शास्त्रीय संगीतातील एक पर्व संपले, पंडित जसराज यांचे निधन

शास्त्रीय संगीतातील एक पर्व संपले, पंडित जसराज यांचे निधन

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मनोरंजन क्षेत्राला धक्का दिला आहे. सोमवारी चित्रपट निर्माता निशिकांत कामत यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूड हळहळले होते आणि आता पंडितजींच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांना धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील न्यू जर्सी परीसरात असणाऱ्या त्यांच्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 90 वर्षांचे होते. भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून पंडितजी अमेरिकेत राहात होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजनविश्व हळहळले आहे

लय भारी' निशिकांत कामतचे निधन, रितेशने केले ट्विट

कुटुंबाने दिली माहिती

Instagram

पंडित जसराज यांच्या निधनाची बातमी हि कुटुंबाकडून देण्यात आली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अत्यतं दु:खद अशी बातमी आम्हाला सांगावी लागत आहे. संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे अमेरिकेतील न्यू जर्सीमधील घरात पहाटे 5 वाजून  15 मिनिटांनी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आम्ही इश्वरचरणी हीच प्रार्थना करतो. की, भगवान कृष्ण स्वर्गाच्या द्वारी त्यांचे स्वागत करो आणि पंडितची त्यांचे आवडते भजन ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ त्यांना समर्पित करो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद.. बापूजी जय हो… अशी भावनिक नोट कुटुंबाकडून आली आहे. 

नुकताच केला 90 वा वाढदिवस साजरा

पंडित जसराज यांनी जानेवारी महिन्यात 90 वा वाढदिवस साजरा केला होता. 9 एप्रिल रोजी त्यांनी वाराणसीच्या संकटमोचन हनुमान मंदिरासाठी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सादरीकरणे केले होते. 

रेकॉर्ड ब्रेक ठरला तानाजी, यंदा 'या' बॉलीवूड चित्रपटांना छोट्या पडद्यावर सर्वाधिक पसंती

संगीत घराण्यात जन्म

Instagram

पंडित जसराज यांचा जन्म संगीत क्षेत्राशी निगडीत अशा परीवारात झाला. त्यांच्या वडिलांनीच  म्हणजेच पंडित मोतीराम यांनीच त्यांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले. पण त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ हा त्याने मोठा भाऊ पंडित मणिराम यांनी केला. मेवाने घराण्यातील पंडित जसराज हे खयाल प्रकारातील शीर्षस्थ गायक होते. त्यांच्या बंदिशी या फार प्रसिद्ध होता. अमेरिकेमध्ये त्यांची संगीताची शाळा आहे.

अनेक पुरस्तकारांनी सन्मानित

पं. जसराज यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे. भारताच्या सर्वाच्च्च अशा पद्मविभूषम पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.  शास्त्रीय संगीतासोबत त्यांनी चित्रपटांसाठीही काही रेकॉर्डिंग केले आहे.आंतरराष्ट्रीय खगोलीय संघ यांनी एका ग्रहाचा शोध 2006 साली लावला. त्या ग्रहाला पंडितजसराज असे नावही देण्यात आले. त्यांच्या जीवनकाळा त्यांनी मेवाना घराण्यातील 76 शिष्यांना घडवले आहे. लेखन बुद्धिराजा यांनी त्यांच्यावर ‘रसराज-जसराज’ नावाचे पुस्तकही प्रकाशित केले आहे. त्यांची मुलगी दुर्गा जसराज ही देखील संगीत क्षेत्रासोबतच टीव्ही माध्यामातला प्रसिद्ध चेहरा आहे. 


पंडित जसराज यांच्या जाण्याचे दु:ख संपूर्ण देशाला आणि पर्यायाने संगीत, मनोरंजन क्षेत्राला आहे. त्यांनी जसराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. POPxo मराठीकडून त्यांना भावपूर्ण आदरांजली!

चित्रपटात किन्नरची भूमिका साकारुन या कलाकारांनी मिळवली अफलातून प्रसिद्धी