या कारणासाठी किआरा अडवाणीला व्हाचययं आहे प्रेग्नंट

या कारणासाठी किआरा अडवाणीला व्हाचययं आहे प्रेग्नंट

कबीर सिंहची प्रीती म्हणजेच किआरा अडवाणीने एक मोठा खुलासा केला आहे. या अभिनेत्रीने सगळ्यांसमोर ‘मला सुद्धा प्रेग्नंट व्हायचे आहे’ अशी इच्छा व्यक्त करुन दाखवली आहे. तिच्या या वक्तव्यामुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आली आहे. जिथे पाहाल तिथे तुम्हाला किआराच्या प्रेग्नंसीच्या चर्चा होताना दिसत आहे. ती करत असलेल्या Good Newwz या चित्रपटात ती प्रेग्नंट दाखवण्यात आली आहे. त्यामुळे याचा संबंध चित्रपटाशी असेल असा विचार करत असाल तर असे अजिबात नाही. काही खास कारणासाठी किआराला प्रेग्नंट व्हायचं आहे. हे कारण काय ते जाणून घेऊया.

तान्हाजी' ट्रेलरची प्रतिक्षा संपली.. पावरपॅक ट्रेलर पाहिल्यानंतर वाढेल उत्सुकता

किआराला का व्हायचं आहे प्रेग्नंट

Instagram

जसं आम्ही सांगितलं की, किआराचा Good Newwz हा चित्रपट फ्लोअरवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरु आहे. दिलजित दोसांज, करिना कपूर आणि अक्षय कुमार अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अक्षय आणि करिना प्रेग्नंसीविषयी बोलत होते. करिनाने प्रेग्नंसीचा काळ अधिक चांगला असल्याचे म्हटले. लोक म्हणत असतील ही या काळात फार त्रास होतो तर ती एक अंधश्रद्धा आहे. तर दुसरीकडे अक्षय़ कुमारने प्रेग्नंसीतला हेल्दी आहार याविषयी सांगितले. तो म्हणाला की, या काळात महिलांना पौष्टिक लाडू खायला दिले जातात. तू कधी लाडू खाल्ला आहेस का? असा प्रश्न ज्यावेळी किआराला करण्यात आला त्यावेळी ती म्हणाली, ‘मी कधी प्रेग्नंट नव्हते म्हणून मी लाडू खाल्ला नाही. पण मला प्रेग्नंट व्हायला नक्कीच आवडेल कारण मला जे हवं ते खाता येईल.’ तिच्या या उत्तराने सगळीकडे हशा पिकला

चित्रपटाच्या प्रतिक्षेत

किआरासाठी 2019 हे वर्ष खूपच चांगलं ठरलं कारण ‘कबीर सिंह’ या चित्रपटाने तिला वेगळीच ओळख मिळवून दिली. किआराला इतकी प्रसिद्धी मिळाली की ती कबीरची प्रीती म्हणूनच ओळखली जाते. त्यातच आता येणारा हा चित्रपट. मेगा स्टार्ससोबत असल्यामुळे नक्कीच तिच्या कामाची दखल घेणारा असेल. एकूणच किआरासाठी हे वर्ष आणि कबीरची प्रीती बनणे फारच लक्की ठरले आहे.

Good Newwz मध्ये मिळणार गोंधळ

या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला नसेल तर आताच पाहा कारण तुम्हाला हसवणारा हा चित्रपट असेल. या चित्रपटाची कथा तुम्हाला ट्रेलरवरुन एका झटक्यात समजेल. दोन जोडपी मुलं हवं म्हणून IVF करायला जातात. पण नावाच्या साधर्म्यामुळे  त्यांचे स्पर्म बदलले जातात. आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की, बाळांची अदलाबदली झाल्यानंतर काय गोंधळ झाला असेल ते. एकूणच तुम्हाला हसवणारी अशी ही चित्रपटाची कथा आहे. 

अर्जुन कपूरनंच गर्लफ्रेंड मलायका अरोराला केलं ट्रोल, म्हणाला...

तैमूरसोबत खुश आहे

Instagram

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एक तरी असा विचित्र प्रश्न सेलिब्रिटीजना विचारला जातोच. करीनाला दुसरा चान्स कधी घेणार असा प्रश्न केल्यानंतर तिने न चिडता या प्रश्नाचे उत्तर दिले. ती म्हणाली, मी तैमुरसोबत खुश आहे. माझा दुसऱ्या बाळाचा काहीच प्लॅन नाही. कारण मला काम आणि कुटुंब यांच्यातील समतोल साधायचा आहे. 

हे सगळं खरं असल तरी किआरा मात्र डाएट सोडून आवडीचे पदार्थ खाण्याच्या विचारात आहे. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रॉडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रॉडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रॉडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूटही देत आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.