भुलभुलैया 2' मध्ये कार्तिकबरोबर दिसणार 'कबीरची प्रीती'

भुलभुलैया 2' मध्ये कार्तिकबरोबर दिसणार 'कबीरची प्रीती'

कार्तिक आर्यनचा ‘भुलभुलैया 2’ चा फर्स्ट लुक नुकताच शेअर करण्यात आला होता. पण या चित्रपटात त्याच्याबरोबर कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार याची चर्चा रंगली होती. यामध्ये सारा अली खान, अनन्या पांडे यांची नावं पुढे होती. पण आता या दोघींंना मागे टाकत बॉलीवूडमधील ‘कबीरची प्रीती’ अर्थात कियारा अडवाणीने ही भूमिका मिळवली आहे. कार्तिक आणि कियारा ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. याआधी दोघांनीही एकत्र काम केलेलं नाही. कार्तिक आणि कियारा हे दोघंही सध्या त्यांच्या करिअरमध्ये व्यस्त असून दोघांकडेही बरेच चित्रपट आहेत. कियाराला ‘कबीर सिंग’नंतर अनेक चित्रपटांचे प्रस्ताव येत असून कियाराचा भाव सध्या बॉलीवूडमध्ये बराच वधारला आहे. 

कियाराच्या नावाची अधिकृत घोषणा मात्र नाही

Instagram

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कियाराचं नाव या चित्रपटासाठी निर्मात्यांकडून फायनल करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर ऑक्टोबरपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र असं असलं तरीही कियारा अडवाणीच्या नावाची अधिकृत घोषणा मात्र कुठेही करण्यात आलेली नाही. हल्ली सोशल मीडियावर सर्व अधिकृत घोषणा होत असतात. पण कियाराने अथवा अन्य कोणत्याही संबंधित व्यक्तीने याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. 

कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूरचा ‘दोस्ताना’

कार्तिकचा अक्षयशी मिळताजुळता लुक

कार्तिकचा हा लुक अक्षयच्या लुकशी मिळताजुळता आहे. कार्तिक या लुकमध्ये पिवळ्या कुरता आणि धोतरामध्ये दिसत आहे. यामध्ये त्याने गळ्यात आणि हातात रूद्राक्षाच्या माळा अडकवल्या आहेत. इतकंच नाही तर एक क्षण हा अक्षय कुमारच आहे की काय असा भास होतो. इतका हुबेहूब कार्तिक आर्यन या लुकमध्ये दिसून येत आहे. या लुकबरोबर जास्त प्रयोग करण्यात आलेला नाही. दरम्यान या पोस्टरवर ‘13 साल बाद...द हॉन्टिंग कॉमेडी रिटर्न्स’ असं लिहिण्यात आलं आहे. तर त्याच्या चारही बाजूला सांगाडेही दिसून येत आहे. गॉगल लावून कार्तिकने पोस्टरवर पोझ दिली आहे. त्यामुळे आता यामध्ये कार्तिकही अक्षयप्रमाणेच भूमिका साकारणार की काय असा एक कुतूहलाचा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे. तसंच विद्या बालनची मोंजोलिका खूपच गाजली होती त्यामुळे कियारा जर हा चित्रपट करत असेल तर तिचा या चित्रपटातील लुक कसा असेल याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. कियाराने आतापर्यंत केलेल्या कामामध्ये तिच्या अभिनयाची चांगलीच चुणूक प्रेक्षकांना दाखवून दिली आहे.  

या कारणामुळे कियारा अडवाणीने बदलले आपले नाव

पहिल्या चित्रपटाचा पगडा

पहिला भुलभुलैय्या हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये अक्षयकुमार आणि विद्या बालनसह शायनी आहुजा आणि अमिषा पटेल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. याशिवाय परेश रावल, राजपाल यादव यांच्याही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळे आता या नव्या भागात कोणकोणत्या व्यक्तिरेखा असतील आणि त्या भूमिका कोण साकारणार याबद्दल चर्चांना सुरुवात झाली आहे. तसंच या चित्रपटाचा पगडा अजूनही कायम असल्यामुळे या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या कलाकारांची जबाबदारीही निश्चितच वाढली आहे. कार्तिक आणि कियारा आता ही भूमिका कशी पेलणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. हा चित्रपट 31 जुलै 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

भुलभुलैय्या 2 : कार्तिक आर्यनचा पहिला लुक आला समोर

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन... त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.

तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.