चित्रपटात नशीब आजमावल्यानंतर कुणाल खेमूने निवडले हे क्षेत्र

चित्रपटात नशीब आजमावल्यानंतर कुणाल खेमूने निवडले हे क्षेत्र

आजकाल  कोणाचं नशीब कधी फळफळेल सांगता येत नाही. बी टाऊनमध्ये देखील हल्ली असं अनेकदा पाहायला मिळतं. नवीन आलेल्या काही नव्या चेहऱ्यांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळते. तर या इंडस्ट्रीत राहून चांगले चित्रपट करुनही अनेकदा ज्येष्ठ कलाकारांना प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांना सामोरे जावे लागते. कुणाल खेमू हा बालकलाकार म्हणून आला. त्याने चांगले चित्रपटही केले पण आता चित्रपटात नशीब आजमावल्यानंतर आता कुणाल खेमूने एक नव्या क्षेत्राची निवड केली आहे. लवकरच तो या नव्या क्षेत्रात काम करताना दिसणार आहे.


kunal khemu


म्हणून केली याची निवड


सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. सबकुछ सोशल मीडिया आहे. अनेक सेलिब्रिटींनी ते ओळखूनच वेबसिरिजमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. आता यामध्ये कुणाल खेमूची देखील भर पडली आहे. Zee5 च्या अभय या वेबसिरीजमधून तो दिसला होता. एका इनव्हेस्टिंग ऑफिसरची भूमिका त्याने साकारली होती. या भूमिकेत अनेकांना तो आवडला होता. त्यामुळे या मालिकेची बरीच चर्चा झाली. या मालिकेत त्याच्यासोबत दिपक तिजोरीदेखील या मालिकेत होता. ही मालिका सध्या सुरु असून कुणालच्या अभिनयाची यात चर्चा होत आहे.


सोनम कपूरच्या वाढदिवसात मलायकाने घेतले लक्ष वेधून


वेबसिरिजबद्दल काय म्हणतो कुणाल


kunal khemu %281%29


एका वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीत ज्यावेळी कुणालला वेबसिरिजच्या निवडीबाबत विचारण्यात आले त्यावेळी तो म्हणाला की, आपण कोणता रोल निवडतो हे फार महत्त्वाचे असते. एका चुकीच्या निवडीचे नुकसान तुम्हाला होऊ शकते. हल्ली लोक सोशल मीडियावर अधिक असतात आणि त्यांच्या आवडी या पटकन बदलतात. त्यामुळे कथा, रोल याची निवड करताना खूप काळजी घ्यावी लागते.


उपचारानंतर अशा दिसत आहेत तनुजा, काजोलने केला फोटो शेअर


बालकलाकार म्हणून कुणालची ओळख


कुणालने  हम हे राही प्यार के, राजा हिंदुस्थानी, जख्म अशा काही चित्रपटांमधून काम केली आहेत. त्याने केलेला रोल आजही अनेकांच्या लक्षात आहे. त्यानंतर तो थेट मुख्य भूमिकेत दिसला तो मोहित सुरीच्या ‘कलियुग’ या चित्रपटातून. या चित्रपटाने त्याला चांगली ओळख मिळवून दिली. पण त्यानंतर तो फार चांगल्या चित्रपटातून दिसला नाही. गोलमाल, टोटल धमाल अशा काही चित्रपटातून तो दिसला. ‘कलंक’ या चित्रपटात त्याची एक वेगळी बाजू पाहायला मिळाली. या चित्रपटात त्याने ग्रे शेड असलेली भूमिका केली. चित्रपट जरी चालला नसला तरी त्याचा अभिनय या चित्रपटात वाखाणण्यासारखा होता.


ज्येष्ठ अभिनेता गिरीश कर्नाड यांचे निधन


kunal khemu %282%29


कुटुंबाला वेळ देणे महत्वाचे


कुणालसाठी कुटुंब हे महत्वाचे आहे. 2015 साली त्याने सैफ अली खानची बहीण सोहा अली खानसोबत लग्न केले. त्यांना इनाया नावाची मुलगी आहे.  कुणालसाठी कुटुंब महत्वाचे असून त्यांना वेळ देणे त्याला महत्वाचे वाटते. सोहा आता फारशी चित्रपटातून दिसत नाही. तिने आपला सगळा वेळ इनायाच्या संगोपनासाठी दिला आहे. कुणाल सध्या 2 चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. मलंग आणि भूत पोलीस अशी या चित्रपटांची नाव आहेत. 'मलंग' हा चित्रपट थ्रीलर रोमँटीक प्रकारातील चित्रपट आहे. मोहित सुरी दिग्दर्शित हा चित्रपट असून यात दिशा पटनी, आदित्य रॉय कपूर,  अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


(फोटो सौजन्य: Instagran)