लागीरं फेम शिवानी बावकरचा वाढदिवस साजरा, सहकलाकारांनी दिलं ‘शितली’ला सरप्राईज

लागीरं फेम शिवानी बावकरचा वाढदिवस साजरा, सहकलाकारांनी दिलं ‘शितली’ला सरप्राईज

'लागीरं झालं जी' मालिका लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या मालिकेतील पात्र प्रेक्षकांना अगदी त्यांच्या घरातील वाटू लागली आहेत. सातारच्या शैलीत बोलणारी शितली आणि भारतमातेच्या रक्षणासाठी लढणारा अजिंक्य ही दोन पात्र तर प्रत्येकालाच हवीहवीशी वाटू लागली आहेत. अर्थात याचं श्रेय लागीरं झालं जीच्या संपूर्ण टीमला जातं. मालिकांमध्ये काम करत असल्यामुळे बऱ्याचदा सेलिब्रेटीजनां त्यांचे वैयक्तिक जीवन जगण्यास वेळच मिळत नाही. त्यामुळे त्यांचे वाढदिवस अनेकदा शूटिंगच्या सेटवरच सेलिब्रेट करण्यात येतात. लागीरं झालं जी या मालिकेतील शीतल म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर हिचादेखील नुकताच वाढदिवस साजरा करण्यात झाला. मात्र शितलच्या वाढदिवसानिमित्त तिच्या सहकलाकारांनी तिला एक खास सरप्राईजदेखील दिलं.


shivani baokar birthday 2


रात्री बारा वाजता दिलं हे सरप्राईझ


लागीरं झालं जी मालिकेतील यास्मिन आणि शिवानीची हेअरड्रेसर यांनी रात्री बारा वाजता शितलला तिच्या घराच्या गच्चीवर नेलं. शितलसाठी तिच्या घराच्या गच्चीवर वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मालिकेची सर्व कास्ट आणि क्रू तिथे हजर  होती. गच्चीला विविध रंगाच्या फुग्यांनी सजविण्यात आलं होतं. बर्थ डे पार्टीविषयी शितलला खबर लागणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे शितल हे सर्व आयोजन पाहून आणि आपल्या सहकलाकारांचे तिच्यावर असलेले प्रेम पाहून भावूक झाली.


shivani baokar birthday


शिवानी बावकरने व्यक्त केली मनातील भावना


शिवानीने सर्वांसोबत तिचा बर्थ डे केक कापला आणि शेजाऱ्यांना  त्रास होणाऱ्या अशा आवाजात म्युजिक लावून पार्टी साजरी केली. विशेष म्हणजे शिवानीच्या वाढदिवसानिमित्त तिचे आईवडील देखील खास तिला भेटायला मुंबईवरून साताऱ्याला आले होते. त्यामुळे शिवानीला हे खास क्षण तिच्या कुटुंबासोबतही घालवता आले. त्यानंतर शितल तिच्या आई-वडिलांसोबत महाबळेश्वरला गेली. मात्र ती जेव्हा पुन्हा शूटिंगसाठी  सेटवर आली तेव्हा परत सेटवर सर्व कलाकारांनी शिवानीला आणखी एक  केक कापायला लावला. शिवनीसाठी हे सरप्राईज खूपच मोठं होतं. शिवानीने तिच्या मनातील भावना व्यक्त करताना "वाढदिवसाचा दिवस कुटुंबीयांसह साजरा करण्यास मिळावं यासारखा दुसरा आनंद जगात नाही. त्यांच्याशिवाय वाढदिवसाचं आनंद अपूर्ण होता. आज मी माझ्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला तसंच 'लागीरं झालं जी'च्या माझ्या आणखी एका कुटुंबाने हे मला छान  सरप्राईज दिलं त्यामुळे हे क्षण मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही.” अशा शब्दात सर्वांना धन्यवाद दिले.


shivani baokar birthday 1

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या घरी ‘या’ नव्या पाहुण्याचं जंगी स्वागत


तैमूरच्या 'नॅनी'चा किती आहे पगार, करीना कपूरने केला खुलासा


अडखळणाऱ्या इंग्रजीमध्ये मागितली मदत, सुषमा स्वराजच्या उत्तरांने जिकलं मन


फोटोसौजन्य - इन्टाग्राम