हो..बॉलीवूडमधील लव्हबर्ड्स क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट हे पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर करण्याआधीपासूनच क्वारटाइन होते. वाचा काय आहे नेमकं कारण.
क्रिती आणि पुलकित यांचं नाव गेल्या अनेक दिवसांपासून जोडलं जात असून स्पॉटबॉय या वेबसाईटनुसार त्यांनी कुटुंबासमोर ही आपलं नातं ऑफिशियल केलं आहे. या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार क्रिती पुलकितसोबत त्याच्या भावाच्या उल्हास सम्राटच्या लग्नाला दिल्लीला गेले होते. या लग्नाच्यानिमित्ताने हे दोघंही पहिल्यांदाच एका फॅमिली फंक्शनमध्ये सहभागी होणार होते. पण मुंबईहून दिल्लीला जाताना क्रितीला फ्लू झाला. त्यातच कोरोना व्हायरसच्या केसेस सगळीकडे दिसू लागल्या. त्यामुळे पुलकितच्या भावाचं लग्न पोस्टपोन झालं. त्यानंतर हे लव्हबर्ड्स ताबडतोब दिल्लीहून मुंबईला आले. तेव्हापासून हे दोघंही सेल्फ क्वारंटाइनमध्ये आहेत.
साहजिकच या क्वारंटाइनमुळे दोघांनाही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवता येत आहे. कारण हे दोघंही एकाच बिल्डींगमध्ये राहतात. सूत्रानुसार, क्रितीने मागच्या वर्षीच पुलकितच्या गोरेगावमधल्या बिल्डींगमध्ये शिफ्ट केलं आहे आणि आता सेल्फ क्वारंटाइनदरम्याने हे दोघंही पुलकितच्या फ्लॅटवर राहत आहेत.
या लव्हबर्ड्सचं अफेयर सहजासहजी त्यांनी कळू दिलं नाही. पागलपंती या चित्रपटादरम्यान या दोघांचं जुळल्याची चर्चा आहे. बॉलीवूडमध्ये याबाबत अनेक अफवाही होत्या. त्यानंतर एका मुलाखतीत क्रितीने स्पष्टपणे सांगितलं की, आता या अफवा नाहीयेत, आम्ही एकमेकांना डेट करत आहोत. खरं सांगायचं तर, मला सर्वात आधी माझ्या आईबाबांना याबद्दल सांगायचं होतं की, कोणाला तरी डेट करत आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात आणता तेव्हा एका काळ असतो, तेव्हा तुम्ही तिच्याबद्द्ल सांगायला कंफर्टेबल असता. कधी कधी याला पाच वर्ष लागू शकतात तर कधी पाच महिनेसुद्धा. आमच्याबाबतीत या गोष्टीला पाच महिने लागले आणि मी सध्या खूप खूष आहे. मला हे मान्य करण्यात काहीच गैर वाटत नाही की, मी पुलकितला डेट करत आहे.
क्रिती खरबंदासोबत अफेयरच्या चर्चा रंगण्याआधी पुलकितचं लग्न सलमानची राखी बहीण श्वेता रोहिरा हिच्याशी झालं होतं. पण नंतर त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांमधील घटस्फोट मात्र सहजासहजी झाला नाही. श्वेताने पुलकितवर बरेच आरोप केले आणि तसंच तो वाईट असल्याचंही बोलली होती.