मुंबईकरांसाठी लाईफलाईन सुरु, पण अशी घ्यावी लागेल काळजी

मुंबईकरांसाठी लाईफलाईन सुरु, पण अशी घ्यावी लागेल काळजी

मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे जरा उशिराने धावली तरी एकच गजब गोंधळ उडायचा. मग मार्च महिन्यापासून कोरोनामुळे बंद झालेली मुंबईची लाईफ लाईन तब्बल एक वर्षानंतर पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरीकांसाठी पुन्हा एकदा सुरु होणार आहे. अनेकांना या बातमीने दिलासा दिला आहे. बस, गाडी, रिक्षा असा प्रवास करुन कंटाळलेल्या लोकांना लाईफलाईन सुरु होण्याचा बातमीने दिलासा दिला आहे. कारण अनेकांचे बजेट असा प्रवास करत कोलमडले होते. पण सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचा विचार करत पुन्हा एकदा लाईफलाईन धावणार आहे. आजपासून त्याचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे. पण यासंदर्भात एक नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे ती प्रवास करताना प्रत्येकाला माहीत हवी.

कोरोना काळात महिलांचे आरोग्य, स्वास्थ्य जपण्यासाठी काही सोप्या टिप्स

टप्प्याटप्य्यात करावा लागेल प्रवास

लाईफ लाईन काही खास कर्मचाऱ्यांसाठी सुरु असली तरी देखील त्यामध्येही वेळेचे बंधन आहे. पण आता पुन्हा लोकल सरसकट सगळ्यांसाठी सुरु करताना काही नियम ठेवण्यात आले आहे. या लोकल ट्रेन टप्प्याटप्प्यात सुरु केल्या जाणार आहेत. सध्या मुंबईकरांना दुपारी 12 ते 4 आणि रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत प्रवास करता येणार आहे. मधल्या वेळात सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करता येणार नाही. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना तिकिटही दिले जाणार नाही. कोरोनाचे सावट आता कमी झाले असले तरी हे संकट पूर्णत: यातून बाहेर आलेलो नाही म्हणूनच अशा पद्धतीने गर्दीचे नियोजन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  पण असे असले तरी पूर्वी ज्या पद्धतीने महिलांना प्रवासाला परवानगी होती तशीच राहणार आहे. शिवाय ज्यांच्याकडे पास आहेत त्यानाही प्रवास करता येणार आहे.

#StayHomeStaySafe : कोरोनामुळे घरी राहून कंटाळला असलात तर करा या गोष्टी

गर्दीच्या ठिकाणी पाळावे लागणार हे नियम

रेल्वे सुरु होणार असल्या तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याकडे दुर्लक्ष करुन मुळीच चालणार नाही. त्यामुळे लोकलमध्ये, स्टेशनवर मास्क घालणे हे अनिवार्य आहे. जर विनामास्क प्रवास करताना आढळला तर त्या व्यक्तीकडून दंड घेण्यात येणार आहे. याशिवाय ज्या स्टेशनांवर प्रवाशांची सगळ्यात जास्त गर्दी असते. अशा स्टेशनवर गर्दी टाळण्यासाठी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे सगळ्या नियमांचे पालन होते की नाही याची कडक तपासणी 

कोरोनाच्या काळात प्रेग्ननंट महिलांनी अशी वाढवावी प्रतिकार शक्ती

नाहीतर बसेल दंड

रेल्वे या 95 %सुरु करण्याच आल्या आहेत. त्यामुळे या गर्दीत तुम्ही कोणत्या वेळी प्रवास करता याकडे कोणाचे लक्ष जाईल अशा विचारात असाल तर तुमच्यावर सतत पाहारा असणार आहे. अत्यावश्यक सेवा आणि ज्यांना प्रवासाचा खास पास देण्यात आला आहे अशा लोकांव्यतिरिक्त प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी देखील खास व्यवस्था करण्यात आली आहे. 

निर्जंतुकीककरण आणि दुरुस्तीचे काम

गेल्या 10 महिन्यांपासून लोकलसेवा बंद असल्यामुळे अनेक स्टेशनांमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक तिकिट मशीन्स या बंद आहेत, लोकांना झटपट तिकिट काढता यावे आणि गर्दी टाळता यावी यासाठी या मशीन्स सुरु करणे अनिवार्य आहे. या दृष्टिकोनातून सगळ्या स्टेशन्सवर काम केली जाणार आहेत. शिवाय कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी निर्जंतुकीकरण देखील सातत्याने केले जाणार आहे. 


आता रेल्वेने प्रवास करताना वेळा आणि काळजी या दोन्ही गोष्टींचे भान ठेवून प्रवास करा.