कृष्णा अभिषेक सोडणार का कपिल शर्मा शो

कृष्णा अभिषेक सोडणार का कपिल शर्मा शो

'दी कपिल शर्मा शो' टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय शो आहे. या शोमधील कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेक ही जोडी प्रेक्षकांना फारच आवडते. या दोघांचे विनोद पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. या शोमध्ये कृष्णा अभिषेक साकारत असलेली 'सपना' ही भूमिका प्रेक्षकांसाठी फारच मनोरंजक आहे. सपनाच्या माध्यमातून कृष्णा विविध विनोदी गोष्टी शोमध्ये करत असतो. ज्यामुळे या शोला चांगलीच रंगत येत आहे. मात्र नुकतंच कृष्णा अभिषेक कपिलचा शो सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ज्यामुळे कृष्णाच्या चाहत्यांना धक्का बसला आहे

कृष्णा का सोडणार कपिल शर्मा शो

कृष्णा कपिल शर्माचा शो सोडणार ही बातमी ऐकल्यापासून या शोचे चाहते नाराज झाले आहेत. कृष्णाला हा शो सोडावा लागण्यामागचं कारण सुरूवातील निराळंच वाटलं होतं. काहींनी असा अंदाज काढला की, कदाचित शो दरम्यान कपिल आणि कृष्णामध्ये वाद झाला असावा मात्र असं काहीच झालेलं नाही. कृष्णाने कपिल शर्मा शो सोडण्यामागचं कारण यापेक्षा काहीतरी वेगळंच आहे. स्वतः कृष्णा अभिषेकने कपिल शर्मा शोमधून असं जाहीर केलं आहे. 

कृष्णाने शो दरम्यान केलं कारण जाहीर

कपिल शर्माच्या शोमधला सर्वांत लोकप्रिय विनोदी कलाकार म्हणून कृष्णा अभिषेकला मानलं जातं. त्याचा स्टेजवरचा वावर सर्व चाहत्यांना नेहमीच हवा हवासा वाटत असतो. मग अचानक असं काय झालं की ज्यामुळे कृष्णाला कपिलचा शो सोडावासा वाटू लागला आहे. खरंतर कृष्णाला हा शो खराखुरा सोडायचा नाही तर या शोमधील एका भागातील स्क्रीप्टचा तो एक भाग आहे. कपिल शर्मा शोमध्ये 'जवानी जानेमन'च्या प्रमोशनसाठी अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्या चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कृष्णाने सैफला काही प्रश्न विचारले ज्यातून हा विनोद निर्माण झाला आहे. कृष्णाने सैफला सांगितलं की, "मी कपिल शर्माचा शो सोडून तुझ्या मुलाची म्हणजेच तैमूरची नॅनी व्हायला तयार आहे" शिवाय तो पुढे म्हणाला की, "ज्यामुळे मी तैमूरसोबत तैमूरच्या बाबाची म्हणजेच तुझ्यावरही लक्ष ठेवू शकते" कृष्णाच्या या बोलण्याने प्रेक्षकांसह कपिल आणि सैफ दोघंही पोटधरून हसायला लागले. हा विनोद करण्यामागचं कारण तैमूरला सांभाळण्यासाठी सैफ आणि करिना तैमूरच्या नॅनीला घसघशीत पगार देतात. एवढा पगार मिळणार असेल कोणीही तैमूरची नॅनी व्हायला तयार होईल. कारण तैमूरच्या नॅनीचा महिन्याचा पगार 1.5 लाख रू. आहे. शिवाय नॅनीने जर तिच्या कामा व्यतिरिक्त अधिक काम केलं तर तिला वाढीव पगारदेखील दिला जातो. यासोबतच वेकेशनवर असताना तैमूरला सांभाळण्यासाठी सैफ आणि करिना तैमूरच्या नैनीलाही त्यांच्यासोबत घेऊन जातात. ज्यामुळे तिला परदेशात फिरताही येतं. यासाठीच कृष्णाला तैमूरची नॅनी व्हायला आवडेल असं त्याने मजेत म्हटलं आहे. सैफचा जवानी जानेमन हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सैफसोबत तब्बू आणि अलाया फर्निचरवाला मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा समिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलं असताना कपिल शर्मा शोमध्ये कृष्णाने सैफसोबत असा विनोद केला.

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा  -

सुर्यवंशीच्या सेटवर कतरिना सैफकडून करून घेतलं जात आहे 'हे' काम

‘खारी बिस्कीट’ला मिळालेला पुरस्कार संपूर्ण टीमच्या मेहनतीचे फळ

लवकरच 'ही' लोकप्रिय मराठी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप