"व्हायरस मराठी" आयोजित लॉकडाउन फिल्म फेस्टिव्हल

"व्हायरस मराठी" आयोजित लॉकडाउन फिल्म फेस्टिव्हल

लॉकडाउनच्या काळात तुमची सगळी क्रिएटिव्हिटी पणाला लावून तुम्ही उत्तम शॉर्ट फिल्म अथवा डॉक्युमेंटरी बनवली आहे का? नसेल बनवली तर लगेच तयारीला लागा आणि लवकरात लवकर तुमच्या फिल्म्स व्हायरस मराठीला पाठवा. या काळात खूप तरुण फिल्ममेकर्स वेगळा विचार करून चांगल्या फिल्म्स बनवत आहेत. त्यांच्यासाठी आणि या वेळाचा चांगला उपयोग करत काहीजण अगदी मोबाईलवरसुद्धा चांगले माहितीपट आणि शॉर्टफिल्म्स बनवत आहेत. त्यांच्यासाठी "व्हायरस मराठी"ने हा उपक्रम आखला आहे.

या आगळ्या वेगळ्या डिजीटल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी दोन्ही विभागात प्रत्येकी तीन पारितोषिकं दिली जाणार आहेत. प्रथम पारितोषिक - 7500/-  द्वितीय पारितोषिक- 5000/- आणि तृतीय पारितोषिक- 3000/- आहे. या लॉकडाउन फिल्म फेस्टिव्हलचे परीक्षक म्हणून लेखक अरविंद जगताप, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक संतोष कोल्हे आणि दिग्दर्शक समीर पाटील हे काम पाहणार आहेत.

निवड झालेल्या सर्वोत्कृष्ट दहा फिल्म्स Virus मराठीच्या YouTube चॅनेलवर प्रदर्शित केल्या जातील. एवढंच नाहीतर सर्व पुरस्कार विजेत्या फिल्ममेकर्सना लॉकडाउननंतर व्हायरस मराठी सोबत काम करायची संधीही मिळणार आहे.

  • फेस्टिव्हलच्या फिल्मसाठी नियमावली - फिल्म लॉकडाउनचे सगळे नियम पाळून शूट केलेली असावी. टेक्निकल स्पेसिफिकेशनची चिंता नाही. मोबाईलवर शूट केलेली असली तरी चालेल पण क्वालिटी उत्तम हवी. नीट एडिट केलेली असावी, अशी विनंती व्हायरस मराठी ने केली आहे. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या फिल्म्सना विषयाचे बंधन नाही आणि वेळेचंही बंधन नाही. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी, एन्ट्री फॉर्म व्हायरस मराठीच्या facebook page वर उपलब्ध आहेत. तुमची  फिल्म 12 मे 2020 पर्यंत सबमिट करा, असे आवाहन व्हायरस मराठीने केले आहे.

मग तुम्हीही या आगळ्या वेगळ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये नक्की भाग घ्या आणि भरघोस बक्षीस मिळवा.