जुन्या फोटोंवर होतोय कवितांचा पाऊस, कवी तेच..

जुन्या फोटोंवर होतोय कवितांचा पाऊस, कवी तेच..

अरे देवा आता सोशल मीडियावर जो नवा ट्रेंड सुरु आहे  तो सगळ्यांचाच डोक्याला ताप झाला आहे. म्हणजे आता तुमचे सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या जुन्या फोटोंचे काही खरे नाही बरं का! तुमच्या जुन्या फोटोंवर कवितांचा पाऊस पडायला सुरु झाला असेल तर भांबाऊन जाऊ नका. कारण या #lockdown च्या काळात कोणालातरी मस्त कविता करण्याचा हा ट्रेंड सुचला आहे. मग काय एकामागोमाग या कवितांचा पाऊस अनेकांच्या जुन्या फोटोवर होऊ लागला आहे. आता या कविता चांगल्या असतील असा विचार करत असाल तर थोडा ब्रेक लावा कारण या कविता वाचल्यानंतर कवी तेच… म्हणायची वेळ आली आहे.

जुन्या फोटोंना काढले जात आहे उकरुन

shutterstock

साधारण दोन दिवसांपासून हे सगळ फेसबुकवर सुरु आहे. पण 31 मार्चचा दिवस खास होता. कारण काल अचानक सगळ्यांनाच कविता सुचू लागल्या. आता या ज्या काही चार ओळी त्यांना सुचत होत्या त्या इतक्या खट्याळ होत्या की एखाद्याला हसू आवरताच येणार नाही. बरं तुमच्या नव्या फोटोवर या कमेंट होत असतील असे तुम्हाला वाटत असेल तर अजिबात नाही. ज्या काळात तुम्हाला मिसुरडं फुटलं नव्हतं आणि मुलींच्या वेण्या सुटल्या नव्हत्या त्या काळातील फोटो काढून त्यावर कमेंट्सचा पाऊस केला जात आहे. 

स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरचं लग्न तुटण्याच्या मार्गावर

अशाच काही चारोळ्या तुमच्यासाठी

Instagram

 •  वांग्याचा केला रस्सा.. पापड केला फ्राई
   ताई भाव देणार नाही, कितीही करा ट्राई 
 • पावभाजीवर आवडतं बटर… ताईंसमोर बाकी पोरी दिसतात सटर फटर 
 • गावरान अंडी तळली तुपात… काय तेज आहे तुझ्या रुपात
 • तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी आणि ताईला बघून सगळे म्हणतात Please एक सेल्फी 
 • भांग पिऊन भारतातले लोक खेळतात होळी… अन हिला बघून पोरं म्हणत्यात ही तर आमच्या गल्लीतील अँजोलिना जॉली 
 • सरबतामध्ये टाकतात सब्जा .. आपल्या ताईने केला लाखो मुलांच्या दिलावर कब्जा
 • वणवा लागला डोंगरावर.. गवत गेलं जळून.. ही कातील अदा पाहून पोर बघतात वळून 
 • नाल्याच्या डबक्यात फिरत होते डुक्कर.. हिचा तर फोटो पाहून मुलांना येते चक्कर 
 • पोकेमॉन मधला पिकाचू करतो नुसता पिका पिका.. हीच आहे ती  जत्रेतील दीपिका
 • ताईंच्या हेअरस्टाईलसमोर प्रियांका फेल.. कारण ताईंच्या केसांना मेदूवड्याचे तेल 
 • स्टाईलमध्ये बसला आहे माझा भाऊ… सगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय Quarentine मध्ये कशी राहू 
 • आला कोरोना लागला होता कर्फ्यू.. पोरी गर्दी करुन म्हणत्यात लई दिवस झाले बाहेर आलं नाही माझं पाखरु
 • टीव्हीवर लागलं होतं इलू इलू… भाऊंना आमच्या पाहून मुली म्हणतात किती गं क्युट बाई माझं पिल्लू 
 • दूध पाहिजे लोकांना आपल्याला पाहिजे साय...दूध पाहिजे लोकांना आपल्याला पाहिजे साय… भाऊंना पाहून पोरी म्हणतात हाय हुकू हाय हुकू हाय हाय
 • भाऊंच्या फोटोला येतात पोरींचे like…कारण आपला भाऊ आहे अण्णा नाईक
 • जगात पसरलाय कोरोना आणि भाऊला पोरी म्हणतात मांग मेरी भरोना 
 • भाऊचा फोटो बघून पोरी होतात खाक… कारण भाऊकडे आहे चिमणीची राख 
 • इतरांना आवडत असेल चार बांगड्यांवाली ऑडी.. पोरींना तर फक्त आवडते भाऊंची ड्यॅशिंग बॉडी 
 • नाचता नाचता पोरी घेतात गिरकी… भाऊंनी नुसतं बघितलं तरी पोरगी चालते तिरकी
 • भाऊंचा फोटो पाहून तिची लाजून गेली खाली मान… अरे ए कपडे घाल.. तसा सू शोभून दिसतोस कल्याणचा सलमान खान 
  आता हा तर फक्त डेमो आहे या पेक्षा जास्तीचा साठा सध्या फेसबूकवर आहे. 

होम क्वारंटाईनमध्ये फिट राहण्यासाठी ‘या’ अभिनेत्री करत आहेत योगा

अशी झाली सुरुवात

आता या चारोळ्या सुचायलासुद्धा टॅलेंट लागतं बरं का?  कारण अशा ओळी फक्त रिकाम्या वेळीच सुचू शकतात. तुम्ही अजूनही कोणाला कमेंट दिली नसेल तर असं काही तरी तयार करा. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, हे सगळे सुरु कसे झाले. तर सध्या तुम्ही पाहिल असेल तर मुली एकमेकांना टॅग करुन साडीतले सोलो फोटो शेअर करत आहेत. बस्सं मग अशी झाली कमेंटला सुरुवात आणि मग काय जुन्या फोटोंना कमेंट करण्याचा सपाटाच लावला गेला.


आता हे सगळं थांबवा असं म्हणण्यासाठीही चारोळी केली जात आहे. अरे तुम्ही ही मजा घेतली नसेल तर नक्की घ्या. क्यो की नया है यह!

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.