KKK10: मराठमोळा धर्मेश ठरला पहिला फायनलिस्ट, तर तेजस्वी करतेय कमाल

KKK10: मराठमोळा धर्मेश ठरला पहिला फायनलिस्ट, तर तेजस्वी करतेय कमाल

‘खतरों के खिलाडी’ या रियालिटी शो चा दहावा सीझन सुरू झाला आणि पुन्हा या रियालिटी शो ने प्रेक्षकांचं  मन जिंकलं. रोहित शेट्टीच्या अफलातून होस्टिंगसह यावर्षी मराठमोळा धर्मेश येलांडे आणि अभिनेत्री तेजस्वीनेही प्रेक्षकांचं  मन जिंकलं आहे. या दोघांनी आतापर्यंत एकदाही कोणत्याही स्टंटला न घाबरता स्टंट अबॉट केलेला नाही तर धर्मेशने पहिला फायनालिस्ट होण्याचा मानही या आठवड्यात पटकावला आहे. अगदी पहिल्या स्टंटपासून आपण इथे जिंकायलाच आलो आहोत हे धर्मेश आणि तेजस्वीने प्रत्येक स्टंटमध्ये टक्कर देत सिद्ध केले आहे. पहिला फायनालिस्ट कोण होणार अर्थात तिकिट टू फिनाले नक्की कोणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष होते आणि तुफान स्टंट करत हा मान धर्मेशला मिळाला आहे. आता खतरों के खिलाडीचा लवकरच फिनाले होईल आणि यामध्ये काय स्टंट असतील आणि यावर्षी कोण जिंकणार याची आता चर्चा रंगू लागली आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचाच हा आवडता रियालिटी शो असून आता यामध्ये रंगत अधिक वाढली आहे. 

धर्मेशकडून वाढल्या अपेक्षा

View this post on Instagram

Bulgarian optimus prime

A post shared by D (@dharmesh0011) on

एका रियालिटी शो मधून डान्सर म्हणून सुरुवात केलेल्या धर्मेशने आपल्या डान्सने अनेकांची मनं जिंकून घेतली आहेत. बरेच जण त्याला आपला आदर्श मानतात. त्यानंतर त्याने काही चित्रपटातून आपल्या अभिनयाचीही ओळख करून दिली. मागच्या सीझनमध्ये धर्मेशचा जवळचा मित्र पुनीत पाठक होता. त्याने हा शो जिंकला होता. त्यामुळे आता धर्मेशकडूनही त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तसंच स्वतः धर्मेशही प्रत्येक स्टंट अतिशय मनापासून करत असून त्याने कधीही कोणत्याही स्पर्धेतून माघार न घेता आपले 100 टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच रोहित शेट्टीदेखील धर्मेशची नेहमीच प्रशंसा करताना शो मध्ये दिसून येते.

खतरों के खिलाडी' रोहित शेट्टीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

तेजस्वी देतेय 4 मुलांना टक्कर

दरम्यान  शो मध्ये सर्वात सरप्राईज पॅकेज ठरली आहे ती तेजस्वी. कितीही मजा मस्ती करत असली तरीही स्टंट आल्यानंतर 4 मुलांना अर्थात धर्मेश, करण पटेल, शिविन नारंग आणि बलराज यांना जबरदस्त टक्कर देत तेजस्वीने बरेच स्टंट जिंकले आहेत. त्यामुळे आता धर्मेश आणि तेजस्वी या दोघांमधूनच कोणीतरी फायनल टक्कर देणार अशी चर्चा रंगू लागली आहे. या शो चं चित्रीकरण हे बल्गेरियामध्ये मागच्या वर्षी झालं असलं तरीही लॉकडाऊनमुळे हा शो आता दाखवण्यात येत आहे. मात्र याचा विजेता नक्की कोण ठरणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. तेजस्वी आणि करिश्मा तन्ना या दोनच मुली आता शो मध्ये उरल्या असल्या तरीही दोघीही अगदी मुलांच्या खांद्याला खांदा लाऊन नाही तर त्यांच्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करत असलेल्या दिसून येत आहे. त्यामुळेच त्यांचे सेटवरही अधिक कौतुक होताना दिसून आले आहे. 

#KKK10 - 'खतरों के खिलाडी'मध्ये यावेळी दिसणार 3 मराठमोळे चेहरे

धर्मेश की तेजस्वी

इतरही अनेक स्पर्धक आहेत मात्र सध्या चर्चा  रंगली आहे ती धर्मेश तर फायनालिस्ट झाला पण आता त्याला टक्कर कोण देणार? तेजस्वीचं नाव यामध्ये पुढे असून धर्मेश जिंकणार की तेजस्वी अशीही चर्चा आता जोर धरू लागली आहे. दोघेही मराठमोळे स्पर्धक जीवाची बाजी लाऊन प्रत्येक स्टंट करत असल्यामुळे शेवटचा स्टंट हा नक्कीच अटीतटीचा होईल यात शंका नाही. मात्र आता त्याची उत्सुकता अधिक वाढली असून सोशल मीडियावरही यावर चर्चा दिसून येत आहे. 

KKK10: खतरों के खिलाडीमध्ये तेजस्वी, धर्मेश आणि करणचा जलवा