कुणाल खेमूचा वाढदिवस अविस्मरणीय, इनायाने गायलेलं बर्थ डे सॉंग झालं व्हायरल

कुणाल खेमूचा वाढदिवस अविस्मरणीय, इनायाने गायलेलं बर्थ डे सॉंग झालं व्हायरल

सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांची मुलगी इनायाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. वडील कुणाल खेमूच्या वाढदिवसानिमित्त इनायाने बर्थ डे सॉंग गायलं आहे. इनायाच्या या बोबड्या बर्थ डे सॉंगमुळे कुणालचा यंदाचा वाढदिवस नक्कीच अविस्मरणीय झाल आहे. कुणाल खेमूचा 25 मेला वाढदिवस होता. या निमित्त इनायाने हे बर्थ डे गिफ्ट तिच्या वडिलांना म्हणजेच कुणाल खेमूला दिलं आहे. खेळण्यातील पियानो वाजवत तिने हे बर्थ डे सॉंग गायलं आहे. यामुळे कुणाल इतका भावूक झाला की त्याने त्याच्या मुलीचा हा व्हिडीओ एका इमोशनल मेसेजसह सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक कलाकारांनी छोट्या क्युट इनायाच्या या बर्थ डे गिफ्टवर गोंडस कंमेटदेखील केल्या आहेत. शिवाय हा व्हिडीओला साडे चार लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.
 

 

 


View this post on Instagram


 

 

The Best Best Bestest Birthday Gift Ever!!!


A post shared by Kunal Kemmu (@khemster2) on
सैफेने कुणालच्या बर्थ डेसाठी दिली पार्टी


कुणाल खेमूच्या वाढदिवसानिमित्त सैफ अली खान आणि करिना कपूरने एक पार्टी ऑर्गनाईज केली होती. सैफने मुंबईतील त्याच्या घरी ही पार्टी ठेवली होती.  ज्यामध्ये काही खास सेलिब्रेटी मित्र मैत्रिणींना बोलावण्यात आलं होतं. या पार्टीसाठी नेहा धुपिया आणि अंगद बेदी, करिनाचे काका कुणाल कपूर आणि त्यांचा मुलगा जहान यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. आमंत्रित पाहुण्यांनी या पार्टीमध्ये खूप मजा केली आणि पार्टीचे फोटोदेखील शेअर केले.  
 

 

 


View this post on Instagram


 

 

#aboutlastnight... all for the love of our birthday boy ... @khemster2 ... bahut saara pyaar! ❤️🤩💥


A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on
कुणाल आणि सोहाची लव्हस्टोरी


कुणाल खेमू आणि सोहा अली खान 2015 मध्ये विवाहबंधनात अडकले. लग्नाआधी काही वर्ष ते एकमेंकांना डेट करत होते. लग्नानंतर तीन वर्षांनी इनाया नौमीचा जन्म झाला. ज्यामुळे कुणाल आणि सोहाच्या जीवनात आनंदी आनंंद निर्माण झाला. कुणाल आणि सोहा अली खानने काही चित्रपटांतून एकत्र काम केलं आहे. 99 आणि ढुंढते रह जाओ गे या चित्रपटात त्यांना एकत्र पाहण्यास मिळालं होतं. कुणाल आता 36 वर्षांचा झाला आहे. कलंक चित्रपटात त्याने काम केलं होतं. कलंकला बॉक्स ऑफिसवर जरी चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी कुणालचा खलनायक चाहत्यांना नक्कीच आवडला. कुणालने कलंकमधून त्याच्या  अभिनयातील नकारात्मक छटा दाखवून दिल्या. कुणाल लवकरच त्याच्या आगामी चित्रपट लुटकेस, गो गोवा गॉन 2 आणि मलंगमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

The Happy Bunch


A post shared by Kunal Kemmu (@khemster2) on
अंकिता लोखंडे लवकरच करणार लग्न, खरेदी केलं 8 बीएचके घर


तुमचा आवडता रणवीर बनणार गुज्जू भाई, साकारणार जयेश भाई


जेव्हा सारा आणि तारा एकच गाऊन घालतात तेव्हा


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम