ADVERTISEMENT
home / मनोरंजन
'लव्ह लग्न लोच्या'फेम अभिनेत्री विवाहबंधनात, फोटो व्हायरल

‘लव्ह लग्न लोच्या’फेम अभिनेत्री विवाहबंधनात, फोटो व्हायरल

‘लव्ह लग्न लोच्या’ मधून घराघरात आणि सर्वांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री रूचिता जाधव (Ruchita Jadhav) लग्नबंधनात अडकली आहे. 3 मे (सोमवारी) रोजी अगदी घरच्यां मंडळीच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. महत्वाचे म्हणजे मुंबईतील आनंद माने (Anand Mane) या व्यावसायिकाशी रूचिकाने अरेंज मॅरेज केले आहे. काही दिवसांपूर्वीच आपण आनंदला होकार दिला असल्याचे रूचिताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले होते. आनंदने तिला लग्नाला मागणी घातल्याचे (propose) फोटो रूचिताने शेअर करून आपला आनंद व्यक्त केला होता. 9 एप्रिल रोजी आनंदने रूचिताला लग्नाची मागणी घातली आणि आता एक महिन्यातच रूचिता आणि आनंद लग्नबंधनात अडकले. रूचिताच्या चेहऱ्यावरील आनंदच सर्व काही सांगून जात आहे. 

मराठमोळा राहुल वैद्य ‘खतरों के खिलाडी’ होणार, 11 व्या हंगामासाठी होकार

घरच्यांच्या उपस्थितीत पार पडला लग्नसोहळा

कोरोनामुळे रूचिता आणि आनंदने अगदी घरच्यांचा उपस्थितीत हे लग्न केलं आहे. रूचिता आणि आनंदचे हे फोटो व्हायरल झाले असून रूचिता लग्नात अत्यंत सुंदर दिसत होती. लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये रूचिताचे रूप अधिक खुलून आले आहे. #mangayiruch या हॅशटॅग अन्वये तिचे फोटो व्हायरल होत आहेत. रूचिताने होकार दिल्यानंतर शेवटी #ManGayiRuch असा हॅशटॅग देत तिने या दोघांची लव्ह स्टोरी शेअर केली होती. त्यामुळेच हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये असून तिच्या भावानेही त्याच्या हातावर हीच मेंदी काढली होती. मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये त्यांची भेट झाली आणि त्यानंतर सहज भेटीनंतर फोनवर बोलणे सुरू झाले. आनंद आवर्जून रोज फोन करून बोलायचा. डिसेंबर 2020 मध्ये लग्न करणार होतो. आमच्या कुटुंबाने आम्हाला एकमेकांना समजून घेण्यासाठी खूपच वेळ दिला असं रूचिताने आनंदसंदर्भात सांगितले. रूचिता आणि आनंदचे हे लग्नाचे फोटो अत्यंत सुंदर असून दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद दिसून येत आहे. रूचिता मुळातच सुंदर असून लाल रंगाच्या साडीमुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून आलेले दिसून येत आहे. तसंच नव्या नवरीचा साजही तिच्या चेहऱ्यावर दिसून येत आहेत. रूचिताच्या लग्नाचे विधी तीन दिवस झाले. यामध्ये साखरपुडा, हळद आणि मेंदी आणि लग्न असे विधी करण्यात आले. तसंच हा अगदीच कौटुंबिक सोहळा होता. 

अभिनेत्री उपासना सिंह सापडली संकटात, कोविड नियमाचं केलं उल्लंघन

ADVERTISEMENT

आईच्या लग्नातील साडी नेसली लग्नात

रूचिता आपल्या लग्नामध्ये आपल्या आईने तिच्या लग्नात नेसलेली साडी परिधान केली होती. आईची साडी हा प्रत्येक मुलीचा जिव्हाळ्याचा विषय असतो आणि त्यामुळे रूचिताही आपल्या आईच्या लग्नातील साडी नेसली होती. या साडीमध्ये रूचिताचे सौंदर्य अधिक खुलून आलेले दिसून येत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींसाठी रूचिता पार्टी ठेवणार आहे. सध्या रूचिता अशाच प्रोजेक्टवर काम करत आहे ज्यामुळे ती आनंदच्या अधिक जवळ राहू शकेल. मात्र लग्नानंतर रूचिताचे नवे प्रोजेक्टस काय असणार आहेत आणि नक्की कोणत्या मालिका अथवा चित्रपटांमध्ये रूचिता काम करणार आहे याची मात्र तिच्या चाहत्यांना कल्पना नाही. लग्नासाठी तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. रूचिता आणि आनंदला POPxo मराठीकडून मनःपूर्वक लग्नाच्या शुभेच्छा! तसंच रूचिताला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

‘अग्गंबाई सूनबाई’ मालिकेत या अभिनयाची एंट्री, बदलणार का शुभ्रा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

03 May 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT