सध्या अनेक कलाकार ‘खतरों के खिलाडी’ या रियालिटी शो चे चित्रीकरण केपटाऊनमध्ये करत आहेत. या रिलालिटी शो च्या 11 व्या सीझनचे चित्रीकरण सध्या चालू आहे. या शो मध्ये सहभागी झालेले सर्व कलाकार आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत असतात. या सर्व कलाकारांमध्ये असणारे बाँडिंग दिसून येत आहे. पण आता या सर्व कलाकारांच्या मस्तीला थोडा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कारण खतरों के खिलाडीच्या सेटवर कोरोना व्हायरस पोहोचला आहे. या शो मध्ये सहभागी झालेल्या सर्वात लहान स्पर्धकाला अर्थात अनुष्का सेनला (Anushka Sen) कोरोना झाल्याचे आता समोर आले आहे. अनुष्काचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून अन्य स्पर्धकांना त्वरीत क्वारंटाईन करण्यात आले आहे. अनुष्का ही वयाने सर्वात लहान स्पर्धक असून गेले संपूर्ण महिना अनुष्का अनेक व्हिडिओ आणि फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत आहे.
गाथा नवनाथांची’ मालिकेतून नाथांचा महिमा प्रेक्षकांच्या भेटीला
अन्य स्पर्धकांचे रिपोर्ट नेगेटिव्ह
अनुष्का सोडून अन्य सर्व स्पर्धकांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले असल्याचे सांगण्यात येत आहे. पण तरीही काळजीसाठी सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) सध्या या शो चे सूत्रसंचालन करण्यात व्यस्त आहे. खतरों के खिलाडी म्हटलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर नाव येते ते म्हणजे रोहित शेट्टी. नेहमीच स्पर्धकांना अप्रतिम बळ देत रोहित त्यांना प्रोत्साहन देतो. काही दिवसांपासून अनुष्का शो मधून एलिमिनेट झाली असल्याचे ऐकिवात येत आहे. याशिवाय यावेळी मास एलिमिनेश असल्याचेही वृत्त आहे. यावेळी कोरोनामुळे शो च्या फॉर्मेटमध्ये काही बदल करण्यात आले असून स्पर्धक आऊट झाल्यानंतरही लगेच घरी जाऊ शकत नाही. सर्व स्पर्धक एकत्र गेले होते त्यामुळे सर्व स्पर्धकांना भारतातही एकत्रच आणण्यात येईल. कोणत्याही स्पर्धकांना पुन्हा स्पर्धेत सहभागी करून घेता येईल.
दीपिका पादुकोणची ड्युप्लिकेट आहे ही अभिनेत्री, बोल्डनेसमुळे चर्चेत
चित्रीकरण थांबवून परत येण्याचा निर्णय?
या सीझनमध्ये राहुल वैद्य, श्वेता तिवारी, दिव्यांका त्रिपाठी दहिया, निक्की तांबोळी, सौरभराज जैन, आस्था गिल, सना मकबूल, महक चहल, वरूण सूद, अभिनव शुक्ला, विशाल आदित्य सिंह या सेलिब्रिटींचा सहभाग आहे. आता अनुष्का सेनचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मेकर्स सर्वांना घेऊन परत भारतात येणार की, बाकीच्यांसह चित्रीकरण पूर्ण करणार याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. गेल्या एक महिन्यापासून या शो चे चित्रीकरण केपटाऊनमध्ये सुरू आहे. त्यामुळे हे चित्रीकरण पूर्ण करूनच या सर्वांनी परत यावे असं त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. दरम्यान यावेळच्या सीझनमध्ये दिव्यांका त्रिपाठी दहिया आणि अभिनव शुक्ला या दोन्ही स्पर्धकांचा वाहवा मिळत असल्याचे कळून येत आहे. तसंच इतर स्पर्धक आपल्या सोशल मीडियावरून फोटो आणि रिल्स शेअर करतानाही दिसून येत आहेत. तर मास एलिमिनेशमध्ये आस्था गिल, अनुष्का सेन आणि अन्य तीन कलाकार बाहेर गेल्याचे आणि पुन्हा परत येत असल्याचेही वृत्त आहे. पण अजूनही याबाबत कोणतीही पुष्टी नाही. आता जेव्हा शो ऑन एअर होईल तेव्हाच या सगळ्यांची धमाल मस्ती आणि कमाल त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. पण तोपर्यंत उत्सुकता ताणून ठेवण्यात या शो ने नक्कीच कमाल केली आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या घरात येणार नवा भाडोत्री, भाडं ऐकून बसेल धक्का
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक