KKK10: खतरों के खिलाडीमध्ये तेजस्वी, धर्मेश आणि करणचा जलवा

KKK10: खतरों के खिलाडीमध्ये तेजस्वी, धर्मेश आणि करणचा जलवा

खतरों के खिलाडीचा 10 वा सीझन सुरू होऊन केवळ तीन आठवडे झाले आहेत आणि या शो ने पुन्हा एकदा टीआरपीच्या खेळात बाजी मारली आहे. दरवर्षी हा शो नेहमीच टॉपला असतो. रोहित शेट्टीचं तुफान होस्टिंग आणि यातील स्पर्धकांचे अफलातून स्टंट हे प्रेक्षकांना नेहमीच भावतात. यावर्षी तर असे अनेक स्टंट्स करण्यात येत आहेत जे पहिले कोणत्याही स्पर्धकांनी केलेले नाहीत. यामध्ये अगदी मेणाचा पाऊस, सर्व स्पर्धकांना एकत्र टीअर गॅसचा त्रास या सगळ्या गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत. पण या सगळ्यात टफ फाईट देत आहेत ते म्हणजे तेजस्वी प्रकाश, धर्मेश येलांडे आणि करण पटेल. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांची यशोगाथा सांगणार नाटक ‘वीर’

 

पहिल्यापासूनच तुफान स्टंटचा करत आहेत सामना

करण, धर्मेश आणि तेजस्वी हे तिघेही आपल्याला मिळालेले स्टंट खूपच पटकन करत आहेत. तेजस्वी प्रकाश तर सर्वांसाठीच सरप्राईज पॅकेज आहे. छोटीशी दिसणारी तेजस्वी काय करणार असा जर विचार करून कोणी हा शो पाहिला तर नक्कीच आश्चर्याने प्रेक्षकांची बोटं तोंडात जातील इतकी अफलातून कामगिरी तेजस्वी करत आहे. मुलांना टफ फाईट या शो मधील सर्वच मुली देत आहेत. करिश्मा तन्ना, मलिष्का, अमृता खानविलकर, अदा खान या सगळ्याच अप्रतिम स्टंट करत आहेत. मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी  फारच कमी लोकांना स्टंट अबॉट केले आहेत. आतापर्यंत वेगवेगळ्या स्टंटमध्ये या सर्व सेलिब्रिटी स्पर्धकांनी आपला दम दाखवून दिला आहे. इतकंच नाही तर करण पटेल, धर्मेश येलांडे आणि तेजस्वी या तिनही स्पर्धकांनी न डगमगता आपले सर्व स्टंट्स पूर्ण केले आहेत. 

या कारणासाठी करिना कपूरचा राग झाला अनावर, व्हिडिओ झाला व्हायरल

तेजस्वी असणार का विजेती?

‘POPxo’ मराठीने खतरों  के खिलाडी येण्यापूर्वी अमृता खानविलकरची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये अमृताने अनेक किस्से सांगितले. त्यामध्ये अमृताने असंही म्हटलं आहे की, यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे. तुम्ही माझ्याकडून क्लू घ्या. आता अर्थात तिने कोणाचंही नाव स्पष्ट केलं नाही. पण एकंदरीतच सीझन सुरू झाल्यापासून पाहता तेजस्वी हा शो जिंकण्याची संधी जास्त दिसत  आहे. तेजस्वी जितकी बिनधास्त आहे तितकीच ती शो मध्ये सर्वांना तिच्या बबली स्वभावाने आपलंसं करून घेत आहे. कधीही मनात येणारे प्रश्न आणि कोणताही विचार न करता बोलण्याची तिची सवय सर्वांनाच हसवत आहे. इतकंच नाही तर रोहित शेट्टीदेखील तिची सारखी टर उडवत असून त्यांची ही मस्ती या शो मध्ये प्रेक्षकांना अधिक आवडू लागली आहे. 

हिंदी रियालिटी शो वर मराठी स्पर्धकांंचा डंका

मराठीचा डंका

तेजस्वी, धर्मेश, अमृता यासारख्या स्पर्धकांचा या शो मध्ये सध्या डंका आहे. हे तिघेही मराठी असून शो मध्ये देखील रोहित शेट्टी या तिघांशी सतत मराठी बोलताना दिसतात. हे तिनही कलाकार इतरांना तगडी फाईट देत आहेत. शिवाय रोहित शेट्टी सर्वच स्पर्धकांना प्रोत्साहन देताना दिसून येत आहे. त्यामुळे हा शो इतर शो पेक्षा नेहमीच वेगळा ठरतो आणि त्यामुळेच या शो चा टीआरपी नेहमीच जास्त असलेला दिसून येतो. अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यापर्यंत तितक्यात आतुरतेने हा शो पाहिला जातो. इतकंच नाही लहान मुलं तर डोळ्यांवर हात ठेवून घाबरून हा शो पाहतात पण त्यांना हा शो तरीही आवडतो. हेच या शो चं वैशिष्ट्य आहे की, यामध्ये कोणत्याही प्रकारचा ड्रामा निर्माण करण्यात येत नाही.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.