या कारणामुळे कियारा अडवाणीने बदलले आपले नाव

या कारणामुळे कियारा अडवाणीने बदलले आपले नाव

‘कबीर सिंह’ या चित्रपटामुळे हल्ली अनेकांच्या ओठी फक्त कियारा अडवाणीचे नाव आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? कियारा अडवाणीचे खरे नाव हे कियारा नाही तर तिने आपले नाव बदलले आहे. इतर बॉलीवूड सेलिब्रिटीप्रमाणे तिने आपले नाव बदलले असून त्यामागेही काही खास कारण असल्याचा खुलासा नुकताच तिने एका कार्यक्रमात केला आहे. त्यामुळे तुम्हाला कियारा हे नाव आवडले असेल तर अभिनेत्री कियाराच्या नावाबद्दलही तुम्ही नक्कीच जाणून घ्यायला हवे.

दोन केळ्यांचे बील 400 रुपये, अभिनेता राहुल बोसला बसला फटका

कियाराचे खरे नाव काय?

Instagram

कियारा अडवाणीचे खरे नाव ‘आलिया’ असे आहे.तिच्या नावाचा खुलासा तिनेच एका कार्यक्रमात केला. त्यामुळे अनेकांना आश्यचर्याचा धक्का बसला. बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत. ज्यांनी आपली नावं आतापर्यंत बदललेली आहेत. पूर्वीच्या काळी नावं बदलण्याचा एक ट्रेंड होता.कदाचित तोच कियारानेही फॉलो केला असा तुमचा समज असेल तर तसे काहीच नाही. कियाराने आलिया  हे नाव बदलण्याचा निर्णय का घेतला ते देखील या कार्यक्रमात सांगितले आहे. 

का झाली कियारा?

Instagram

ज्यावेळी कियाराला तिच्या नाव बदलामागचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली, की माझ्या पदार्पणाआधी बॉलीवूडमध्ये आधीच एक आलिया होती. आता त्या नावाने फक्त आलिया भटची ओळख निर्माण झाली आहे. सारख्या नावामुळे कोणताही गोंधळ उडू नये म्हणून माझ्या पदार्पणाआधीच नाव बदलण्याचा निर्णय मी घेतला. म्हणूनच मी आलियावरुन कियारा झाले असे तिने सांगितले.

‘नच बलिये’मधून पहिल्यांदाच एलिमिनेशनशिवाय एक जोडी होणार बाहेर, निर्मात्यांचा निर्णय

कियारा नावाची का केली निवड?

आता इतकी वेगळी नाव असताना कियाराने या नावाची निवड का केली? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्यामागेही एक कारण आहे. जर तुम्ही ‘अंजाना अंजानी’ हा चित्रपट पाहिला असेल किंवा नसेल तर या चित्रपटात प्रियांका चोप्राचे नाव कियारा असे आहे. हे नाव कियाराला खूप आवडले म्हणूनच ती आलियावरुन कियारा झाली असे तिने सांगितले. 

‘रब’ने नाही तर एकताने बनवली जोडी

कबीर सिंहनंतर मिळाली प्रसिद्ध

Instagram

कियाराने आतापर्यंत अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘धोनी :  द अनटोल्ड स्टोरी’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘कलंक’ या चित्रपटांमधून काम केले आहे. तिने साऊथचा चित्रपटसुद्धा केला आहे. पण कबीर सिंहनंतर तिचे नशीब फारच पालटले आहे. तिच्या झोळीत आता चांगल्या बॅनरचे तीन चित्रपट असून ‘लक्ष्मी बाॅम्ब’, ‘गूड न्यूज’ आणि ‘शेरशाहा’ या बायोपिकमध्ये कियारा अडवाणी दिसणार आहे. काहीच दिवसांपूर्वी तिने लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले होते.

या सेलिब्रिटींनीही बदलली ही नावं

कियारा अडवाणी ही पहिली सेलिब्रिटी स्टार नाही जिने तिचे नाव बदलले आहे. तर अनेक सेलिब्रिटींनी आपली नावं बदलली आहेत. अक्षय कुमारचे खरे नाव राजीव भाटिया आहे. गोविंदाचे खरे नाव गोविंद अहुजा, जितेंद्रचे नाव रवी कपूर असे होते अशी अनेक उदाहरणे आहेत. या शिवाय असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आपले नशीबफळफळवण्यासाठीही आपल्या नावाच्या स्पेलिंग बदलल्या आहेत. यामध्ये राणी मुखर्जी, करीना कपूर, करिश्मा कपूर, तुषार कपूर,रितेश देशमुख अशा काही सेलिब्रिटींनी त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला आहे. आता कियाराला तिच्या नव्या नावामुळे नवी ओळख मिळाली हे नक्की