आता भारती सिंह बनणार कपिल शर्माची 'कम्मो बुवा' पाहा तिचा नवा लुक

आता भारती सिंह बनणार कपिल शर्माची 'कम्मो बुवा' पाहा तिचा नवा लुक

लाफ्टरक्वीन भारती नेहमीच काहीतरी नवे प्रयोग करताना दिसत असते. तिच्या याच गोष्टीमुळे तिचा चाहतावर्ग तिच्यावर फारच खूश असतो. आता तुमची आवडती भारती सिंह चक्क कपिल शर्माची ‘कम्मो बुवा’बनणार आहे. म्हणते तिचा कम्मो बुवा लुक आता रिव्हेल तर झाला आहे. पण आता तिच्या या नव्या गेटअपमुळे पुन्हा एकदा ‘द कपिल शर्मा शो’ चा टीआरपी नक्की वाढेल अशी लोकांना अपेक्षा आहे. तिने हा तिचा नवा लुक स्वत: तिच्या इन्स्टाग्रामवरु शेअर केला आहे. पाहा तिचा हा लुक

शनिवार- रविवार दिसणार बुवाचा जलवा

आता भारती सिंह बुवा साकारतेय म्हणजे काय कमी आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कुरळे लहान केस, डोळ्यावर चष्मा, गाऊन आणि खांद्यावर घेतलेली ओढणी असा तिचा लुक दिसत आहे. आल्या आल्याच या बुवाने विनोदाचे सिक्सर मारायला सुरुवात केली. भारतीच्या या नव्या लुकवर तिचे फॅन्स चांगलेच खुश आहेत. कारण त्यांनी भारतीच्या या नव्या लुकवर भरभरुन प्रतिक्रिया दिलेली आहे.

मुंबईत राहणाऱ्या सेलिब्रिटींची ही घरं तुम्हाला माहीत आहेत का

खतरा खतरा खतरा आहे हीट

सध्या भारती सिंह तिचा एक शो होस्ट करत आहे तो म्हणजे ‘खतरा खतरा खतरा’ हा शो देखील सध्या लोकांना आवडत आहे. या शोचा फॉरमॅट थो़डा वेगळा आहे. म्हणजे भारती यामध्ये सेलिब्रिटींना हसवत तर आहेच पण त्यांच्याकडून खतरनाक टास्कही करवून घेत आहे. हर्ष लिंबाचिया या शोचा सर्वेसर्वा असून भारती या शोची होस्ट आहे. या सगळ्याचे अपडेट भारती तिच्या इन्स्टाग्रामवर टाकतच असते. 

तुमच्या राशीनुसार ओळखा तुम्ही कशा 'आई' आहात

शोमध्ये कंगनाने केली करिनाची तारीफ

Instagram

कपिल शर्माच्या वीकेंडच्या धम्मालमध्ये कंगना रनौत आली होती.अनेक कॉन्ट्राव्हर्सीजसाठी प्रसिद्ध असलेल्या कंगनाने या एपिसोडमध्ये करिना कपूर खानची तारीफ केली आहे. ती तिचे काम आणि घर अगदी उत्तम रित्या सांभाळत असल्याचे तिने यामध्ये सांगितले आहे. कंगनाच्या रडारवर कायमच कोणीतरी असते. पण आता तिच्या तोंडून एखाद्या अभिनेत्री ची तारीफ ऐकून फारच आश्चर्य वाटले आहे. ती तिचा आगामी चित्रपट जजमेंटल है क्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या ठिकाणी आली होती. यावेळी तिने फारच धम्माल केली. 

भारतीच्या प्रेग्नंसीच्या अफवा

Instagram

अगदी काहीच महिन्यांपूर्वी भारती सिंहच्या प्रेग्नंसीच्या अफवांना उधाण आले होते. पण तिने या अफवांवर न रागावता त्याचे हसत उत्तर दिले होते. माझे पोट मोठे असल्यामुळे लोकांना मी गरोदर आहे. असे वाटणे स्वाभाविक आहे. जर तुम्ही मी सेटवरुन परतल्याच्या गोष्टीवरुन जर मी गरोदर असल्याचे म्हणत असाल तर मला गॅसचा त्रास झाल्यामुळे मी परतले होते असे सांगून टाकले. या शिवाय तिने सध्या बाळासाठी आम्ही तयार नसल्याचे तिने सांगितले. लवकरच आम्ही याचा विचार करुन असे तिने सांगितले होते. 

#BBM2update : टास्कसाठी नाही करणार विश्वासघात, शिव होतोय भावनिक

हर्ष आणि भारतीची जोडी हिट

Instagram

लेखक हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंह यांच्या लग्नाला आता वर्ष होऊन गेले असेल. त्यांची लव्हस्टोरीही अगदी खासच होती. हर्षने भारती सिंहला प्रपोझ केले होते. त्यांनी त्यांचा विवाहसोहळा अगदी ग्रँड केला होता. त्यांच्य़ा या शाही विवाहसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.