येत्या 15 महिन्यात खिलाडी अक्षय मारणार सिनेमांचा सिक्सर

येत्या 15 महिन्यात खिलाडी अक्षय मारणार सिनेमांचा सिक्सर

एकेकाळी बॉलीवूडवर राज्य होतं ते खान्स म्हणजेच सलमान, आमिर आणि शाहरूख. पण आता तसं राहिलं नाहीय. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) ने साल 2019 मध्ये 4 सुपरहिट चित्रपट देऊन तो नंबर 1 वर विराजमान झाला. त्यामुळे सध्या अनेक प्रोड्यूसर्स खिलाडी अक्षयच्या घराबाहेर रांग लावून त्याच्या होकाराची वाट पाहत असल्याची चर्चा आहे. कारण सध्या सुरू आहे अक्कीच्या करियरचा गोल्डन पीरियड. तो जी स्क्रिप्ट वाचून, जो सिनेमा करत आहे तो सुपरहिट होत आहे.

सर्वांना हवाय अक्षयचा मिडास टच

जर 2020 आणि 2021 बाबत बोलायचं झाल्यास अक्षय कुमार (Akshay Kumar) ने आपल्या आगामी 6 चित्रपटांची घोषणा केली आहे. एवढंच नाहीतर त्यांच्या रिलीज डेटही समोर आल्या आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जिथे मोठेमोठे सेलिब्रिटीज एका वर्षात एक चित्रपट करतात तिथे अक्की येत्या 15 महिन्यात सहा चित्रपट घेऊन येत आहे. चला पाहूया कोणते आहेत हे खिलाडीचे सिनेमे.

सूर्यवंशी

रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला पोलीस ड्रामा असून येत्या 27 मार्चला तो रिलीज होईल. या चित्रपटात  अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांची जोडी बऱ्याच वर्षानंतर या चित्रपटात दिसणार आहे. जे जोडीने रोमांस आणि गुंडाची धुलाई असं दोन्ही करताना दिसतील. 

Instagram

लक्ष्मी बॉम्ब

लक्ष्मी बॉम्ब (Laxmi Bomb) हा खिलाडी अक्षयच्या करियरमधला सर्वात कमाल चित्रपट ठरू शकतो. कारण यामध्ये एकमद हटके भूमिका करताना दिसणार आहे. मुख्य म्हणजे सलमान भाईजान किंवा खान्सची मक्तेदारी असणाऱ्या ईदला लक्ष्मी बॉम्ब (Laxmi Bomb) रिलीज होणार आहे. त्यामुळे या ईदला सल्लूचा (Salman Khan) राधे- योर मोस्ट वांटेड भाई आणि लक्ष्मी बाँबची टक्कर होणार आहे.

पृथ्वीराज

यशराज बॅनरखाली बनणारा हा पीरियड ड्रामा आहे. ज्यामध्ये अक्षयसोबत दिसणार आहे मानुषी छिल्लर. जिचा हा डेब्यू सिनेमा आहे. सूत्रानुसार या सिनेमाची निर्मिती करण्यासाठी मेकर्स मोठ्या प्रमाणावर पैसा ओतत आहेत.

बच्चन पांडे

निर्माता साजिद नडियादवालाच्या बॅनरखाली हा चित्रपट बनत आहे. ज्यामध्ये अक्षयसोबत दिसणार आहे अभिनेत्री कृती सनोन. हा चित्रपट आधी ख्रिसमसला रिलीज होणार होता पण त्याची रिलीज डेट आता 22 जानेवारी 2021 करण्यात आली आहे.

अतरंगी रे

दिग्दर्शक आनंद एल राय (Anand L Rai) ने ऑफिशियली घोषणा केली आहे की, त्यांच्या आगामी चित्रपटात अक्षय कुमार असेल. एवढंच नाहीतर अक्कीसोबत दिसणार आहे दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि सारा अली खान (Sara Ali Khan). हा सिनेमा 12 फेब्रुवारीला रिलीज होणार असल्याचं कळतंय.

बेल बॉटम

बऱ्याच गॅपनंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा बेल बॉटम (Bell Bottom) मध्ये गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. बेल बॉटममधला अक्षय कुमारचा लुकही सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला होता. जो त्याच्या आतापर्यंतच्या सिनेमांपेक्षा वेगळा आहे. अक्कीचा हा सिनेमा 2 एप्रिलला बॉक्स ऑफिसवर झळकेल.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.