कश्मीरा शाहचं हॉट फोटोशूट पाहुन क्लिनबोल्ड झाला कृष्णा अभिषेक

कश्मीरा शाहचं हॉट फोटोशूट पाहुन क्लिनबोल्ड झाला कृष्णा अभिषेक

टेलिव्हिजन अभिनेता आणि कॉमेडिअन कृष्णा अभिषेकने 'दी कपिल शर्मा' या शोमधून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह ही देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती एक मॉडेल असून लग्नानंतर काही काळ मुलांच्या संगोपनासाठी ती अभिनय आणि मॉडेलिंगपासून दूर गेली होती. मात्र आता लॉकडाऊननंतर तिने पुन्हा मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली आहे. कश्मीरा तिच्या डान्स आणि हॉट अंदाजसाठी लोकप्रिय आहे. बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये ती एका स्पर्धकाच्या रूपात दिसली होती. मागच्यावर्षी 'तिने मरने भी दो यारो' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. कश्मीराने नुकतेच तिचे काही बोल्ड फोटो इन्साग्रामवर शेअर केले आहेत. पुन्हा आकर्षक फिगर मिळवण्यासाठी  ती गेले अनेक महिने मेहनत घेत होती. तिने लॉकडाऊनच्या काळात केलेलं हे ट्रान्सफॉर्मेशन इतके अफलातून आहे की ते पाहुन तिचे चाहतेच नाही तर तिचा पती कृष्णा अभिषेकही क्लिन बोल्ड झाला आहे.

कृष्णा अभिषेकने कश्मीराला दिली ही कंमेट

कश्मीराचे फोटो शेअर करत कृष्णाने तिला एक मजेशीर कंमेट दिलेली आहे. कृष्णा एक कॉमेडीअन असल्यामुळे त्याने दिलेली कंमेट देखील त्याच्याप्रमाणेच विनोदी आहे. कृष्णाने कश्मीराच्या फोटोंसोबत शेअर केलं आहे की, "जर घरातच बिर्याणी असेल तर बाहेर कुणी दाल मखनी खायला का जाईल ? कॅश मला तुझा खूप अभिमान वाटतो. कारण तु पुन्हा तुझ्या हॉट अवतारात परत आली आहेस" कृष्णाची बहीण आणि कश्मीराची नणंद आरती सिंहनेपण तिच्या वहिनीची स्तुती सोशल मीडियावर केली आहे. आरतीने शेअर केलं आहे की, "हॉटनेस, तू कमाल दिसत आहेस कॅश. मला आठवत आहे की तु जेव्हा बिग बॉसमध्ये आली होतीस तेव्हा तु हे काम सुरू केलं होतंस. वेळ लागला पण तु तुला हवं ते मिळवलंसच" कश्मीराने तिला मिळालेल्या सर्व कंमेट बद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. कश्मीराचे कृष्णा, आरतीप्रमाणेच संभावना सेठ, पूजा बत्रा, माही विज यांनीदेखील सोशल मीडियावर कौतुक केले आहे. कश्मीरा आता तिच्या या हॉट लुकमुळे कमबॅक करण्यास तयार झाली आहे. तिने सांगितलं की या ट्रान्सफॉर्मेशनसाठी वजन कमी करताना तिने जे फिटनेस रूटिन फॉलो केलं ते खूपच कठीण होतं. 

कृष्णा आणि कश्मीराची लव्ह स्टोरी

कृष्णा आणि कश्मीरा एकमेकांना खूप वर्ष डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लिव्ह इन रिलेशन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि तब्बल सात वर्षे ते अशा प्रकारे एकत्र राहीले. सात वर्षानंतर त्यांनी रितसर लग्न केलं. कश्मीराने कृष्णासोबत लग्न करण्यामागे कृष्णाची तनुश्री दत्तासोबत वाढत जाणारी जवळीक आहे अशी अफवा तेव्हा पसरली होती. मात्र लग्नानंतर कश्मीराने हे खोटं आहे असं जाहीर केलं होतं. तिच्यामते त्याआधीच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला होता मात्र लोकांनी याचा चुकीचा  अर्थ काढला. कश्मीरा आणि कृष्णाला दोन गोंडस जुळी मुलं आहेत. अनलॉक नंतर कश्मीरा आणि कृष्णा जोडीने 'दी कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती. विनोदीशैली आणि नवराबायकोच्या लुटूपुटूच्या भांडणांनी त्यांनी शोमध्ये विनोदी वातावरण निर्माण केलं  होतं. या दोघांचाही खास चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्या दोघांबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.