क्रांती रेडकरने लाँच केला तिचा स्वत:चा क्लोथिंग ब्रँड ‘ZZ’

क्रांती रेडकरने लाँच केला तिचा स्वत:चा क्लोथिंग ब्रँड ‘ZZ’

अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही जबाबदा-या उत्तमरित्या साकारणारी अभिनेत्री क्रांती रेडकर वानखेडेमधील आणखी एक टॅलेंट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे,असे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते आणि ते नेमके टॅलेंट कोणते याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता अनेकांमध्ये होती. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. उत्तम अभिनय आणि दिग्दर्शन करुन प्रेक्षकांचे लक्ष पडद्यावर खिळवून ठेवणा-या क्रांतीने तिचा स्वत:चा क्लोथिंग ब्रँड लाँच करुन तिची आणखी एक नवी बाजू सर्वांना दाखवून दिली. नुकतेच, मुंबईमध्ये क्रांती रेडकरचा क्लोथिंग ब्रँड ‘ZZ ZIYA ZYDA’ लाँच करण्यात आला. आपण जेव्हा एखादी नवीन गोष्ट करतो तेव्हा आपल्याला चिअर अप करण्यासाठी आपल्या खास मित्र-मैत्रिणींच्या शुभेच्छा आपल्यासोबत असतातच आणि त्याचप्रमाणे क्रांतीच्या खास जवळ असणा-या व्यक्ती आणि आपल्या सिनेसृष्टीतील कलाकारांच्या विशेष उपस्थितीत क्रांतीचा क्लोथिंग ब्रँड लाँच करण्यात आला आणि त्यांनी क्रांतीला शुभेच्छा देऊन तिच्या नवीन उपक्रमाला प्रोत्साहन दिले.

अभिनेत्री ज्यांनी दिग्दर्शनातही आजमावला हात

क्रांतीची नवीन भरारी

नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झालेली क्रांती अशा एका प्लॅटफॉर्मच्या शोधात होती जिथे तिच्या नवीन कल्पना, योजना समजून घेतल्या जातील आणि त्याच दरम्यान तिची भेट अक्षय बर्दापूरकर आणि ‘प्लॅनेट टॅलेंट’शी झाली. आणि जसा प्लॅटफॉर्म हवा होता तसाच प्लॅटफॉर्म क्रांतीला ‘प्लॅनेट टी’च्या माध्यमातून मिळाला आणि या माध्यमाच्या मदतीने तिने तिच्यातील टॅलेंट म्हणजेच ‘ZZ ZIYA ZYDA’ प्रेक्षकांसमोर आणले. ‘ZZ झिया झायदा’ या नवीन क्लोथिंग ब्रँडच्या नावातच आकर्षण तर आहेच आणि या माध्यमातून क्रांतीची फॅशन स्टाईल आणि युनिक कलेक्शन पाहायला मिळणार याची उत्सुकता देखील आहे. क्रांतीच्या जवळच्या मैत्रीणी अमृता खानविलकर, हर्षदा खानविलकर, ऋजुता देशमुख यादेखील तिच्या या कलेक्शनच्या लाँचच्या वेळी तिला साथ द्यायला उपस्थित होत्या. क्रांतीने आपल्या फॅशन स्टाईलचा हा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. अभिनयाशिवाय क्रांतीने आता एका वेगळ्या आणि मोठ्या क्षेत्रात पाय ठेवले आहेत. त्यामुळे आता क्रांती या क्षेत्रामध्ये यशस्वी होताना तिच्या चाहत्यांना बघायचं आहे. क्रांतीही सध्या आपल्या या नव्या व्हेंचरसाठी अतिशय उत्साही असून वेगवेगळ्या स्टाईल्स तिला आपल्या चाहत्यांसाठी घेऊन यायचं आहे. 

विद्या बालनलादेखील करावा लागलाय ‘कास्टिंग काऊच’चा सामना, सांगितला अनुभव

क्रांती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

क्रांती सध्या कोणत्याही चित्रपटात अथवा मालिकांमध्ये दिसत नसली तरीही ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. क्रांतीच्या दोन्ही मुली सध्या लहान आहेत. त्यामुळे ती सध्या त्यांच्या संगोपनातही व्यस्त आहे. पण असं असलं तरीही क्रांती आपल्या अकाऊंटवरून अनेक मेकअप आणि फॅशनचे व्हिडिओ पोस्ट करत असते. क्रांतीच्या या व्हिडिओना सोशल मीडियावर खूपच फॉलो करण्यात येतं.  क्रांती एक उत्तम डान्सर तर आहेच. शिवाय ती एक उत्तम मिमिक आर्टिस्टही आहे. क्रांती नेहमीच मिमिक्री करूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. ती गेले कित्येक वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्गही अफाट आहे. क्रांतीने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे आणि आता आपल्या नव्या ब्रँडनेही ती लोकांचं मन जिंकून घ्यायला निघाली आहे. 

आयुष्यमान खुरानाची कॉमेडी एन्जॉय करण्यासाठी सज्ज व्हा..आलाय 'बाला'चा टीझर