणि  घटना तयार करण्यात आल्याचे कविता राधेश्याम हिने सांगितले आहे. सगळ्या गोष्टीचा विचार करुनच ही वेबसिरीज करत असल्याचे ती म्हणाली आहे. कविता भाभी या नावाचे सगळे राईटसदेखील कविताने घेतले आहेत.आता ही नेमकी वेबसिरीज काय असणार आहे यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे. पण कविताचा अंदाज पाहिला तर ही एक adult फिल्म तर नाही ना? असा प्रश्न पडला आहे. 


मलायका अरोरा आणि जेनिफर लोपेझ देणार फिटनेसचे धडे


ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडून आली ऑफर


kavita radheshyam 2


हल्ली वेबसिरीजचा जमाना आहे. अनेक जण ऑनलाईन एपिसोडीक बेस असलेल्या सिरीज पाहायला पसंती देतात. कवितालाही अशाच प्रकारे ऑफर आल्यामुळे तिने ही वेबसिरीज करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेबसिरीजचे काम सुरु झाले असून लवकरत VIU,NETFLIX या अॅपवर ही पाहायला मिळणार आहे. साधारण जूनमध्ये ही मालिका रिलीज करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे याचे सबस्क्रिप्शन आहे. त्यांना ही वेबसिरीज पाहता येईल, असे कविताने सांगितले आहे. त्यामुळे तुम्हाला ही वेबसिरीज पाहण्याची इच्छा असेल तर या सोशल प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन असायला हवे.


कोण आहे कविता राधेश्याम?


kavita radheshyam 3


सारानंतर आता ही अभिनेत्री कार्तिकच्या प्रेमात


कविता राधेश्याम हिने आपल्या करीअरची सुरुवात विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘Who Done it: उलझन’ या मालिकेपासून केली. या मालिकेतील तिच्या बिनधास्तपणामुळेच तिला नवी ओळख मिळाली. ‘मैं रजनीकांत हूँ’ हा तिचा चित्रपटदेखील खूप गाजला तो केवळ तिच्यामुळेच आणि त्यामुळेच तिला भारताची किम कर्देशिअन अशी ओळख मिळाली. तिच्याबद्दल आणखी सांगायचे झाले तर तिच्या याच प्रसिद्धीमुळेच तिला ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोची ऑफर मिळाली. पण तिने ती ऑफर नाकारली.कविता राधेश्यामला स्वत:चे असे काहीतरी करायचे होते म्हणूनच तिने हा निर्णय घेतल्याचे कळत आहे.